पुणे ST महामंडळात अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती – MSRTC Pune Bharti 2024
MSRTC Pune Bharti 2024 – We are recruiting 1,146 drivers in the fleet to ensure timely delivery of trains to passengers, enhance service and provide better facilities. This will help us provide better passenger services,” said Pramod Nehul, new divisional controller, ST. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
The post of divisional controller, who was the head of the Pune division of ST, was lying vacant for the past several days. Pramod Nehul has recently been appointed to the post by the ST headquarters. Nehul recently took over the position. Wednesday after taking office. On behalf of the ‘leader’, Nehul was consulted and his future role was sought. On this occasion, he said that he would run a passenger-friendly operation and provide as much service as possible in Pune and the area.
पुणे ST महामंडळात अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती
प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन, सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता आम्ही ताफ्यात 1146 चालकांची भरती करत आहोत. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे, असे एसटीचे नवे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एसटीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहूल यांनी नुकताच या ठिकाणी पदभार स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी (दि.20) दै. ‘पुढारी’च्या वतीने नेहूल यांच्याशी संवाद साधून, त्यांची पुढील कामकाजाची भूमिका जाणून घेण्यात आली. या वेळी त्यांनी प्रवासी पूरक कारभार चालवून पुण्यासह परिसरात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा पुरवणार असल्याचे सांगितले.
- योजनांची कडक अंमलबजावणी – यापूर्वी जालनामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे. त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे नेहूल यांनी यावेळी सांगितले.
- सुस्थितीतील एसटी गाड्या मार्गावर आणणार – एसटीच्या ताफ्यात आता नव्या, अत्याधुनिक अशा गाड्या मार्गावर येत आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे जुन्या आयुर्मान संपलेल्या बस गाड्या ताफ्यातून काढून नव्या आणि सुस्थितीतील गाड्या रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही नेहूल यांनी सांगितले.
ST Mahamandal Pune Bharti 2022
MSRTC Pune Bharti 2022: Latest updates regading MRTC Pune Bharti 2022 is that In Maharashtra State Road Transport Corporation Pune there is a total 2400 vacancies are vacant. The recruitment of 2,400 drivers who passed the exam in 2019 is still pending. Read More details regarding MSRTC Pune Bharti 2022/ MSRTC Pune Recruitment 2022 are given below.
एसटी महामंडळातर्फे २४०० चालककांची पदे अद्याप रिक्त
पुणे एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात ४४१६ जागांसाठी भरती निघाली होती. यानंतर उमेदवारांची नियमाप्रमाणे लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील झाली. मात्र, त्यानंतर आलेला कोरोना आणि सत्तांतर यामुळे २४०० पात्र चालक-वाहक अद्याप वेटिंगवर आहेत.
तीन वर्षानंतरदेखील पुढे काहीच होत नसल्याने पात्र उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातच नव्याने कंत्राटी पद्धतीवर ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा यावर्षी केली आहे. २०१९ च्या उमेदवारांचाच अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना, पुढील उमेदवारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
२४०० चालकवाहकांची भरती लटकली
२०१९ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४०० चालकवाहकांची भरती अजूनही रखडली आहे. त्यातदेखील पात्र उमेदवार वैद्यकीय चाचणी झाल्याचे सांगतात, तर एसटी प्रशासन अद्यापही वैद्यकीय चाचणी झालेली नसल्याचे सांगत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून उत्तीर्ण होऊनहीं नोकरी लागत नसल्याने लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यासंबंधीचे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. मध्यवर्ती कार्यालयातून जोवर आदेश येत नाही, तोपर्यंत यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यांच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया होईल.
– रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे
MSRTC Pune Bharti 2024