मुंबई विद्यापीठाकडून बीएससी पुनर्परीक्षेचा निकाल ९ दिवसांत जाहीर..!- Mumbai University Results
Mumbai University Results
Mumbai University B.Sc Results Mumbai University has declared the result of B.Sc session 6 re-examination in just nine days. As many as 2,926 students who re-appeared for the BSc Session 6 course have got relief. The university was facing criticism from students for the delay in results. However, the university has now started efforts to get the results declared on time and it is showing positive results. The university has been able to declare the results of the re-examinations of the recently concluded winter second semester on time. The university has declared the result of BCom Session 6 examination in 16 days.
मुंबई विद्यापीठाकडून बीएससी पुनर्परीक्षेचा निकाल ९ दिवसांत जाहीर..!
मुंबई विद्यापीठाने बीएससी सत्र सहाच्या पुनर्परीक्षेचा निकाल अवघ्या नऊ दिवसांत जाहीर केला आहे. बीएससी सत्र ६ अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा दिलेल्या दोन हजार ९२६ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाला निकाल विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता विद्यापीठाने निकाल वेळेत लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यातून नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी द्वितीय सत्रातील पुनर्परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे. विद्यापीठाने बीकॉम सत्र ६ परीक्षेचा निकाल १६ दिवसांत जाहीर केला आहे.
बीकॉम अकाउंट अँड फायनान्स सत्र ६ परीक्षेचा निकाल २२ दिवसांत, तर बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
बीकॉम सत्र ६ एटीकेटी परीक्षेसाठी १४,१९१, बीकॉम अकाउंट अँड फायनान्ससाठी १,०३१, तर बीएमएस परीक्षेसाठी १,५४९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्याचबरोबर, बीफार्म सत्र ८ चा निकाल १८ दिवसांत, तर बीआर्च सत्र सहाचा निकाल १४ दिवसांत जाहीर करण्यात आला. हे सर्व निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.
निकाल – http://www.mumresults.in/
Mumbai University BA Results – TYBA Mumbai University Results Declared now. See the below given results. Mumbai University on Thursday night declared the results of the third year BA session 6 examination conducted in April 2024. A total of 4,675 students have cleared the exam. The pass percentage is 49.31.
Along with this result, the university has also declared the result of humanities faculty within 30 days. A total of 13,301 students had registered for the exam while 12,697 students appeared for the exam. A total of 4,675 students passed and 4,806 failed.
The pass percentage of the exam was 49.31 per cent. As many as 604 students were absent from the exam. The results of 45 students have been reserved due to copying cases, while the results of 2,243 students have been reserved for not passing the first or second year.
The results of 928 students have been reserved as admission was not finalised due to various reasons. The university has so far released 74 results for the 2024 summer semester. The results of the exam http://www on the university’s website. mumresults.in/ are featured on it.
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के – यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर केला. या परीक्षेत ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ४९.३१ एवढी आहे.
- विद्यापीठाने या निकालाबरोबरच मानव्य विद्याशाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या परीक्षेत १३,३०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १२,६९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ४८०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
- या परीक्षेचा निकाल ४९.३१ टक्के एवढा लागला आहे. ६०४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. ४५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत, तर २२४३ विद्यार्थ्यांचे निकाल प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत.
- विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ७४ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www. mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
Mumbai University Results 2024 – The 60-40 scoring system will be applicable for undergraduate courses in Mumbai University and affiliated colleges from this year. B.A., B.Com., B.Sc. And for all other undergraduate courses, the written test will be of 60 marks (external assessment) and 40 marks will be for continuous assessment (internal assessment).
A new education policy has been implemented for postgraduate courses from the academic year 2023-24. Accordingly, instead of the earlier 60-40, there will now be a 50-50 score division. The written examination in each session will be of 50 marks (external assessment) and 50 marks for continuous assessment (internal assessment). It will be mandatory to pass both the exams separately.
मुंबई विद्यापीठातही आता ६०-४० गुण विभागणी
- मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत यंदापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी ६०-४० गुणांकन पद्धत लागू होणार आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लेखी परीक्षा ६० गुणांची (बाह्य मूल्यांकन) असेल आणि ४० गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी (अंतर्गत मूल्यांकन) असतील.
- विद्यापीठाशी संलग्न ८९४ महाविद्यालयांत आतापर्यंत काही अभ्यासक्रमांचे १०० गुणांनुसार व काही अभ्यासक्रमांसाठी ७५-२५ अशी गुण विभागणी करून मूल्यांकन होत होते. आता प्रत्येक सत्र परीक्षेसाठी ६०-४० गुणांकन पद्धती असेल. प्रात्यक्षिके, प्रकल्प, गृहपाठ, औद्याोगिक व व्यावसायिक भेटी, ऑन जॉब ट्रेनिंग, उपस्थिती आदी गोष्टींचा अंतर्गत मूल्यांकनात समावेश असेल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
- मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांत यापुढे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणांकन होईल. परिणामी लेखी परीक्षेबरोबरच अन्य बाबीही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतील…
- पदव्युत्तर पद्धतीतही बदल – शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्वीच्या ६०-४०ऐवजी आता ५०-५० गुणविभागणी असेल. प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा ५० गुणांची (बाह्य मूल्यांकन) आणि ५० गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी (अंतर्गत मूल्यांकन) असतील. दोन्ही परीक्षांत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
Mumbai University B.Com Results 2024 – The first semester, the third year of the summer semester, conducted by the University of Mumbai in March 2024, was b. Com. The results of the crucial examination of Session 6 have been declared. A total of 16,636 students have cleared the exam. The pass percentage of the exam was 43.52 per cent. The results were declared by the university in just 24 days. The university has declared the results of eight examinations for the summer session till date. A total of 54,901 students had registered for the exam while 52,478 students appeared for the exam. A total of 16,636 students passed the exam. A total of 21,592 students failed. As many as 2,423 students were absent from the exam.
मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम. सत्र ६ चा निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा निकाल ४३.५२ टक्के एवढा लागला आहे. हा निकाल विद्यापीठाने फक्त २४ दिवसात जाहीर केला आहे. उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत ८ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत. या परीक्षेत ५४,९०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५२,४७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २१,५९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. २४२३ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते.
Mumbai University has declared the results of 72 examinations for the winter session held in October and November 2023 within 30 days. Measures such as conducting exams according to the academic session, evaluating them on time and declaring the results within the stipulated time seem to have had a positive impact.
Mumbai University has declared the results of 72 examinations including BA, BCom, BSc, BPharm, BArch for the winter session. During the summer session, the results of many students were reserved as students made mistakes in barcodes and seating numbers. Their results could also not be declared within the stipulated time. Therefore, The University of Mumbai emphasized on measures in the winter session.
Till date, the results of more than one lakh students at the undergraduate level have been declared on time. The results of the three examinations were declared in 45 days. The results of the remaining examinations will also be declared on time, said The Director of Examinations and Evaluation Board. Prasad Karande said.
मुंबई विद्यापीठाचे ३० दिवसांच्या आत ७२ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या हिवाळी सत्रातील ७२ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. शैक्षणिक सत्रानुसार परीक्षा घेणे, त्याचे मूल्यांकन वेळेवर करणे, निर्धारित वेळेत निकाल लावणे अशा उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे.
मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीफार्म, बीआर्च अशा ७२ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. उन्हाळी सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बारकोड व आसन क्रमांकांमध्ये चूक केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव होते. त्यांचा निकालही निर्धारित वेळेत जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात उपाययोजनांवर भर दिला.
आजपर्यंत पदवी स्तरावरील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आले आहेत. तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लागले. उर्वरित परीक्षांचे निकालही वेळेत जाहीर करण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
Mumbai University Results for B.Com Examine 2023 – Mumbai University 3rd Year BCom Semester 5 Exam Result of Winter Session which was concluded in October 2023 of the final year of academic year 2023-24 has been declared within the stipulated time. The university has declared 18 results for winter session 2024 till date. The results of this examination are displayed on the university website http://www.mumresults.in/.
A total of 21745 students have successfully passed the BCom Session 5 examination. 60 thousand 073 students had registered for this exam. Out of them 57 thousand 692 students had appeared in the examination. So 2381 students were absent in the examination. Also 35874 students have failed in this exam. Also, there have been 73 copy cases in this exam. The result of BCom session 5 is 37.74 percent.
Mumbai University च्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थितीचा प्रयोग यशस्वी
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबर २०२३ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ या परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड व परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व्यक्त केले.
बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण २१७४५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६० हजार ०७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७ हजार ६९२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर २३८१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ३५८७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत ७३ कॉपी केसेस झाल्या आहेत. बीकॉम सत्र ५ चा निकाल ३७.७४ टक्के लागला आहे.
अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी :
उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली गेली. यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळाली व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली .यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजले.
विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे १८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
Final Year Exam Result : Mumbai University Results 2020: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.आज विद्यापीठाने १३ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.
तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.
निकाल – http://www.mumresults.in/
मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम, बीएमएम परीक्षांचे निकाल जाहीर
Final Year Exams Results 2020 Bcom, Bmm Results
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बीकॉमच्या सत्र ६चा निकाल ९५.७९ टक्के, तर बीएमएमचा निकाल ९६.११ टक्के इतका लागला आहे.
बीकॉमच्या परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थीउत्तीर्ण झाले. या परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. यासह बीएमएम सत्र ६च्या परीक्षेत एकूण तीन हजार ९५७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांने त्यांच्या कॉलेजच्या नावाची निवड करून आसन क्रमांक टाकल्यास ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
‘अन्य निकालही वेळेत लागणार’
मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. कॉलेजांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai University Results