मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणीस पुन्हा मुदतवाढ
mumbai University First Year Degree Admission 2020
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणीस पुन्हा मुदतवाढ
The admission process for the first year of Mumbai University degree is underway. The university has once again extended the deadline for pre-admission registration. A circular in this regard has been issued by the University. Earlier, due to rains in Mumbai, the university had extended the deadline for pre-admission registration. Meanwhile, the first quality list in this admission process has been released on Thursday afternoon.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशपूर्व नोंदणी करण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. यापूर्वीदेखील एकदा मुंबईतल्या पावसामुळे विद्यापीठाने प्रवेश पूर्व नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी जाहीर झाली आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना आता ७ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून प्रवेश नोंदणीसाठी संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. हि लिंक विद्यार्थ्यांना १४ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या लिंकमधून विद्यार्थी आपली प्रवेश नोंदणी करू शकतील. जे विद्यार्थी ७ ऑगस्टपासून प्रवेश नोंदणी करतील त्यांना महाविद्यालयांनी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत समाविष्ट करून प्रवेश प्रकियेत सामील करावे, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावे लागतील, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. http://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी प्रवेश पूर्व नोंदणी करू शकतात.
प्रवेशांचे सुधारित सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
मुदतवाढीनंतर प्रवेश पूर्व नोंदणी – ७ ऑगस्ट २०२० ते १४ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; कट ऑफमध्ये वाढ
प्रवेश पूर्व नोंदणी करण्यासाठी थेट लिंक
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; कट ऑफमध्ये वाढ
Mumbai University FY admission 2020
Mumbai University FY Admission 2020: The result of class XII is good this year. The result is visible on the first quality list released today. The first merit list of first-year admissions of Mumbai University degree courses was announced on Thursday at 3 pm. Colleges announced merit lists on their official websites. There has been an increase in the cut off of the arts branch in all colleges.
माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालय वगळता सर्व ठिकाणी कला शाखेची कट ऑफ टक्केवारी वाढली आहे. वाणिज्य शाखांच्या प्रवेशांच्या कट-ऑफमध्येही सरासरी १ टक्क्याने वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशांची कट-ऑफ संमिश्र आहे. काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे.
विद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या यादीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे.
मुंबईतल्या काही नामांकित कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –
जयहिंद कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
एचआर कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
केसी कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
रुपारेल कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
विल्सन कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
सेंट झेवियर्स कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
मिठीबाई कॉलेजच्या कट ऑफसाठी येथे क्लिक करा…
प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mumbai University FY admission 2020
Mumbai University FY admission 2020: The admission process for degree courses of Mumbai University is underway. The university has extended the deadline for registration for admissions to first-year degree courses by one day. This period has been extended till August 5. Students will be able to register till 5 pm on August 5, 2020. This registration has started from 24th July. The first merit list will be announced on August 6 at 11 am. According to the earlier schedule, the first merit list was to be announced on August 4.
मुंबई विद्यपीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी २४ जुलै पासून सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिली मेरीट लिस्ट ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती.
प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर
प्रवेश पूर्व नोंदणी करण्यासाठी थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.