मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त
Mumbai Mantralaya Bharti 2020
मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त
मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
सौर्स : डेली हंट
12 th age ka nokri