MHT CET 2021 चा पेपर पॅटर्न सीईटी कक्षाने केला जाहीर
MHT CET 2021 Exam Pattern
The Maharashtra State Common Entrance Test Cell has made available the brochure of MHT CET 2021 on its website. The cell has released the examination pattern on the website https://cetcell.mahacet.org/.
MHT CET 2021: महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra State Common Entrance Test Cell) ने एमएचटी सीईटी 2021 (MHT CET 2021) परीक्षेची माहिती पुस्तिका (ब्रोशर) संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. कक्षाने https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर परीक्षेचा पॅटर्न जारी केला आहे. यानुसार, महाराष्ट्र सीईटी २०२१ संबंधी महत्त्वपूर्ण तपशीलही जारी करण्यात आला आहे. परीक्षेचा प्रकार, कालावधी, विचारले जाणारे प्रश्न, प्रश्नांची एकूण संख्या यासह अनेक माहिती तपशीलवार देण्यात आले आहे. जे उमेदवार परीक्षा अर्ज भरत आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. एमएचटी सीईटी 2021 परीक्षा कॉम्प्युटर आधारित असणार आहे.
MHT-CET २०२१ च्या नोंदणीस सुरुवात
पेपर पॅटर्न पुढीलप्रमाणे –
विषय — प्रति प्रश्न गुण – एकूण गुण – कालावधी
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र — १ – १०० – ९० मिनिटे
गणित – २ – १०० – ९० मिनिटे
(साधारणपणे १० प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमातून तर ४० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातून विचारले जाण्याची शक्यता असते.)
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने MHT CET 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
Click here for Official Website