MPSC Exam: MPSC परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार

MPSC Civil Engineering Exam Answer Key

The Maharashtra Public Service Commission has taken important steps to ensure transparency from the conduct of competitive examinations to the results. All the information such as scanned copy of the original answer sheet of the candidates in the Maharashtra Civil Engineering Service Pre-Examination, marks given have been made available on the website of the Commission. This will allow the candidate to analyze his score.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MPSC कर सहायक, लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्वाचा बदल

MPSC परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार

स्पर्धा परीक्षेच्या आयोजनापासून ते निकालापर्यंत पारदरर्शकता राहावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण अशी सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे उमेदवाराला आपल्या गुणांकणाचे विश्लेषण करता येईल.

मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत संकेतस्थळावर उपलब्ध

मागील अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात होती. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच मागील काही महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर करताना जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच दिलेले गुण एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ही परीक्षा 27 मार्च रोजी घेण्यात आली होती. उमेदवारांना https://mpsc.gov.in या वेबसाईटवर स्कॅन प्रत पाहता येईल. पारदर्शकता ठेवण्यासाठी आयोगाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.


MPSC PSI Exam Interview Schedule and Physical Test

MPSC PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा तारखा जाहीर

The Maharashtra Public Service Commission (Maharashtra Secondary Service) had announced the dates for the physical test and interview for the PSI post. The main examination for the PSI post was held in 2019. The first phase of physical examination for the post of PSI will be conducted at Pune, Nashik and Kolhapur from 19 Nov 2021 to 03 December2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, यांसंदर्भातील तपशीलवार कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमदेवारांची शारिरीक चाचणी पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथं घेण्यात येईल.

Check MPSC PSI Interview Schedule List


Maharashtra Secondary Service Non-Gazetted Joint Pre-Examination

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाकडून महत्त्वाची अपडेट

This is great news for students preparing for the Maharashtra Public Service Commission exams. The Commission has given important information regarding Maharashtra Secondary Service Non-Gazetted Joint Pre-Examination. The work of preparing the answer sheet of the joint group B pre-examination held on September 4 is in the final stage. The main exam will be held in January 2022 after the results of Group B joint pre-examination, the commission said in a tweet.

MPSC PSI Bharti-महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ अपडेट्स

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आयोगानं महत्त्वाची माहिती दिली आहे. 4 सप्टेंबरला झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची उत्तर तालिका तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालानंतर जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्य परीक्षा

एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका प्राथम्याने अंतिम करण्यात येत आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

MPSC PSI Physical Test Date

एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर

Maharashtra Public Service Commission (Maharashtra Secondary Service) has announced the dates of physical test for the post of PSI. The main examination for the PSI post was held in 2019. Physical test for PSI post will be conducted in Pune, Nashik and Kolhapur from 19 November to 03 December 2021.

 तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया 

  • तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे.  2019  साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती.
  • त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती.  कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.


MPSC Exam Merit List

Following in the footsteps of the Central Public Service Commission (UPSC), the Maharashtra Public Service Commission (MPSC) has said that it will now publish a general merit list for all recruitment processes. In it, the Commission has mentioned that for the recruitment process of multi-class posts, the final recommendation list will be made by soliciting the preference of the posts from the eligible candidates on the basis of general merit list.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात “एमपीएससी’ने यापुढे सर्व भरती प्रक्रियेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेत पदे अडविली जाण्याच्या प्रकारांना चाप बसणार असल्याची चिन्हे आहेत.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीवर विचार करून निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रक “एमपीएससी’ने प्रसिद्ध केले आहे.
  • यूपीएससीच्या धर्तीवर आता “एमपीएससी’कडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यात बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्याद्वारे अंतिम शिफारस यादी करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
  • दरम्यान, लेखी परीक्षा मुलाखतीतील गुणाबाबत माहिती नसल्याने उमेदवाराकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ, सेवेत असलेल्या उमेदवाराची त्याच पदासाठी किंवा त्याच संवर्गातील पदासाठी निवड होते.
  • मात्र, आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदे अडवली जाण्याचे प्रकार थांबणार असल्याचे दिसून येत आहे.

 लवकर निकाल जाहीर होण्यास मदत

आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार मुलाखती झाल्यावर शिफारसपात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र, आता पदांचा पसंतीक्रम गुणवत्ता यादीनंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


MPSC Exam 2021

 पुणे : महाराष्ट्र वनसेवा परीक्षांतर्गत वनक्षेत्रपाल पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा नव्याने खुल्या केलेल्या प्रेफरन्स लिंकमध्ये काही समकक्ष अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधारकांना वनक्षेत्रपाल पदासाठी वगळण्याची भूमिका घेतली होती. आता त्यापैकी गणित विषयासह बारावी विज्ञान व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आल्याची घोषणा एमपीएससीने केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे पद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

 जाहिरातीत वनक्षेत्रपाल पदासाठी नमूद मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी अभियांत्रिकी शाखेच्या समकक्ष इतर अभियांत्रिकी शाखा उत्तीर्ण उमेदवारांना पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत देता आली. मात्र, अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याआधीच त्यांना वगळण्यात आले. अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली होती. यामुळे हातातोंडाशी आलेला घास एमपीएससी हिरावून घेणार होती. मात्र, याचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच याबाबतचे वृत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले.


मुख्य परीक्षेच्या तारखा एमपीएससीने केल्या जाहीर

The State Service Main Examination to be conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC) will be held from 4th to 6th December, while the Maharashtra Civil Engineering Service Main Examination will be held on 18th December, ‘informed the MPSC administration.

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबर रोजी, तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार आहे,’ अशी माहिती एमपीएससी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020

मुख्य परीक्षेच्या तारखा एमपीएससीने जाहीर केल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल सहा सप्टेंबरला जाहीर झाला. सहायक राज्यकर आयुक्‍त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्‍त, उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, नायब तहसीलदार अशा विविध पदांसाठी एकूण २०० जागांसाठी राज्य सेवा परीक्षा घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी झाली. एकूण २१८ पदांसाठी घेण्यात असलेल्या या पूर्व परीक्षेचा निकाल तीन सप्टेंबरला जाहीर झाला. दोन्ही पूर्व परीक्षांचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यामुळे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे लक्ष मुख्य परीक्षेकडे लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा ४ ते ६ डिसेंबरला, तर स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १८ डिसेंबर रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार असल्याचे परिपत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केले आहे.



The Maharashtra Public Service Commission (MPSC) is scheduled to conduct competitive examinations in 2022 at the end of November, So students will have enough ideas to prepare for next year’s exams.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेशी कल्पना येणार आहे.

नोव्हेंबरमध्ये येणार वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांच अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोगाकडून पुढील वर्षाच अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं जातं, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर होत असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षांचा अंदाज येणार आहे.

मुख्य परीक्षांच्या तारखा लवकरच

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० या दोन परीक्षांच्या तारखा येत्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. याबाबतची माहितीही ‘एमपीएससी’ने अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


This is great news for students preparing for the Maharashtra Public Service Commission exams. Maharashtra Secondary Service Non-Gazetted will be held on the date fixed by the Joint Pre-Examination Commission. The Disaster Management Department allowed the examination to take place, paving the way for the examination. The Joint Group B pre-examination will be held on 4th Sept 2021.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोगानं निश्चित केलेल्या तारखेलाच होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला होता. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून परीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.

ॲडमिट कार्ड जारी, परीक्षेपूर्वी 1 तास हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला आयोजित केली जाणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 4 सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा होणार असून आता वेळापत्रकात बदल होणार नाही, असं देखील सागंण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.

पुढील अपडेटससाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

Download MPSC Secondary Service Non-Gazetted Exam Admit card


Candidates will be able to update their e-mail IDs and mobile numbers from next week. Once this facility becomes available, candidates will be able to update their account manually.Candidates have already been instructed to update the account password and account details on the website of the online application system of the State Public Service Commission.

राज्य लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील खात्याचा पासवर्ड व खात्यातील तपशील अद्ययावत करण्याची सूचना उमेदवारांना यापूर्वी देण्यात आली आहे. या सूचनेनुसार खाते अद्ययावत करत असताना जुन्या खात्यामध्ये नोंदविलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचे नोंदविल्याने, ज्ञात नसल्याने किंवा दोन्ही बंद असल्याने ओटीपी प्राप्त होण्यास आणि पर्यायाने पासवर्ड बदलण्यामध्ये उमेदवारांना गेल्या काही दिवसांत अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळावर उमेदवारांचे खाते अद्ययावत करताना उमेदवारांना अडचणी येत आहेत. दरम्यान येत्या चार सप्टेंबर रोजी ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र नवीन संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्याव्यतीरिक्त अन्य सुयोग्य पद्धतीने संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पासवर्ड बदलून खाते अद्ययावत करता येत नसल्यामुळे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी बदलून मिळावा, याकरिता उमेदवारांकडून आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असलेल्या कॉल्समुळे टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त राहत असल्याने आयोगाच्या सुविधा केंद्राकडून उमेदवारांना इच्छित सेवा पुरविण्यातही अडचणी येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर परीक्षा आल्याने परीक्षेसाठीप्रवेशप्रमाणपत्र आपल्याला मिळणार का?, असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे. त्यावर आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

उमेदवारांना स्वत: ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा पुढील सप्ताहापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना स्वत: खाते अद्ययावत करता येणार आहे, असेही आयोगाने कळविले आहे.



MPSC Retotaling Application Form

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणांची फेरतपासणीसाठी अर्ज सादर करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले  आहे.  उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांच्या नावासह सुधारित यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलीय. जे उमेदवार शारीरिक आणि मुलाखतीमध्ये पात्र आहेत, त्यांच्या गुणांचे मार्कशीट ऑनलाईन सुविधांमध्ये( Online Facilities) उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षेतील गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  22 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.

Full Notification


MPSC Registration For Various Exam

Maharashtra Public Service Commission has extended the deadline for registration of priorities for 413 posts. Maharashtra Public Service Commission has issued a circular in this regard. Students are given two days to register their preferences.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 413 पदांसाठी मागवलेल्या प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांसदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्यास दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 413 पदांसाठी मागवलेल्या प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांसदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्यास दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

दोन दिवसांची मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम आयोगाला कळवण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आलीय. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 व राज्य सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांतील पदांचा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना नोंदवावा लागणार आहे.

दुसरीकडे राज्य सेवा परीक्षा 2019 च्या मुलाखतींच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांच्या नावासह यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलीय.

State Service Main Examination-2019 – Interview Schedule- Newly Qualified Candidates as per Revised Result


MPSC Recruitment 2021

The posts of Deputy Registrar, Stamp Inspector will now be filled by the Maharashtra Public Service Commission. The decision was taken at a cabinet meeting on Wednesday. Earlier, these posts were being filled through direct service.

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. हा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ही पदे सरळसेवेतून भरली जात होती.

नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील सरळ सेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात भरती

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या विभागात १६ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. उमेदवाराच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांसदर्भातील माहिती https://mpsc.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.


MPSC Application Form

A new application system has been developed by the Commission through its website. Accordingly, the Commission decided to make some changes in the application process. Until now, candidates did not have to upload documents and certificates while filling up the application. However, the commission has mentioned in the instructions regarding registration in the recruitment process that documents and certificates have to be uploaded while filling the application.

कागदपत्रे, प्रमाणपत्रांसंदर्भात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील त्या पदांच्या पूर्व परीक्षेच्या अर्जासह उमेदवारांना त्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, कागदपत्रे, प्रमाणपत्रांशिवाय उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

आयोगाकडून संके तस्थळाच्या माध्यमातून नवी अर्ज प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयोगाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत उमेदवारांना अर्ज भरताना सोबत कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करावी लागत नव्हती. मात्र आता अर्ज भरतानाच कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी लागणार असल्याचे आयोगाने पदभरती प्रक्रियेतील नोंदणीसंदर्भातील सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ऑनलाइन अर्जासाठी आयोगाच्या संके तस्थळाद्वारे अर्ज सादर करताना शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच अर्ज करावा लागेल. आयोगाच्या अर्ज प्रणालीवर नोंदणी केलेली नसल्यास आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करावे लागेल.

खात्याद्वारे केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता पडताळणी के ल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना सोबत अपलोड करायची शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा पुरावा, आरक्षणासंदर्भातील पुरावा, क्रिमिलेयर किं वा नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र पुरावा, दिव्यांग असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाचा पुरावा, अनाथ आरक्षण पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदलाचा पुरावा आदी कागदपत्रे-प्रमाणपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

MPSC Bharti 2021

As per the latest news to fill the vacancies in the service of the State Government. Deputy Chief Minister Ajit Pawar today directed the concerned departments to send proposals to the MPSC by August 15. This has paved the way for taking MPSC exams and the number of seats is also likely to increase.

MPSC Bharti -MPSCच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

MPSC Bharti – MPSC परीक्षांसाठी जागा वाढण्याची शक्यता: रिक्त पदे भरण्यास मान्यता

 राज्य सरकारच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे (MPSC) संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिले. यामुळे एमपीएससी परीक्षा घेण्याचा मार्ग खुला झाला असून जागांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

 राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

 ‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!