MUHS Exam Timetable 2020
MUHS Exam Timetable 2020
MUHS Exam Timetable 2020: Medical Education Minister Amit Deshmukh had announced that examinations for medical courses would be held after July 15. Since then, the Maharashtra University of Health Sciences has announced the schedule of summer session examinations for all medical courses. Accordingly, MBBS exams will be held from July 16 to 22, Dental exams from July 16 to 23, BAMS exams from July 16 to 27 and BHMS exams from July 16 to 25
MUHS Exam 2020: यूजी, पीजी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
MUHS Exam Timetable 2020: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जुलैनंतर घेण्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमबीबीएसच्या परीक्षा १६ ते २२ जुलै, दंतवैद्यकीयच्या १६ ते २३, बीएएमएसच्या १६ ते २७ जुलै आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ते २५ जुलैदरम्यान होणार आहेत.
करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्याची घोषणा केली. याबाबत अद्याप कोणताही लेखी आदेश प्रसिद्ध झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याच काळात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन वैद्यकीय परीक्षांबाबत संमती घेतली. देशमुख यांनी उन्हाळी २०२० परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरू करत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार एमबीबीएसची परीक्षा १६ ते २२ जुलै, दंतवैद्यकीयच्या १६ ते २३ जुलै, बीएएमएसच्या १६ ते २७ जुलै, बीयूएमएस १६ ते २५ जुलै आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाची परीक्षा १६ ते २५ जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे बेसिक बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते १८ जुलै, पी.बी. बीएससी नर्सिंगची परीक्षा १६ ते २० जुलैला होणार आहेत. त्याचप्रमाणे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेसाठी सुरक्षित वावरासहसुरक्षा उपयायोजना लक्षा घेता विद्यापीठाने यंदाच्या उन्हाळी सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक गावातील, नजीकचे पसंतीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु, त्यासाठी कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडून पालकांचे निवासी शहर असल्याचे प्रमाणपत्र व स्वसाक्षांकित अर्ज घेऊन ते १२ जूनपर्यंत विद्यापीठाच्या संबंधित विद्याशाखेच्या इमेलवर पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी केंद्र न मिळाल्यास स्वतःच्याच कॉलेजात परीक्षाकेंद्र असणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.
परीक्षांच्या तारखा
एमबीबीएस – १६ ते २२ जुलै
दंतवैद्यकीय – १६ ते २३ जुलै
बीएएमएस – १६ ते २७ जुलै
बीएचएमएस – १६ ते २५ जुलै
हेल्पलाइन
परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना इमेल, मेसेज आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून कळवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शाखानिहाय हेल्पलाइन क्रमांक विद्यापीठाने संकेतस्थळावर दिले आहेत. तसेच पदवीपूर्व विद्यार्थ्यांना [email protected], पदव्युत्तर विद्यार्थ्यांना [email protected] या मेल आयडीवर विद्यार्थ्यांना मेल करता येणार आहे.