Mhada Maha Bharti 2020
Mhada Maha Bharti 2020
म्हाडा तातडीने भरती प्रक्रिया राबवणार
Mhada Maha Recruitment 2020 : Recruitment for various positions like Rent Collector, Clerk, Executive Engineer is expected. While Mhada has now taken over as an authority, Mhada’s jurisdiction has also increased. But MHADA’s current workforce has its limitations. Therefore, in many places there are multiple responsibilities from executive engineer to multiple positions. Therefore, he said the need to implement recruitment process more quickly. Read the complete details carefully and keep visit on our website :
Mhada Maha Recruitment 2020
म्हाडामध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे आता म्हाडाला तातडीने भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्याप्रमाणे लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई इमारत आणि दुरूस्ती पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.
म्हाडातील अनुभवी असा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग गेल्या काही वर्षात निवृत्त झाला आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागी कर्मचारी भरती करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री यांना पत्र दिले आहे. काही पदे ही कायम स्वरूपी तसेच काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास ५०० जणांची अधिकारी आणि कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या पदांमध्ये अगदी शिपाई, ड्रायव्हर पदापासून ते अभियंता पदापर्यंत जागा रिक्त आहेत.
रेंट कलेक्टर, लिपिक, कार्यकारी अभियंता अशा विविध पदांसाठीची भरती अपेक्षित आहे. म्हाडाकडे आता प्राधिकरण म्हणून जबाबदारी आलेली असतानाच म्हाडाचे कार्यक्षेत्रही वाढले आहे. पण म्हाडाच्या सध्याच्या कर्मचारी वर्गाची मर्यादा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकारी अभियंत्यापासून अनेक पदांवर एकाहून अधिक जबाबदार्या आहेत. म्हणूनच भरती प्रक्रिया अधिक लवकर राबविण्याची गरज त्यांनी सांगितली.
मुंबई म्हाडामध्ये लवकरच ५३४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे…
म्हाडामध्ये लवकरच ५३४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासते. वांद्रेतील मुख्यालयासह राज्यातील अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे. यासाठी सुमारे पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबरोबरच गेली काही वर्षे म्हाडामध्ये कंत्राटी पद्धतीने काम कारणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. (महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित बातमी)
Mumbai Mhada Recruitment 2020- As per the latest news source the Mumbai Mhada will be announce the Mega Bharti to filled the 534 vacancy for various posts. MHADA will soon recruit 534 employees. There is a great need for staff for housing projects, lottery eligibility verification, redevelopment plans, transition camps. The work force and number of manpower are busy in other offices in the state, including the headquarters in Bandra. There is a shortage of about five hundred employees. With this in mind, a decision in this regard was taken at a meeting of the Mhada Authority on Wednesday. In addition, for the past few years, a decision has been made to retain the contractual workers and employees in Mhada. Read the complete details carefully and keep visit on our website :
Mumbai Mhada Mega Bharti 2020
म्हाडामधील कर्मचाऱ्यांची भरती ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली. मात्र, आता सरकारही स्थापन झाले असल्याने ही मेगाभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी असा निर्णय बुधवारी झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. गेली अनके वर्षे म्हाडाकडे कामाचे प्रमाण वाढले तरी कर्मचारीसंख्या वाढली नव्हती. कमी कर्मचारी आणि अधिक काम यावर उपाय म्हणून कंत्राटी पद्धतीने हंगामी तत्त्वावर कामगार आणि कर्मचारी यांची भरती करून त्यांच्याकडून कमी पगारात काम करून घेतले जात होते. या कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि भत्तेही नव्हते. आता त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून म्हाडा नियमानुसार शर्ती आणि अटी यांची पूर्तता केल्यास त्यांना संधी मिळेल. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्यालय मुंबईत असून राज्याच्या अन्य भागात विभागीय कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. म्हाडाच्या मुंबई, कोकण विभागाने काढलेल्या लॉटरी धारकांना अजून ताबा मिळालेला नाही. गिरणी कामगारांच्या घरांचीही रखडपट्टी झाली आहे. म्हाडाने पंतप्रधान आवास योजना, पुनर्वसन योजनांवरील कार्यवाहीही करणे अपेक्षित आहे.
सौर्स : म. टा.