मध्यप्रदेश शिक्षकांची 22 हजार 400 पदे भरलीत – MP Teacher Recruitment 2023
Madhya Pradesh Teacher Recruitment 2023
Madhya Pradesh Teacher Recruitment 2023
MP Shikshak Bharti 2023 updates – The campaign to provide government jobs to the youth of Madhya Pradesh is going on in full swing. The Prime Minister informed that thousands of youths have been recruited for various posts by organizing job fairs in various districts and more than 22,400 youths have been recruited for the post of teachers. The Prime Minister was speaking while addressing a program for newly appointed teachers in Madhya Pradesh through video conferencing. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
मध्यप्रदेश शिक्षकों के 22 हजार 400 पद भरे गए हैं|
मध्यप्रदेश के युवाओं को सरकारी नौकरी दिलाने का अभियान जोरों पर चल रहा है। प्रधानमंत्री ने बताया कि विभिन्न जिलों में रोजगार मेलों का आयोजन कर हजारों युवाओं की विभिन्न पदों पर भर्ती की गई है और शिक्षकों के पद पर 22,400 से अधिक युवाओं की भर्ती की गई है. प्रधानमंत्री वीडियो कांफ्रेंसिंग के माध्यम से मध्य प्रदेश में नवनियुक्त शिक्षकों के लिए एक कार्यक्रम को संबोधित कर रहे थे.
Madhya Pradesh Teacher Recruitment 2023 Details
- केंद्र सरकारने आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.”हे धोरण मुलांचा सर्वांगीण विकास, ज्ञान, कौशल्ये, संस्कृती आणि भारतीय मूल्यांच्या संवर्धनावर भर देते” असे सांगून मोदी यांनी हे धोरण प्रभावीपणे राबवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. मध्य प्रदेशातील मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती मोहीम या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
- आज नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास निम्म्या शिक्षकांना आदिवासी भागात नियुक्ती दिली जाईल, यामुळे आदिवासी मुलांना यांचा लाभ होईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मध्य प्रदेश सरकारने यावर्षी 60 हजार शिक्षकांसह 1 लाखाहून अधिक सरकारी पदांची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याने राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणात शैक्षणिक गुणवत्तेत मोठी झेप घेतली आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. जाहिरातींवर पैसा खर्च न करता राज्य 17 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी विद्यार्थी,शिक्षक आणि मध्य प्रदेश सरकारचे अभिनंदन केले.
- रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकार कौशल्य विकासावर विशेष भर देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे उघडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूदी नुसार देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे उघडली जातील.
- या केंद्रात तरुणांना नव्या युगाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाईल,असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जीवनात आई किंवा शिक्षकांच्या प्रभावाप्रमाणे त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करावे, असे पंतप्रधानांनी आज नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांना संबोधित करताना सांगितले. तुमचे शिक्षण केवळ वर्तमानच नव्हे तर देशाचे भविष्य देखील घडवेल हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे,असे मोदी म्हणाले. शिक्षकांनी दिलेले शिक्षण केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही तर समाजातही सकारात्मक बदल घडवून आणेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.