Nanded Arogya Vibhag -कृषी व आरोग्य विभागात विविध पदे रिक्त
Nanded Arogya Vibhag Bharti 2022
Nanded Arogya Vibhag Bharti 2022: In Himayatnagar taluk of Nanded district there are various posts of agriculture officer and health department vacant. Due to these vacancies, the employees are burdened with work. Read More details about Arogya Vibhag Nanded Recruitment 2022 are given below.
हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. या दोन्ही कार्यालयांचे रिक्त पदांचे ग्रहण न सुटल्याने अधिकचा भार अल्प कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कृषी तालुका अधिकारी कार्यालयात मंजूर पदे ३३ तर भरलेली पदे १६ आहेत. या ठिकाणी रिक्त पदे १७ आहेत. रिक्त पदे भरती प्रक्रियेत शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे.
रिक्त जागेमुळे रुग्णांची गैरसोय
- तालुक्यात ६८ गावे आहेत. ग्रामीण भागात दोन टोकाला म्हणजे सरसम व चिंचोड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रिक्त जागेमुळे रुग्णांना उपचार व्यवस्थित होत नसल्याने आरोग्य यंत्रणांचा खोळंबा झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक रिक्त आहे.
- प्रभारी म्हणून डॉ. गायकवाड हे काम सांभाळतात. एक लॅब टेक्निशयन, एक फार्मासिस्ट, एक वार्डबॉय पद रिक्त, चिंचोर्डी प्रा. आरोग्य केंद्र आदिवासीबहुल भागात असून, येथे रिक्त पदे आहेत आहे. एक सुपरवाझर, एक आरोग्य सेविका, चार परिचर पदे रिक्त आहेत.
Arogya vibhag job