MJPRF 2022- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – अर्ज करा
Mahatma Jyotiba Phule Research Scholarship
Mahatma Jyotiba Phule Research Scholarship (MJPRF) has provide Scholarship for PhD in Non-Criminal Group, Other Backward Classes, Deprived Castes, Nomadic Tribes and Special Backward Classes in Maharashtra for Years. Applicansts who want to apply for these scholarship may apply through the given link before the last date. The last date for submission of application form is 31st May 2022. More details as given below.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष 2022-23
MJPRF 2022-2023
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम ५ वर्षांच्या कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) प्रदान करण्याकरिता महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मदत : दि.३१ मे २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
लाभार्थी निकष:Mahatma Jyotiba Phule Research Fellow
- १. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. २. उमेदवार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी नॉन
- क्रिमिलेअर गटातील असावा. ३. उमेदवाराने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय/संस्था मार्फत उत्तीर्ण
- केलेली असावी. ४. उमेदवार व्यक्तीने पी.एचडी धारण करण्याकरिता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय
- संस्था येथे नोंदणी (Confirmation) केलेली असावी. नोंदणी (Confirmation) नसलेली व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. ५. उमेदवार पी.एचडी धारण करण्याकरिता आधीच कोणतेही विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था / सारथी
- संस्था किंवा तत्सम इतर कोणतीही संस्था यांचेकडून अर्थसहाय्य अथवा अधिछात्रवृत्ती प्राप्त करत
- असल्यास असा उमेदवार योजनेच्या लाभाकरिता पात्र राहणार नाही. ६. उमेदवार व्यक्ती पी.एचडी करीत असलेल्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाचा पूर्णवेळ अथवा
- अर्धवेळ रोजगार / स्वयंरोजगार करीत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य / मानधन ) शिष्यवृत्ती घेत असल्यास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. ७. दि.१ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ज्या उमेदवाराने UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयात पी.एचडी करीता नोंदणी करून Confirmation for PhD चे पत्र
- प्राप्त केलेले आहे, असे उमेदवार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. ८. उमेदवाराकडे RRC/RAC कडून विषय मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झालेले असणे आवश्यक आहे. ९. ज्या उमेदवारांचे प्रवेश केवळ तात्पुरता (Provisional)आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
Sir please, extend the submission of application form….. Please sir