एमएमआरडीएचे सहा वर्षांत ३० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, वाचा संपूर्ण माहिती..! MMRDA Job
MMRDA Job Opportunity
MMRDA How much employment in which sector?
- 10 lakhs in seven service areas
- Housing 3 lakhs
- Tourism 7 lakhs
- 6 lakh for port development
- 3 lakhs for infrastructure projects
- Another 1 lakh
- 30 lakhs in total
एमएमआरडीएचे सहा वर्षांत ३० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, वाचा संपूर्ण माहिती..!
केंद्र सरकार आणि ‘निती’ आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर प्रदेशाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र (ग्रोथ हब) म्हणून विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रारूप आराखडा तयार केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात २०४७ पर्यंत दोन कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असून त्यापैकी ३० लाख संधी २०३० पर्यंत उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सेवा क्षेत्रासह गृहनिर्माण, बंदर विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रांत ही रोजगारनिर्मिती केली जाणार आहे.
- एमएमआर ग्रोथ हब नेमके कसे असेल याबाबत एमएमआरडीएने अलीकडेच दिल्लीत प्रारूप आराखड्यावर आधारित सादरीकरण केले. त्यानुसार पाच जिल्ह्यांमधील ६३२८ चौरस किमीचे क्षेत्र विकास ग्रोथ हब म्हणून विकसित केले जाणार आहे. सध्या १४०० कोटी डॉलरवर असलेली एमएमआरची अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ३००० कोटी डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०४७ पर्यंत ती दीड लाख कोटी डॉलरवर न्यायचे लक्ष्य आहे. हे ध्येय गाठण्यासाठीच औद्याोगिक क्षेत्रांचा विकास (पान १० वर) (पान १ वरून) केला जाणार असून पर्यटन, बंदर, बांधकाम क्षेत्रांना चालना दिली जाणार आहे.
- या माध्यमातून २०३० मध्ये नवीन ३० लाख रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. याला एमएमआरडीएतील सूत्रांनी दुजोरा दिला. सध्या एमएमआरमध्ये सुमारे एक कोटी लोकांना रोजगार आहे. त्यात २०३० पर्यंत ३० लाखांची वाढ होईल व स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीवेळी, २०४७ सालापर्यंत आणखी ७० लाखांनी वाढ होऊन आजपेक्षा दुप्पट रोजगार उपलब्ध असतील.
- ‘निती’ आयोगाच्या शिफारसीनुसार एमएमआरडीएने प्रारूप आराखडा तयार केला असून त्यामध्ये २०३० सालापर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कोणत्या क्षेत्रात किती रोजगार?
- सात सेवा क्षेत्र १० लाख
- गृहनिर्माण ३ लाख
- पर्यटन ७ लाख
- बंदर विकास ६ लाख
- पायाभूत सुविधा प्रकल्प ३ लाख
- अन्य १ लाख
- एकूण ३० लाख
MMRDA कंत्राटदारांकडील १७ हजार पदांची भरती, ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे
MMRDA Online Job Fiar: Under the Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Pandit Deendayal Upadhyay Online Job Melava is being organized by the Skill Development Department for the recruitment of about 17,000 vacancies from various contractors. In the first phase, 2 thousand 923 posts will be filled. For this Thane District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center office from 6th to 8th July 2020 and Mumbai Suburban and Mumbai City Offices from 8th to 12th July 2020 from 10 am to 06 pm. An online job fair has been organized on the web portal https: //www.rojgar.mahaswayam.gov.in
MMRDA Bharti 2020–16, 726 Vacancies
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (MMRDA) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या (17 thousand vacancies) भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Online job melava) आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.
अर्ज कसा करावा
- राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
- तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
- त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
- त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.
MMRDA Job Opportunity
I Am Interested Job Supervisor