MSCE Scholarship -१२ फेब्रु. होणाऱ्या इयत्ता ५वी, व ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्र येथून डाउनलोड करा
MSCE Pune 5th & 8th Class Scholarship Exam 2023
MSCE Pune Scholarship Hall Ticket 2023
MSCE Pune Scholarship Admit Card 2023 available for downloading. The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class 5) and Pre-Secondary Scholarship Examination (Class 8) will be conducted on the same day on 12th February 2023 in all the districts of the state. The necessary admit cards for this examination have been made available by the examination board.
MSCE Pune 5th & 8th Class Scholarship Exam 2022
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिली आहेत. ही प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. त्यामुळे लवकरच शाळांमार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत.
MSCE Scholarship 5th & 8th Class Admit Card
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या १२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शाळा मुख्याध्यापकांनी शाळेच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्रे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तत्काळ पोचवावीत, अशी सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ५२ हजार ५२८ शाळांमधील पाचवीच्या पाच लाख ३२ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या तीन लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर शाळांना शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध
MSCE Pune Scholarship Hall Ticket 2023