MPSC जुलै- ऑगस्टमध्ये होणारी ‘ही’ मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन
The Main Exam For MPSC In July-August Will Be Online
MPSC Online Exam: As per Latest News Maharashtra State Public Service Commission, State Service Pre-Examination, Engineering Service Pre-Examination, and Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination will now be held on March 14, March 27, and April 11. However, the commission has decided to conduct the upcoming main exam online so that the results can be taken on time and twice a year. The first experiment will be conducted through the Engineering Service Examination to be held in July-August.
खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजनानुसार आता 14 मार्च, 27 मार्च आणि 11 एप्रिलला राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, आता निकाल वेळेत लागावा, एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून आयोगाने आगामी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्चित केले आहे. जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून पहिला प्रयोग केला जाणार आहे.
MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 6 संधी
30 हजार पदे रिक्त, तरीही मागणीपत्रे नाहीत
राज्यातील सुमारे 28 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या पार्श्वभूमीवर दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सप्टेंबरपासून त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली जाते. त्यानुसार आयोगाकडून परीक्षांचे नियोजन होते. राज्यातील विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्त असून त्यात प्रथम व द्वितीय श्रेणीतील 30 हजारांहून अधिक पदे आहेत. मात्र, यंदा कोणत्याही विभागाने आयोगाला मागणीपत्र दिले नसल्याने या वर्षातील परीक्षा पुन्हा विलंबानेच होतील. आयोकडून मागणीपत्रासाठी पाठपुरावा सुरु आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी आणि मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेली स्थगिती, यामुळे राज्य सरकारने रिक्त पदांची मागणीपत्रे दिली नसल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
सरळसेवा भरती MPSC मार्फतच करा !
‘एमपीएससी’तर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहायक, दुय्यम निरीक्षक (संयुक्त सेवा परीक्षा, गट- क) अशा परीक्षा घेतल्या जातात. राज्यभरातील सुमारे 30 लाखांपर्यंत विद्यार्थी या परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना आयोगाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, त्याची तपासणी आणि निकालासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑफलाइन होत असल्याने परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालासाठी चार- सहा महिन्यांचा कालावधी जातो. या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येते. आता आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहावेळाच परीक्षा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. सुरवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षेत हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करुन आगामी सर्वच मुख्य परीक्षा ऑनलाइन होतील, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
MPSC Preparing For Conducting Online Exam
The recruitment process for non-gazetted posts in the state should be carried out by the Maharashtra Public Service Commission (MPSC) or the MahaIT department. For this, MPSC has started a tender process to appoint a private IT company like the MahaIT department. Since the MPSC has been conducting offline exams so far, the students had the support of the MPSC. However, now that the MPSC is preparing for the online exams
एमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा
महाराष्ट्र लोक सेवा आयोग भरती 2020
राज्यात अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राबवाव्या की महाआयटी विभागाने, याबाबत राज्यात विद्यार्थ्यांचे दोन गट पडले असतांनाच, आता एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एमपीएससीने महाआयटी विभागाप्रमाणे खासगी आयटी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला सुरुवात केली आहे. एमपीएससीकडून आतापर्यत ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला पाठिंबा होता. मात्र, आता एमपीएससीनेच ऑनलाइन परीक्षांची तयारी केल्याने, राज्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
MPSC, UPSC प्रशिक्षणही होणार आता ऑनलाइन
सध्याच्या परिस्थितीत एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खासगी कंपनीची निवड केली जाणार आहे.ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल. या ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष नियंत्रण कक्ष एमपीएससीच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, असे निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पदभरतीची प्रक्रिया होणार आहे की नाही, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारांचा सोईसाठी MPSC मार्फत लवकरच येणार अॅप
एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी एमपीएससी प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर, छोट्या स्वरुपाच्या परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात येईल.