एमएचटी-सीईटीच्या ऑनलाइन अर्जांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत, ९ ते २७ एप्रिल या कालावधीत परीक्षा – MHT CET Admission 2025
MHT CET Exam 2025 Registration @ https://mahacet.org
MHT CET Exam 2025 Registration – The State Common Entrance Test Cell has released the tentative schedule of entrance examinations for professional courses to be held in the academic year 2025-26. After this, the student registration process of MHT- CET, which is required for admission to engineering, technology, pharmacy, agriculture courses, has also been started and the deadline to fill the application form is February 15.
The last date for payment of exam fee is February 16 to February 22, including late fees, and February 23, online. It was clarified that the online application registration schedule and information booklet for the examination will be made available on the website of CET Cell.
एमएचटी-सीईटीच्या ऑनलाइन अर्जांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत – ९ ते २७ एप्रिल या कालावधीत परीक्षा
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी- सीईटीची विद्यार्थी नोंदणी प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे.
- सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र – शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी, तीन वर्षे विधी अभ्यासक्रम अशा काही अभ्यासक्रमांच्या सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीईटी सेलच्या नियोजनानुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे.
- परीक्षा शुल्कासाठी २३ फेब्रुवारी अंतिम मुदत – विलंब शुल्कासह १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी, तर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी २३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
MHT CET Exam 2025 – In the online vacancy for admission to BAMS, BUMS, BHMS, courses conducted between December 11 and December 19, some students did not take admission in those seats despite getting a college. Also, one college each of BAMS and BHMS courses has been newly approved this year. This has made 100 seats available for BAMS course and 60 seats for BHMS course. Those seats have been included in the admission process there. So this special round will be held.
BAMS & BHMS Admission 2025 schedule will be like this
- College options can be selected till 23rd December for the admission round.
- The merit list will be announced on December 24
- Admission can be done between 25th December to 28th December by going to the college with the documents
- The deadline for entry will be 31st December.
बीएएमएस, बीएचएमएसच्या प्रवेशासाठी विशेष फेरी नोंदणीचा आज शेवटचा दिवस; उद्या गुणवत्ता यादी जाहीर होणार
वैद्यकीय शिक्षणाच्या एएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला सीईटी सेलने सुरुवात केली असून आज, सोमवारी नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे. तर २४ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
बीएएमएस, बीयूएमएस बीएचएमएस, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ऑनलाइन रिक्त फेरीत काही विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळूनही त्या जागांवर प्रवेश घेतले नव्हते. तसेच बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी एका कॉलेजला यंदा नव्याने मान्यता मिळाली आहे. त्यातून बीएएमएस अभ्यासक्रमासाठी १०० जागा, तर बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी ६० जागा नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. त्या जागांचा तेथील प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही विशेष फेरी घेतली जाणार आहे.
BAMS & BHMS Admission 2024- असे असेल वेळापत्रक
- प्रवेश फेरीसाठी २३ डिसेंबरपर्यंत कॉलेजचे पर्याय निवडता येणार.
- गुणवत्ता यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार
- कागदपत्रांसह कॉलेजमध्ये जाऊन २५ डिसेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार
- प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असेल.
…तर कारवाई – विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना नव्याने कॉलेजचे पर्याय निवडावे लागणार आहेत. गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. तसेच जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय निवडताना विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशाच कॉलेजचे पर्याय द्यावेत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
….या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रीया – एमएड, एमपीएड, एमबीए / एमएमएस, एलएलबी ३ वर्षे, एमसीए, बीएड, बीपीएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, बीए एड, बीएससी बीएड, बीएड, एमएड, बी डिझाइन.
आठवडाभरात सीईटी नोंदणी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. सीईटी व्यावसायिक सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यंदा या प्रवेश परीक्षांना १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याचे तात्पुरते वेळापत्रक सीईटी सेलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. आता या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला या आठवड्यापासून सुरुवात केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. यंदा सीईटी सेलकडून कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या चार विभागांच्या १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मे अखेरपर्यंत या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन सीईटी सेलने केले आहे.
MHT CET 2025-2026 Online Registration Process will be started from next week. The registration process for the entrance examinations conducted by the state CET cell for admission to various professional courses will begin soon. The CET cell released the tentative schedule for next year’s exams in November. According to this schedule, the examinations for various subjects will start from March. The entrance test for 19 professional courses in four departments of arts, technical education, higher education and medical education is conducted by the CET cell.
सीईटी नोंदणी आठवडाभरात, संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये सुरू होणार सीईटी
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सीईटी कक्षाने नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षांच्या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुस मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या चार विभागांच्या १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी कक्षाकडून घेतली जाते.
- या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, यासाठी यंदा सीईटी कक्षाने २७ नोव्हेंबर रोजी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. १६ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत.
- या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात होणाऱ्या सीईटी परीक्षांसाठीची नोंदणी २३ ते २७ डिसेंबर या दरम्यान होणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता राज्य सीईटी कक्षातील अधिकाऱ्यांकडून सांगितले.
- अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया – एमएड, एमपीएड, एमबीए / एमएमएस, एलएलबी ३ वर्षे, एमसीए, बीएड, बीपीएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, बीए एड, बीएससी बीएड, बीएड, एमएड, बी डिझाइन
- एमएचटी सीईटी नोंदणी जानेवारीत – एमएचटी सीईटी या महत्त्वाच्या परीक्षेसाठी दरवर्षी साधारण सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी होते. या परीक्षेला महाराष्ट्रासह परराज्यांमधूनही विद्यार्थी अर्ज करतात. या परीक्षेसाठीची नोंदणी १ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षा १४ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान आणि आरोग्यविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा ९ ते १७ एप्रिल दरम्यान होणार आहे.
MHT CET Exam Time Table 2025 – The CET cell has announced the tentative schedule of entrance exams three months ago so that students can prepare for these exams if they know the schedule of CET exams. The CET cell has released the schedule of 19 exams on its website. This year, the CET cell will conduct the exam for M.Ed and M.P.Ed courses on March 16. The CET cell has proposed to conduct the MHT CET exam of PCB Group from April 9 to April 17 and pcm group from April 19 to April 27, while the CET examination for MBA and MMS courses is proposed to be held from March 17 to March 19.
सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जारी , इंजिनीअरिंग, फार्मसीच्या प्रवेश परीक्षा १६ मार्चपासून
राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आगामी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी परीक्षा) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेची सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेण्याचे सीईटी सेलने प्रस्तावित केले आहे.
राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून दरवर्षी घेतली जाते. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. सीईटी सेलने १९ परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा सीईटी सेलकडून एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांची परीक्षा १६ मार्चला घेतली जाणार आहे. सीईटी सेलकडून पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे, तर एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घेण्याचे प्रस्तावित केले आहे.
MHT CET Exam Time Table 2025
- सीईटी परीक्षा = संभाव्य तारखा
- इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी = ९ एप्रिल ते २७ एप्रिल
- एलएलबी ३ वर्ष = २० मार्च ते २१ मार्च
- एमबीए, एमएमएस = २३ मार्च
- एमसीए = १७ मार्च ते १९ मार्च
- बी. डिझाइन = २९ मार्च
- बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस = १ एप्रिल ते ३ एप्रिल
- एलएलबी ५ वर्ष = ४ एप्रिल
- एएसी फाइन आर्ट = ५ एप्रिल
- बीएससी नर्सिंग = ७ एप्रिल ते ८ एप्रिल
- डीपीएन, पीएचएन = ८ एप्रिल
- सीईटी सेलने तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २१ मार्च आणि २१ मार्च या कालावधीत, तर पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा ४ एप्रिलला घेण्यात येणार असल्याचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
- हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजीच्या २ पदवी अभ्यासक्रमासाठी बीएचएमसीटी २८ मार्च, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी २७ मार्चला घेण्याचे प्रस्तावित केले आहे.
MHT CET Admission 2024 – The State Common Entrance Test Cell (CET Cell) has published the syllabus of entrance examinations conducted under technical education for admission to various undergraduate and postgraduate degree courses in 2025 on its website. Engineering Pharmacy, MBA, MSA, Hotel Management and Catering Services, B. Design as well as the exams for BBA, BCA, BMS, BBM courses are included.
BE Engineering and B. Pharmacy, B. Planning and ME, Pharm. D, and M. The MHT-CET exam is conducted for farm courses. There will be three papers of 100 marks in mathematics, physics and chemistry and biology. Each has been given 90 minutes.
For MBA and MMS as well as MCA courses, the paper of 200 marks will be conducted online. There will be a paper of 100 marks for Bachelor and Masters in Hotel Management. There will be a 200-mark paper for Bachelor in Design, for which 2 hours and 45 minutes have been given. B. The entrance test for admission to BCA, BBA, BMS and BBM courses was conducted from this year and next year too, the paper of 100 marks will be held and 90 minutes have been given time. For information, students should visit the website https://cetcell.mahacet.org.
‘सीईटी सेल’तर्फे इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे तंत्रशिक्षण अंतर्गत पुढील वर्षी २०२५ मध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आयोजित प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. इंजिनिअरिंग फार्मसी, एमबीए, एमएसए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सर्व्हिसेस, बी. डिझाईन तसेच बी. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठीच्या परीक्षांचा समावेश आहे.
बीई इंजिनिअरिंग तसेच बी. फार्मसी, बी. प्लॅनिंग आणि एमई, फार्म डी, तसेच एम. फार्म या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे शंभर गुणांचे तीन पेपर होणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
एमबीए आणि एमएमएस तसेच एमसीए अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन माध्यमातून २०० गुणांचा पेपर होणार आहे. बॅचलर आणि मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी १०० गुणांचा पेपर होईल. बॅचलर इन डिझाईनसाठी दोनशे गुणांचा पेपर होणार असून, त्यासाठी २ तास ४५ मिनिटांचा अवधी दिला आहे. बी. बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा घेण्यात आली पुढील वर्षीही १०० गुणांचा पेपर होणार असून, ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
MHT CET Admission 2024 – As many as 67 per cent seats in BBA and BCA courses in the state remain vacant. The State Common Entrance Test Cell CET Cell has conducted three rounds of admission process for courses. However, at the end of the third round, only 34,529 seats have been confirmed and more than 73,000 seats are still vacant.
The All India Council for Technical Education (AICTE) has made it mandatory for colleges to register BCA, BBA, BMS and BBM courses with the council from this academic year. The entrance test for these courses was conducted by the CET Cell from this year, and the admission process for these courses is being implemented by the CET Cell.
‘बीबीए’, ‘बीसीए’च्या ६७ टक्के जागा रिक्त, एक लाखापैकी ३४ हजार ५२९ जागांवरच प्रवेश निश्चित
राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या तब्बल ६७ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या राबविण्यात आल्या आहेत. मात्र, तिसऱ्या फेरीअखेर सुमारे ३४ हजार ५२९ जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही ७३ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या शैक्षणिक वर्षापासून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांची नोंदणी परिषदेकडे करणे महाविद्यालयांना बंधनकारक केले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यंदापासून सीईटी सेलद्वारे प्रवेश परीक्षेचे आयोजन केले होते, तसेच सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
Maha CET Registration सीईटी सेलकडील नोंद
- राज्यात बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांच्या मिळून १ लाख ८ हजार उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी ४१ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहेत.
- त्यामध्ये बीबीए १७ हजार १०७, तर बीसीए १७ हजार ४२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कॉलेजमधील एकूण जागांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा ६७ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रियेला परवानगी – सीईटी सेलने तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया संस्था स्तरावर राबविण्याची परवानगी दिली आहे, तसेच या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन महाविद्यालयांना घातले आहे.
- यंदा प्रवेशात घट का? – सीईटी सेलद्वारे यंदा पहिल्यांदाच सीईटीचे आयोजन, तसेच प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे, तसेच महाविद्यालयांकडून या अभ्यासक्रमांच्या नावात केलेला बदल यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
MHT CET Admission 2024 – The CET Cell is conducting the centralised admission process for undergraduate and postgraduate degree courses in pharmacy for the academic year 2024-25 under the Department of Technical Education and has conducted two rounds. Meanwhile, the admission process has been put on hold as per the government decision. This information has been given through a press release from the website of CET Cell.
Pharmacology b. Pharm degree M. There have been two rounds of centralised admissions to the pharmacy postgraduate degree courses. He requested the pharmacy colleges in the state to issue a government resolution in line with the approval given to them by the Pharmacy Council of India. According to the letter dated October 21. Action is being taken at the government level in this regard. Therefore, the ongoing process has been put on hold under the government letter. Candidates and institutions participating in the process of centralised admission to courses will publish instructions about the next process on the website of CET Cell. Everyone is invited to visit the www.mahacet.org website.
बी.फार्म, एम. फार्म प्रवेशप्रक्रियेस स्थगिती – सीईटी सेलच्या संकेतस्थळावर माहिती
सीईटी सेलच्या वतीने तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दरम्यान, शासन निर्णयानुसार प्रवेशप्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. सीईटी सेलच्या संकेतस्थळावरून प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.
औषधनिर्माणशास्त्र बी. फार्म पदवी एम. फार्म पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यातील फार्मसी कॉलेजने ‘फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया’ने त्यांना दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करावा, अशी विनंती दि. २१ ऑक्टोबर रोजी पत्रान्वये केलेली आहे. याप्रकरणी शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सुरू असलेल्या प्रक्रियेस शासनपत्रान्वये स्थगिती दिलेली आहे. अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत सहभागी उमेदवार व संस्थांनी पुढील प्रक्रियेबाबत सूचना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्वांनी www.mahacet.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
MHT CET Admission 2024 – BMS, BCA CET: Four students have scored 100 percentile in the CET conducted for the academic year 2024-25 for admission to professional courses like BCA, BBA, BMS, BBM. An additional CET will be conducted for students who could not appear for this CET. Registration can be made from June 29. Students who are not satisfied with the CET scores can also sit for the additional CET.
बीएमएस, बीसीए सीईटीत चौघांना १०० पर्सेटाइल – बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या सीईटीत चार विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाइल मिळविले आहेत. ही सीईटी देता न आलेल्या विद्यार्थ्यांकरिता अतिरिक्त सीईटी घेतली जाणार आहे. त्याकरिता २९ जूनपासून नोंदणी करता येईल. सीईटीच्या गुणांबाबत जे विद्यार्थी समाधानी नाहीत, त्यांनाही अतिरिक्त सीईटीला बसता येईल.
How to fill application form of MHT CET 2025
एमएचटी सीईटी 2025 अर्ज कसा दाखल कराल?
- सर्वप्रथम mhcet2025.mahacet.org या एमएच सीईटीच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
- त्यानंतर एमएचटी सीईटी बीई, बीफार्म आणि अॅग्रीकल्चर या नोंदणी फॉर्म लिंकवर क्लिक करावं.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल जनरेट करण्यासाठी मूलभूत माहिती भरावी.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं.
- वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशीलांसह एमएचटी सीईटीचा अर्ज भरावा.
- आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करून सबमिट करावीत.
- त्यानंतर एमएचटी सीईटीचा फॉर्म डाउनलोड करावा.
- या अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गातल्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 800 रुपये भरावे लागतील.
- महाराष्ट्रात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील.
CET Exan 2023 Registration @ https://mahacet.org