MPCB महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ निकाल जाहीर, लिंक – MPCB Exam Result
MPCB Exam Result Declared now. MPCB Maharashtra Pollution Control Board Result has been announced. Notification Of MPCB Exam Result – 2024 is given here.
MPCB महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ निकाल जाहीर करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून विविध पदांचा निकाल पहा..
https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024
सरळसेवा पदभरती परिक्षा सूचना –
- म.प्र.नि. मंडळाच्या दि. २९/१२/२०२४ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून IBPS या संस्थेमार्फत दि. २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या ११ पदांच्या परिक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना प्राप्त गुणांची पदनिहाय यादी IBPS संस्थेकडून प्राप्त झाली असून, सदर यादी मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
- सदर यादी केवळ, उमेदवारांना लेखी परिक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची आहे. प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी व पुढील निवड प्रक्रिया याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार लवकरच मंडळाच्या संकतेस्थळावर अवगत करण्यात येईल. तसेच कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्राविण्यता चाचणी (Proficiency Test) चे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
- टिप :-
- ही फक्त परिक्षेत प्राप्त गुणांची यादी आहे, गुणवत्ता अथवा निवड यादी नाही. २. सर्व पदांसाठीची प्रवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रचलित शासन निर्णयातील
- तरतुदीनुसार लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. गुणवत्ता यादी प्रसिध्द झाल्यानंतर गट-‘अ’ मधील पदांच्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात येईल.
- गट-‘ब’ व गट-‘क’ च्या गुणवत्ता यादीतील प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात येईल.
- वरील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करण्यात येईल.
MPCB Exam Result