MMRDA Job Fair For 17 Thousand Posts

MMRDA कंत्राटदारांकडील १७ हजार पदांची भरती, ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे

MMRDA Online Job Fiar: Under the Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Pandit Deendayal Upadhyay Online Job Melava is being organized by the Skill Development Department for the recruitment of about 17,000 vacancies from various contractors. In the first phase, 2 thousand 923 posts will be filled. For this Thane District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center office from 6th to 8th July 2020 and Mumbai Suburban and Mumbai City Offices from 8th to 12th July 2020 from 10 am to 06 pm. An online job fair has been organized on the web portal https: //www.rojgar.mahaswayam.gov.in

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MMRDA Bharti 202016, 726 Vacancies

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (MMRDA) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या (17 thousand vacancies) भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Online job melava) आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

  1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
  2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
  3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
  5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
  6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Amol Subhash Pitrubhakta says

    I Am Interested Job Supervisor

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!