मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर विधि शाखेची एकच प्रवेश यादी जाहीर – Mumbai University Admission
Mumbai University PG Admission 2024
Mumbai University LLM Admission 2025-2026 – Mumbai University conducted the pre-admission examination for post-graduate first year law course (LL.M.) late. This has also delayed the admission process. In view of this, the only admission list for this course was released and the hours started on Thursday, January 23. As a result, students enrolled in the second and third admission lists will miss out on the initial course.
मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर विधि शाखेची एकच प्रवेश यादी जाहीर
मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रथम वर्ष विधि अभ्यासक्रमाची (एलएल.एम.) प्रवेशपूर्व परीक्षा उशिरा घेण्यात आली. यामुळे प्रवेश प्रक्रियेसही विलंब झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर अभ्यासक्रमासाठीची एकच प्रवेश यादी जाहीर करून गुरुवार, २३ जानेवारीपासून तासिकांना सुरुवात करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश यादीत नाव येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या अभ्यासक्रमाला मुकावे लागणार आहे.
- मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाची (एलएल.एम.) प्रवेशपूर्व परीक्षा ही १७ आणि २४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. तसेच काही दिवसांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपूर्व परीक्षेचा निकालही प्रसिद्ध झाला व पुढील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानंतर जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध झाली.
- मात्र अद्याप दुसरी व तिसरी प्रवेश यादी प्रसिद्ध झालेली नाही. मात्र २३ जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष २०२४- २५ अंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेच्या प्रथम सत्राच्या तासिकांना सुरुवात झाल्याचे मुंबई विद्यापीठाच्या विध विभागाने जाहीर केले आहे. ही संपूर्ण प्रक्रियाच विलंबाने होत असल्यामुळे पुढील सत्र परीक्षा व त्यांचे निकाल जाहीर करण्यास विलंब होऊन शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
- मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधि अभ्यासक्रम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू केली. मात्र एकच प्रवेश यादी जाहीर करून प्रथम सत्राच्या तासिका सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना काही तासिकांना मुकावे लागून त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
- प्रशासनाचे म्हणणे. – पदव्युत्तर विधि अभ्यासक्रम प्रथम वर्षाची दुसरी व तिसरी प्रवेश यादी पुढील आठवड्यात जाहीर होईल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तसेच नवीन प्रवेश व तासिका सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे आता तासिका सुरू केली आहे’, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
Mumbai University Admission 2025-2026 – The University of Mumbai (MU) has delayed the admission process for the post-graduate first-year law course (LLM) due to the delay in the admission process. As a result, students enrolled in the second and third admission lists will miss out on the initial course.
The University of Mumbai had conducted the LLM pre-admission test on November 17 and 24 at various centres through an online centre-based test (CBT). A few days later, the result of the pre-admission examination was also published on the official website mu.ac.in and the next admission process started. The first admission list was then released in the first week of January 2025. However, the second and third admission lists are yet to be released.
“The second and third admission lists will be released next week and the admission process will be completed. So far, more than 400 students have been admitted. Due to the delay in starting new admissions and hours, we are now starting the hours,” the Mumbai University administration said in a statement. The academic schedule is likely to be disrupted as the entire process itself is delayed.
मुंबई विद्यापीठाकडून विधिची प्रवेश यादी जाहीर; तरीही तासिका आजपासूनच
मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रथम वर्ष विधि अभ्यासक्रमाची (एलएलएम) प्रवेशपूर्व परीक्षा उशिरा घेण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेसही विलंब झाला असून त्या पार्श्वभूमीवर सदर अभ्यासक्रमासाठीची एकच प्रवेश यादी जाहीर करून गुरुवार, २३ जानेवारीपासून तासिकांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश यादीत नाव येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या अभ्यासक्रमाला मुकावे लागणार आहे.
- मुंबई विद्यापीठातर्फे ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा ही १७ आणि २४ नोव्हेंबर रोजी ‘ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट’ ( सीबीटी) पद्धतीने विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. तसेच काही दिवसांनी mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपूर्व परीक्षेचा निकालही प्रसिद्ध झाला व पुढील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानंतर जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध झाली. मात्र अद्याप दुसरी व तिसरी प्रवेश यादी प्रसिद्ध झालेली नाही.
- ‘दुसरी व तिसरी प्रवेश यादी पुढील आठवड्यात जाहीर होईल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. नवीन प्रवेश व तासिका सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे आता तासिका सुरू करीत आहोत’, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण प्रक्रियाच विलंबाने होत असल्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Mumbai University Admission 2025 – The dates of the examinations to be held under various faculties in the summer session of the University of Mumbai have been announced. Degree Level B. com. Session 6 Syllabus Examination 18th March 2025, B.Sc. Session 6 Syllabus Exam 26th March 2025, B. A. Session 6 Syllabus Examination will start from 26th March 2025.
- Through a digital system developed by the Examination Department of Mumbai University. The https://mum.digitaluniversity.ac/ website has already made available to the students through online information about the examination center and examination along with their seat number three months ago.
- Also, provisional admit cards regarding students’ subjects, seat numbers and ancillary details have been made available in the login of the colleges.
- All colleges should check the details of the admit card and contact the university immediately if there are any corrections in it,” said Dr. K.K. Sharma, director of the Examination and Evaluation Board of Mumbai University. Pooja Rundale said.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या ४३९ केंद्रांवर परीक्षा
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बी. कॉम. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा १८ मार्च, बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च, बी. ए. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे.
- बी.एस्सी. माहिती व तंत्रज्ञान सत्र ६ बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च २०२५ रोजी घेण्याचे विद्यापीठाने नियोजित केले आहे.
- दरम्यान, विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी १४ हजार ७२३, वाणिज्य शाखेसाठी ७४ हजार ४८३, विज्ञान २७ हजार १३४, तंत्रज्ञान १३ हजार ४, विधि ८ हजार • ७२५ असे एकूण १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये ७५ हजार ३४६ विद्यार्थी, ६२ हजार ७१७ विद्यार्थिनी आणि इतर ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यांतील एकूण ४३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
- आसन क्रमांकासह परीक्षा केंद्रांची माहिती ऑनलाइन
- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून https://mum. digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर ३ महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या आसन क्रमांकासह परीक्षा केंद्र आणि परीक्षेची माहिती ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- तसेच विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशील याबाबतचे तात्पुरते प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- सर्व महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रातील तपशील तपासून त्यातील काही दुरुस्ती असल्यास तात्काळ विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
Mumbai University LLM Admission 2024 – Mumbai University has revised the schedule of LLM pre-admission exam. The exam, which was scheduled to be held on November 10, will now be held on November 17. The exams for the posts of CO and PO will be conducted through IIBF across the country. The exams will be held from November 7 to 14. The examination has been postponed keeping in mind the interest of the students so that these examinees do not face problems. Pooja Rundale said. Meanwhile, the LLM exam will be conducted online at various centres. At present, more than 4,500 students have submitted online applications for the exam, the university said.
एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलली – मुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. १० नोव्हेंबरला होणारी ही परीक्षा आता १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
देशभरात आयआयबीएफच्या माध्यमातून सीओ आणि पीओ पदांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षार्थ्यांना अडचणी येऊ नये, यासाठी विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. दरम्यान, एलएलएम परीक्षा ऑनलाइन पद्धतीने विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. सद्य:स्थितीत सुमारे ४,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, असेही विद्यापीठाने सांगितले.
Mumbai University PG Admission 2024 Online Apply Here – Mumbai University has announced the registration schedule for the 3- and 4-year undergraduate courses, the first merit list will be released on June 13. The pre-admission online enrolment process for students who want to take admission in the first year of 3 and 4 year undergraduate courses for 2024-2025 in colleges, autonomous colleges and recognized educational institutions affiliated to The University of Mumbai will start from May 25. As per the National Education Policy, the admission process will be conducted in the context of 3-year undergraduate courses 4-year Honours/Honours with Research, five-year Integrated Programmes with Multiple Entry and Multiple Exit. Pre-admission online registration https://muugadmission.samarth. edu.in/ can be done on this website. Registration will begin after 5 p.m.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर
३, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी – मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२४– २०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मेपासून सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम ४ वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्घिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी https://muugadmission.samarth. edu.in/ या संकेतस्थळावर करता येईल. सायंकाळी ५ नंतर नोंदणी सुरू होईल. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
बीबीए, बीएमएस, बीसीएचे प्रवेश सीईटी निकालानंतर
यंदा बीबीए, बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली होती. या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केले जातील. यांचे प्रवेश होणार प्रथमवर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए एमएमसी, बीएसडब्ल्यू, • (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए–एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए–एमए विद्यापीठ (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो–केमेस्ट्री), बीएस्सी (बायो–टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफवायबी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवायबी लायब्ररी सायन्स, बीम्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्स– पाचवर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)
Mumbai University Exam Time Table – वेळापत्रक
- अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन / ऑफलाइन) – २५ मे ते १० जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २५ मे ते १० जून
- ऑनलाइन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख २५ मे ते १० जून, (१ वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाउस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
- पहिली मेरिट लिस्ट – १३ जून (सायंकाळी ५)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – १४ ते २० जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- द्वितीय मेरिट लिस्ट – २१ जून सायंकाळी ५
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे २२ ते २७ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- तृतीय मेरिट लिस्ट २८ जून (सायंकाळी ५)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २९ जून ते ०३ जुलै (दुपारी ३)
- कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन ४ जुलै
Mumbai University Admission 2024 for Post Graduate Courses has been started now. Mumbai University has released the admission schedule for postgraduate courses in all academic departments, affiliated autonomous colleges and recognized institutions. With a view to implementing the admission process of Academic Bank of Credit and courses, the university has included various subjects from all the four faculties in the admission process for postgraduate courses. Candidates Read the complete details given below on this page regarding Mumbai University Admission 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
The university has claimed that the entire online admission process is very easy and transparent. Students can apply by visiting the website https://muadmission.samarth.edu.in/. A video link has been provided on the website to understand the process of admission registration to submission of application.
Mumbai University PG Exam Time Table 2024
- Admission Process Schedule Online Name Registration and Submission of Admission Form from 22nd May to 15th June Online
- Verification of Documents – June 20 (Upto 6 PM)
- Provisional Merit List – 21st June (6 PM)
- Complaint June 25 (up to 1 pm)
- First Merit List June 26 (6 PM)
- Online fee payment from 27 June to 1 July (up to 5 PM)
- Financial Merit List July 2 (6 PM)
- Online Fee Payment – 3rd to 5th July (Upto 5 PM)
- College Start – 1st July
मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ही सर्व ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडीओ लिंक देण्यात आली आहे.
Mumbai University PG Exam Time Table / प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
- ऑनलाइन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर २२ मे ते १५ जून
- कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी – २० जून (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
- तात्पुरती गुणवत्ता यादी – २१ जून (संध्याकाळी ६ वाजता)
- तक्रार २५ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
- पहिली गुणवत्ता यादी २६ जून (संध्याकाळी ६ वाजता)
- ऑनलाइन शुल्क भरणे २७ जून ते १ जुलै ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) द्
- वितीय गुणवत्ता यादी २ जुलै (संध्याकाळी ६ वाजता)
- ऑनलाइन शुल्क भरणे – ३ ते ५ जुलै (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
- कॉलेज सुरु – १ जुलै
Mumbai University PG Admission 2024