शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का? – Mega Bharti 2024

Mega Bharti 2024 For 9.79 lac Read Complete details & New GR

Mega Vacant post in Central Jobs

Mega Bharti 2024 in Maharashtra on contract basis – The recruitment process for gazetted and non-gazetted posts in the state is done through the Maharashtra Public Service Commission. On the other hand, recruitment of various departments of the Government of Maharashtra is done through direct service. At present, TCS and IBPS, two private companies appointed by the government, are recruiting direct service for class-B and class-C level posts. On the other hand, many government and semi-government departments of the government carry out various projects. To complete such projects, contractual employees are appointed on fixed wages within a certain period of time. Its duration is a maximum of eleven months. Earlier, applications were invited by advertising for contractual recruitment. Their interviews were conducted and staff were selected. In many government departments, if more than 100 posts were to be filled on contractual basis, the social reservation rule was also applicable. However, this practice has been sidelined and the opposition has now increased as contractual recruitment is being done by private companies that provide thousands of manpower in government departments.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का?

देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या परीक्षांसाठी तयारी करतात. राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्षाचे वातावरण असताना कुशल व अकुशल पदांवरील नोकऱ्यांचे कंत्राटीकरण केले जात आहे. कंत्राटी नोकरीमध्ये आरक्षणाला व नोकरीच्या सुरक्षेला कुठलाही थारा नसतो. त्यामुळे कंत्राटी पदभरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण असल्याची ओरड होत आहे.

  • कंत्राटी कर्मचारी भरती म्हणजे काय? – राज्यात राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होते. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची पदभरती सरळसेवेच्या माध्यमातून केली जाते. सध्या शासनाने नेमलेल्या ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन खासगी कंपन्यांकडून वर्ग-ब आणि वर्ग-क दर्जाच्या पदांची सरळसेवा भरती सुरू आहे. दुसरीकडे, शासनाच्या अनेक शासकीय आणि निमशासकीय विभागांचे विविध प्रकल्प सुरू असतात. असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठराविक कालावधीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची निश्चित वेतनावर नियुक्ती केली जाते. याचा कालावधी हा जास्तीत जास्त अकरा महिन्यांचा असतो. पूर्वी कंत्राटी भरतीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागवले जात होते. त्यांच्या मुलाखती घेऊन कर्मचाऱ्यांची निवड होत होती. अनेक शासकीय विभागांमध्ये शंभरहून अधिक पदे कंत्राटी पद्धतीने भरायची असल्यास त्यासाठी सामाजिक आरक्षणाचा नियमही लागू होत असे. मात्र, या पद्धतीला बगल देत आता शासकीय विभागांमध्ये हजारोंच्या संख्येने मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून कंत्राटी भरती केली जात असल्याने विरोध वाढला आहे.
  • कंत्राटी भरतीच्या निर्णयाची व्याप्ती किती?  – राज्य कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३च्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या नऊ कंपन्या निवडण्यात आल्या होत्या. मात्र, हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने या निर्णयाची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवली होती. राज्य सरकार वर्ग २, ३ आणि ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची तरतूद या शासन निर्णयात होती. ‘अ’ दर्जाच्या तहसीलदार पदाचाही यात समावेश होता. केवळ दोन महिन्यांत चार विभागांतील ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढण्यात आला होता. कंत्राटी भरतीचे वाढते लोण बघता विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आंदोलन उभारले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही १२ जुलैला शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे ही बाह्यस्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीवरून पुन्हा सरकारवर टीका होत आहे.
  • राज्यातील बेरोजगारीची स्थिती काय?  – करोनानंतर देशासमोर उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे बेरोजगारी. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’च्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा बेरोजगारी दर नोव्हेंबर २०२३ मध्ये ३.५ टक्के नोंदवण्यात आला आहे. याआधीच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनुक्रमे ४ टक्के आणि ४.२ टक्के बेरोजगारीचा दर होता. राज्यात सध्या अडीच लाखांहून सरकारी पदे रिक्त आहेत. शासकीय नोकरीच्या आशेने यासाठी ३२ लाखांहून अधिक तरुण पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. बेरोजगारीवरून मोदी सरकारवर अनेकदा टीका झाल्याने राज्यातील महायुती सरकाने ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांचे सरकार आल्यानंतर ५७ हजार ४२२ नियुक्तीचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसेच ज्यांनी परीक्षा दिली अशांची संख्या १९,८५३ इतकी असल्याचे सांगितले. ही सर्व पदे कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
  • कंत्राटी भरतीमुळे बेरोजगारांचे नुकसान कसे? – राज्यात लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. विविध शासकीय विभागांमध्ये होणाऱ्या पदभरतीत अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग, ईडब्ल्यूएस, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अंशकालीन कर्मचारी आदी आरक्षणाचा समावेश असतो. आरक्षणामुळे अनेकांना शासकीय नोकरीची संधी मिळते. परंतु, बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी भरती करताना त्यात कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसते. त्यामुळे सर्व प्रवर्गाचा आरक्षणाचा हक्क मारला जातो. कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण नसले तरी यासाठी कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा घेतली जात नसल्याने गुणवत्तेशी काहीही संबंध नसतो. वशिलेबाजीने कंत्राटी नोकरी मिळत असल्याने अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. कंत्राटी पद्धतीने एखाद्याला नोकरी मिळाली तरी नियुक्तीच्या वेळी कंपनी त्यांचा वाटेल तसा करारनामा करून घेते. या कंपन्यांकडून वेळेवर मानधन दिले जात नाही. वेतन नाही म्हणून कुणी आवाज उठवला तर त्याला कोणतीही नोटीस न देता कामावरून काढले जाते. कौटुंबिक, आरोग्यासंबंधीच्या विम्याची सुविधाही या कर्मचाऱ्यांना लागू नसते. नोकरीची कुठलीही सुरक्षा नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे कंत्राटी भरती ही सत्ताधारी पक्षाच्या नजीकच्या कंपन्यांना काम देणे आणि कार्यकर्त्यांना काम मिळवून देण्याचा प्रकार असल्याची टीका होते.
  • कंत्राटी भरतीवरून सरकारवर टीका का?  – नोकरभरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२३ मध्ये घेतला होता. मात्र, राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटनांनी कंत्राटी भरतीला तीव्र विरोध केल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही शासकीय विभागांमध्ये त्यांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ‘क’ दर्जाच्या पदांचीही कंत्राटी भरती सुरू आहे. पुढील तीन महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात सरकारने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून विरोधकांना आयते कोलीत दिले आहे. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे.

Central Government Job Vacancy 2023 – Report as on March 1, 2021 in the central govt. 9.79 lakh posts in various departments under the jurisdiction of the Center were vacant, including the highest 2.93 lakh posts of Railways, Minister of State for Personnel Jitendra Singh informed on Wednesday.

The process of filling up the vacant posts as per the requirements of various Ministries, Departments and Institutions of the Central Government is going on continuously. All the Ministers and Departments have been instructed to fill up the vacant posts on time. In a written reply, Jitendra Singh said that it is hoped that the employment fairs organized by the Government of India will serve as an inspiration for the next job creation.

Apart from railways, there are 2.64 lakh posts in the defense department, 90,050 in the home department out of 1.43 lakh posts, 80,243 in the revenue department, 29,934 in the Indian Audit and Accounts Department and 9,460 in the nuclear power department, Singh said while quoting the annual report of the Department of Expenditure.

केंद्रात विविध विभागांमध्ये 9.79 लाख पदे रिक्त

1 मार्च 2021 पर्यंत केंद्राच्या अखत्यारितील विविध विभागांमधील 9.79 लाख पदे रिक्त होती, यात रेल्वेच्या सर्वाधिक 2.93 लाख पदांचा समावेश आहे, अशी माहिती कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी बुधवारी दिली. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांच्या आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. रिक्त पदे वेळेवर भरण्यासाठी सर्वच मंत्री, विभागांना निर्देश देण्यात आला आहे.

भारत सरकारद्वारे आयोजित केले जाणारे रोजगार मेळावे पुढील रोजगार निर्मितीसाठी प्रेरणा देण्याचे काम करती, अशी अपेक्षा असल्याचे जितेंद्रसिंह यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरात म्हटले आहे. रेल्वेव्यतिरिक्त संरक्षण विभागात 2.64 लाख, गृह विभागात 1.43 लाख पदांमध्ये 90,050, महसूल विभागात 80,243, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागात 29,934 आणि अणुऊर्जा विभागात 9,460 पदे आहेत, असे सिंह यांनी व्यय विभागाच्या वार्षिक अहवालाचा हवाला देताना सांगितले.


Maharashtra Mega Bharti 2023 Age limit

75 thousand Recruitment is done through direct recruitment. Since this year is the anniversary of independence, the state government has announced the recruitment of 75 thousand posts. But two years had passed in Corona. Therefore, the competitive exam could not be conducted. Due to this, many students had crossed the age limit. These students will not get a chance, so there was a constant demand for increasing the age limit. This demand has been accepted and the age limit has been increased by two years.

Age Limit for Government Job is like this – Now the age limit for open category candidates was 38 years. It has now been increased to 40. So the age limit will be 45 instead of 43 for backward classes. The increase in age limit will be applicable till 31st December 2023 for which the advertisement is published.

मोठी बातमी! शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ; आता अर्जदार…

राज्य शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता नोकरभरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहिल, असं सांगण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७५ हजार पदांच्या नोकरभरतीची घोषणा सरकारने केली होती. या नोकरभरतीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Government Service Age Limit

  • सरळसेवा भरतीच्या माध्यमातून नोकरभरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने ७५ हजार पदांची नोकरभरतीची घोषणा केली आहे.
  • मात्र कोरोनात दोन वर्षे गेले होते. त्यामुळे स्पर्धा परिक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली होती.
    या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही, त्यामुळे वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
  • ही मागणी मान्य झाली असून वयोमर्यादेत दोन वर्षे वाढ कऱण्यात आली आहे.
  • आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्षे वयोमर्यादा होती. ती आता ४० करण्यात आली आहे.
  • तर मागास वर्गातील ४३ ऐवजी ४५ वयोमर्यादा असेल. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या परिक्षांची जाहिरात येईल, तोपर्यंत वयोमर्यादेतील वाढ लागू राहणार आहे.





Latest updates regarding the age limit in government recruitment is that. According to sources, the Chief Minister has given instructions to the General Administration Department to relax the age limit by two years so that the students who have exceeded the age limit can get a chance. The state government has decided to increase the age limit for police recruitment by two years in November 2022. The Chief Minister is positive about the demand of these candidates that the age limit for government recruitment should be increased by two years as there has been no recruitment for two years due to Corona and a decision is likely to be taken soon.

सूत्रांच्या माहितीनुसार वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून दोन वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने पोलिस भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादेत वाढ देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतला आहे.

Age limit increase in Sarkari Nokari

  • कोरोनामुळे दोन वर्ष नोकरभरती न झाल्याने शासकीय भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी, या उमेदवारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
  • विविध कारणांमुळे राज्यात मागील चार वर्षांपासून सरळसेवा भरती रखडलेली आहे, तसेच कोरोनामुळे मागील तीन वर्षात राज्यसेवा परीक्षा एकदाच पार पडली आहे.
  • यामुळे शासकीय सेवेच्या भरतीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. या विद्यार्थ्यांनी इतर राज्यांप्रमाणे वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
  • त्याचप्रमाणे इतर शासकीय नोकर भरतीसाठीही वयोमर्यादा वाढ उमेदवार मागत आहेत.
  • कोरोनानंतरच्या शासकीय भरतीसाठी राजस्थानने ४ वर्ष, मध्यप्रदेश व ओडिशाने ३ वर्ष, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, नागालँड, त्रिपुरा या राज्यांनी २ वर्षांची वयोमर्यादा वाढविली आहे.

Mega Bharti 2023 Vacant Posts details are given here. Pashusavardhan, Vanrakshak and Talathi etc., 2.90 lacs posts are vacant in the state. Due to the lack of employees farmers have facing problem in alot of work for the work that comes under Talathi animal husbandry, forest department in revenue department related to agriculture. Moreover, as many posts of gram sevak are largely vacant, citizens are facing many difficulties due to entrusting the responsibility of three gram panchayats to one gram sevak, due to which the travel of common people’s files has slowed down to a great extent. Farmers, farm laborers, common people, students, citizens are suffering a lot due to this. Read the more details below and keep visit us for the further updates.

राज्यात पशुसंवर्धन, वनसंरक्षक तलाठी याची २.९० लाख पदे रिक्त

  1. राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात अ, ब, क, ड, या वर्गवारीतील तब्बल २,८९,४६४ विविध विभागातील पदे आतापर्यंत रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये वर्ग एक २८७५४, वर्ग दोन २१,५९१, वर्ग तीन १,५०,१८९, वर्ग चारचे ७३६२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आधीच रिक्त पदे त्यात नवीन नोकर भरती नसल्याने अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाज चालवले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
  2. पण त्यावेळी परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. त्यामुळे ती परिक्षा रद्द करण्यात आली. त्या परिक्षेचे शुल्क राज्यशासनाकडे जमा आहे. अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेलाय. त्यावर प्रशासनाकडून पुन्हा परिक्षेचे आयोजन करण्यासंबंधी प्रयत्न होताना दिसत नाहीत. येत्याकाळात त्यावर तात्काळ आयोजन करण्यात यावे. सोबतच शेतीशी निगडित महसूल विभागातील तलाठी पशुसंवर्धन, या सह वनविभाग या अंतर्गत येणाऱ्या कामासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. यातच एकाच तलाठ्यावर अनेक तलाठी सज्जांचा पदभार असल्याने शेतकऱ्यांना तलाठी वेळेवर उपलब्ध होत नाही.
  3. शिवाय ग्रामसेवकाची अनेक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने एकाच ग्रामसेवकाकडे तीन तीन ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या फायलींचा प्रवास कमालीचा मंदावला आहे. याचा मोठ्या प्रमाणात त्रास शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य, विद्यार्थी, नागरिक यांना भोगावा लागत आहे. सेवा कायद्याचे उल्लंघन शासन प्रशासनाकडूनच होत आहे. या लक्षणीय रिक्त पदांमुळे निकषांना हरताळ फासला जात आहे. यात लोकप्रतिनिधीही गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. फक्त वेळोवेळी आश्वासन मिळते.





Mega Bharti 2023- In the fourth meeting of the Cabinet Sub-Committee of the Industries Department, investment projects worth 70 thousand crores were approved in the state. Due to this, about 55 thousand employment will be created. The meeting discussed about industries promoting industrial development in Vidarbha, Marathwada, Nashik, Pune parts of the state.

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे रोजगारनिर्मिती ५५ हजार होणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्याऱ्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Mega Bharti -राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मंत्रालयात मंगळवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचा पहिला प्रकल्प : देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिदा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पहिला प्रकल्प पुणे येथे सुरु होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून व्होक्सवॅगनबरोबर पुणे इथे तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाइप बनविण्यात येणार आहे. बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत फार्मास्युटिकल ग्लास टयूबिंगचे उत्पादन करणार आहे. यासाठी ही कंपनी दोन टप्प्यात १६५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यात येत्या वर्षभरात ७५ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याचा मुद्दा राजकीय ऐरणीवर आला असताना, भारत केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत’, अशी आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

 पंतप्रधानांच्या घोषणेनुसार राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार उमेदवारांना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील कोकण विभागातील पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी येथे झाला. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमात ६०० उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.


Maha Mega Bharti 2022: In the government departments of the state, there are as many as 79 thousand vacant posts in the district councils. There are various posts in Zilla Parishads including Home, Public Health, Water Resources, Revenue, Agriculture, Animal Husbandry, Public Works Department, Social Justice, Women and Child Welfare, Education Departments as there has been no recruitment in the last six-and-a-half years. Read More details are given below.

राज्यातील ३२२ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी सव्वालाख, तर तीन हजार ३४१ उच्च महाविद्यालयातून साडेआठ लाख आणि डीटीएड, बीएड व व्यवसाय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (दरवर्षी) ११ लाख आहे. पण, पावणेतीन लाख शासकीय पदे रिक्त असतानाही मागील सहा-साडेसहा वर्षांत पदभरती झाली नाही. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड कोटींहून अधिक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात वणवण भटकत असल्याची स्थिती आहे.

राज्याच्या शासकीय विभागांमध्ये तब्बल दोन लाख ७९ हजार पदे रिक्त

राज्याच्या ४३ प्रमुख शासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीत दोन लाख ७९ हजार पदे रिक्त आहेत. गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, शिक्षण या विभागांसह जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या भरमसाठ वाढली आहे.

Maharashtra Mega Recruitment 2022

  • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये एकदा ३६ हजार पदांची भरती झाली होती. त्यानंतर पुढील काळात पदभरतीच्या अनकेदा घोषणा झाल्या, पण कधी आरक्षण रद्दमुळे तर कधी विविध प्रकारच्या निवडणुकीच्या आचारसंहितामुळे भरती प्रक्रिया झाली नाही.
  • फडणवीस सरकारने घोषित केलेली ७० हजार पदांची मेगाभरती स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानपरिषद, राज्यसभा, विधानसभा, लोकसभेच्या निवडणूकांमुळे राबविता आली नाही. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात सत्ताबदल झाला, कोरोनाचे संकटही आले.
  • काही दिवसांपूर्वी राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक पार पडली आणि आता पुन्हा सरकारबदल झाला. पण, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने पदभरतीसंदर्भात अजूनही काहीच हालचाली दिसत नाहीत.
  • सध्या महाराष्ट्रात ‘अ’ वर्गातील जवळपास ५० हजार, ‘ब’ वर्गातील ७७ हजार आणि ‘क’ वर्ग एक लाख व ‘ड’ वर्गातील ५२ हजार शासकीय पदे रिक्त आहेत. ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा करीत सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकरीची आशा होती. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आता तरूणांना शिंदे-फडणवीस सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

उच्चशिक्षित विद्यार्थी (दरवर्षीची स्थिती)

  • अभियांत्रिकी महाविद्यालये
  • ३२२
  • अंतिम वर्षाचे विद्यार्थी
  • १.१७ लाख
  • उच्चशिक्षणाची महाविद्यालये
  • ३,३४१
  • अंतिम वर्षातील विद्यार्थी
  • ८.५३ लाख
  • ‘डीटीएड-बीएड’ महाविद्यालये
  • ७१३
  • दरवर्षी शिक्षण घेणारे विद्यार्थी
  • ३७,०००





Mega Bharti 2022: As per the latest update regarding the Mega bharti 2022 in Maharashtra. Mega recruitment for one lakh posts per month in the state. The recruitment process for one lakh posts per month is going on in the state. There are 50 thousand vacancies in A class, 75 thousand in B class, 1 lakh in C class and 50 thousand in D class. This recruitment will be done on the basis of reservation and point list after reviewing the vacancies and sanctioned seats. Thousands of unemployed youth of Maharashtra will get relief due to this decision. Read More details regarding Mega Bharti 2022 are given below.

आनंदाची बातमी! राज्यात महिन्याला एक लाख पदांसाठी मेगा भरती

कोविडकाळात रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने शिंदे-फडणवीस सरकारने पावले टाकणे सुरू केले असून, लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रिक्तपदांची संख्या मोठी असताना विकासकामे मार्गी लागणे अशक्य आहे, असे सांगत भरतीबद्दलचे कागद त्वरेने तयार करावेत, असे आदेशही शिंदे यांनी दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजते

  • महाराष्ट्रात एकूण दोन लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत. या पदांची आरक्षणनिहाय भरती कशी होईल, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ३६ हजार पदांची भरती झाली होती. त्यानंतर सरकारबदल आणि कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली.
  • महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आदी विभागांचा कारभार अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे प्रभावित झाला आहे. महाराष्ट्रात अ वर्गात ५० हजार, ब वर्गात ७५ हजार, क वर्गात १ लाख आणि ड वर्गात ५० हजार पदे रिक्त आहेत. रिक्त जागा आणि मंजूर जागांचा आढावा घेऊन आरक्षण आणि बिंदूनामावलीनुसार ही भरती करण्यात येणार आहे.
  • आरक्षणाचे निकष लावून यासंबंधातील जाहिराती तयार करून त्या मंत्रिमंडळासमोर ठेवल्या जाणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. महाविकास आघाडी सरकारनेही यासंदर्भात तयारी चालवली होती. आता ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दर महिन्याला एक लाख कर्मचाऱ्यांना भरती केले जाईल.

‘भरती कंत्राटी पद्धतीने नको’

नोकरभरतीसंदर्भात पावले टाकली जाणे आनंदाचे आहे. कर्मचारी भरती रखडल्यामुळे योग्य प्रकारे कामे होत नाहीत. सरकारने यासंदर्भात त्वरेने पावले उचलावीत, असे आमचे निवेदन होते. भरतीप्रक्रिया सुरू होणार असेल, तर ती आनंदाची बाब आहे; मात्र सरकारने ही भरती नियमित प्रक्रियेनुसार व्हावी, कंत्राटी पद्धतीने होऊ नये. कंत्राटी कामगार फार जबाबदारीने काम करत नाहीत. त्यामुळे सरकार संवेदनशीलपणे वागू शकत नाही. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भावनेकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा असल्याचे मंत्रालय अधिकारी व कर्मचारी महासंघाचे प्रमुख ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

भरतीचा आराखडा

शिंदे-फडणवीस सरकारला यासंबंधीचा जो आराखडा दिला जाणार आहे, त्यानुसार गृह विभागात १४ ते १५ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात २४ हजार (यातील ८ हजार पदांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे), जलसंपदा आणि महसूल विभाग प्रत्येकी १४ हजार, वैद्यकीय शिक्षण १२ हजार, सार्वजनिक बांधकाम ८ हजार आणि अन्य विभागांसाठी १२ हजार ५०० या संख्येत कर्मचारी पहिल्या टप्प्यात भरले जातील. जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाईल.


Maharashtra Mega Bharti 2022: Maharashtra Mega Bharti 2022 10 lakh jobs in 18 months. The central government is going to fill up 10 lakh posts in the next one and a half years. There will be mega recruitment in the next few months in various departments and ministries of the central government. Read More details regarding Maharashtra Mega Bharti 2022. More updates visit our website regularly.

Mission Mode – मोदींची मोठी घोषणा ’18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या’

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत माहिती दिली त्यानुसार १ मार्च २०२१ च्या उपलब्ध आकडेवारी नुसार केंद्र सरकार मध्ये विविध विभागांत सुमारे ९. ७९ लाख रिक्त पदे आहेत. तर एकूण स्वीकृत पदांची संख्या ४०. ३५ लाख एवढी आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विस्तृत माहिती दिली.

खर्च विभागाच्या पेमेंट रिसर्च युनिटच्या अहवालानुसार मागील वर्षी मार्च पर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागाअंतर्गत ४०,३५,२०२ एवढी मंजूर पदे होती. तर सद्य स्थितीत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ३०,५५,८७६ कर्मचारी आहेत अशी माहिती एक अहवालातून समोर आली आहे. ”केंद्र सरकारमध्ये(central govt) वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती करण्याची जबाबदारी ही संबंधित मंत्रालय आणि विभागांची आहे. त्याचबरोबर ही एक नियमित चालविली जाणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी सुद्धा अनेक विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये येत्या दीड वर्षात मिशन मोड च्या अंतर्गत १० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं सांगितलं आहे” अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.

केंद्रातील सर्व विभागांमध्ये ई – कार्यालय प्रणाली

बुधवारी लोकसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये ई कार्यप्रणाली किंवा डिजिटल पद्धतीची कार्यलय प्रणाली सुरु करण्यात आली आहे. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, न्यान विभाग, अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, प्रशासनिक सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागासह अनेक विभागांमध्ये नागरिकांना त्याचे अर्ज किंवा तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन दिले आहे अशी माहिती सिंह यांनी दिली. त्याचबरोबर मंत्रालयामध्ये केंद्रीय रजिस्ट्रीचं काम सुद्धा डिजिटल स्वरूपात करण्यात आलं आहे असंही सिंह यांनी सांगितले


As per the latest update regarding the Mega bharti 2022 in Maharashtra is that. Mega Recruitment will be done in phases by department wise. Immediate action is being taken by the state government to fill all the vacancies in various government departments, especially in the home department and health departments. As per the source the Mega recruitment process will start by the end of June. Dattatraya Bharane, Minister of State, General Administration Said that.

विभागनिहाय टप्प्याटप्याने जूनअखेरीस भरती प्रक्रिया सुरु होईल

विभागनिहाय टप्प्याटप्याने भरती होईल – “राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय विभागातील विशेषत: गृह व आरोग्य विभागांमधील सर्व रिक्तपदे भरण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही केली जात आहे. जूनअखेरीस त्याची भरती प्रक्रिया सुरु होईल.” – दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

Amravati Jalsampada Vibhag Bharti 2022-

Job Opportunity -खासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती

Saral Seva Bharti 2022– As per the latest GR, All state government recruitment will be done only through IBPS, TCS, and MKCL. Due to various complaints received in the examination system started by OMR Vendor. All government exams will now be conducted through IBPS, TCS, and MKC.  Read More details as given below.

  • पदभरतीसाठी  घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. यापुढे राज्य शासकीय भरती फक्त IBPS, TCS आणि MKCL मार्फत घेण्यात येणार आहेत.
  • ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली.
  • ज्यातील आरोग्य सेवा परिक्षाम्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली.

Mega Bharti 2022- As per the news 15 thousand 390 posts have been received from various departments for the recruitment process in the direct service quota in government jobs and 7366 posts have been demanded from the Maharashtra Public Service Commission. In these six months, 300 advertisements have been published for 6,200 posts and soon recruitment process will be carried out by publishing advertisements for 1,700 posts.

राज्यात १७०० पदांसाठी नोकरभरती होणार; लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

गेल्या सहा वर्षात राज्यात नोकर भरती न झाल्याने अनेक विभागात लाखो पदे रिक्त आहेत. राज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात नोकरभरती करावी अशी मागणी करत आहे. ही पदे भरण्यासाठी राज्य सरकारची काय योजना आही असा प्रश्न आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधीमंडळात उपस्थित केला.

ल्या सहा वर्षात राज्यात नोकर भरती न झाल्याने अनेक विभागात लाखो पदे रिक्त आहेत. राज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात नोकरभरती करावी अशी मागणी करत आहे. ही पदे भरण्यासाठी राज्य सरकारची काय योजना आही असा प्रश्न आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधीमंडळात उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले असून लवरकच राज्यात १७०० पदांसाठी नोकरभरती होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र  प्राप्त झाल्याचेही भरणे यांनी वेळी सांगितले.

१ हजार ७०० पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून ७३६६ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः ६ हजार २०० पदांकरिता ३०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार ७०० पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री  भरणे यांनी सांगितले.

Mega Bharti 2022- There are lakhs of vacancies in various departments in the state and no government servant has been recruited in the last five or six years. Two lakh 3 thousand 302 posts are vacant in the state. Corona has not been recruited in the last two years. The government is positive about the recruitment and the recruitment will be done soon, said Minister Datta Bharne. Read More details as given below.

राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे

 राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

 राज्यात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात करोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

 अनेकांचे व्यवसाय देशोधडीला लागले आहेत. अशातच नोकरभरती रखडल्याने अनेकांसमोर रोजगाराचा सवाल उपस्थित झाला आहे. लवकरात लवकर नोकरभरती झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे जीवन पुन्हा उजळू शकते. त्यासाठी लवकरात लवकर नोकरभरती होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. हाच मुद्दा आता नाना पटोलेंनी उचलून धरला आहे.

Saral Seva Bharti 2022- GR

Saral Seva Bharti 2022– As per the latest GR, All state government recruitment will be done only through IBPS, TCS, and MKCL. Due to various complaints received in the examination system started by OMR Vendor, a revised decision was taken in the state cabinet on Wednesday for recruitment. All government exams will now be conducted through IBPS, TCS, and MKC.  Read More details as given below.

Mahavitaran Bharti 2022- वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

पदभरतीसाठी  घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. यापुढे राज्य शासकीय भरती फक्त IBPS, TCS आणि MKCL मार्फत होतील असा GR जाहीर झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी रात्री . 15/12/2021 च्या बैठकीत मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या  परीक्षेसाठी  सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे, असा निर्णय घेतला आहे. 

या पुढील पद भरती संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या  निर्देशांची अंमल बजावणी व सनियंत्रण करण्याची करण्याची  सर्व जबाबदारी सर्व संबंधित मंत्रालयीन विभागाची राहील.

राज्यातील विविध शासकीय विभागांमधील पदभरतीसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे. असे पॅनेल स्थगित करण्याचा निर्णय १५ डिसेंबर २०२१ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार यापुढे सर्व भरती परीक्षा या पॅनेलमधील कंपन्यांमार्फतच होतील. या पॅनेलमध्ये टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांचा समावेश आहे. यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी २०१७ सालापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदांची पदभरती OMR पद्धतीने करण्यात येत होती. मात्र यापुढे पदभरतीसंदर्भातील कोणतीही परीक्षा पॅनेलबाहेरच्या OMR Vendors कडून घेण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शासन आदेशात दिले आहेत.

अलीकडेच राज्यातील आरोग्य सेवा भरती परीक्षा, म्हाडा भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर हा परीक्षांच्या आयोजानाकरिता पॅनल निवडण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण माहिती येथे वाचा 


Mega Bharti 2022 Good news for students who prepared for the govt exam. In this year 15 thousand 511 vacancies will be filled in 25 departments like the Public Health Department, WRD, Forest Department, and various. All recruitment processes will be done through MPSC. Recruitment of 15 thousand 511 vacancies in 25 departments of the state government is planned to be completed by the end of April. Read More details of Mega Bharti 2022 Online Apply as given below.

Mega Bharti 2022 Online Apply – राज्य सरकारच्या 25 विभागांतील 15 हजार 511 रिक्‍त पदांची भरती (Recruitment) एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department) 7 हजार 460 रिक्‍त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला  सादर करण्यात आले आहे. उर्वरित 8 हजार 61 पदांचे मागणीपत्र काही दिवसांत आयोगाला सादर केले जाणार आहे. त्यानुसार गट अ, ब आणि क प्रवर्गातील रिक्‍तपदे भरली जाणार आहेत.

Maha Govt Jobs 2022

  • राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने (Information and Technology Department) यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे.
  • वित्त विभागाने (Finance Department) विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे (Covid-19) राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल (Revenue) मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही.
  • तत्कालीन फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती (Mega Recruitment) होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे.

Mega Bharti 2022 Online Apply Vacancies 2022

विभाग : भरती होणारी पदे

  • सार्वजनिक आरोग्य : 937
  • कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924
  • उद्योग, ऊर्जा, कामगार : 279
  • अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62
  • पाणी पुरवठा व स्वच्छता : 16
  • सामान्य प्रशासन : 957
  • मराठी भाषा : 21
  • आदिवासी विभाग : 7
  • बृन्हमुंबई महापालिका : 21
  • पर्यावरण : 3
  • गृह : 1159
  • वित्त : 356
  • वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572
  • उच्च व तंत्रशिक्षण : 35
  • शालेय शिक्षण, क्रीडा : 105
  • सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32
  • कौशल्य विकास, उद्योजकता : 171
  • महसूल व वन : 104
  • ग्रामविकास व पंचायतराज : 32
  • नगरविकास : 90
  • मृदा व जलसंधारण : 11
  • जलसंपदा : 323
  • विधी व न्याय : 205
  • नियोजन : 55

नववर्षातील मेगाभरतीचे नियोजन…

  • राज्य शासनाच्या 25 विभागातील 15 हजार 511 रिक्‍त पदांची होणार भरती
  • सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्‍त पदे
  • सामान्य प्रशासन विभागाकडून ‘एमपीएससी’कडे सात हजार 460 पदांचे मागणीपत्र
  • गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण
  • राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून 8 हजार 61 पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र

Mega Bharti 2022-सरकारच्या विविध आठ विभागांत मागासवर्गीयांची ४० हजारांवर पदे रिक्त

Mega Bharti 2022 Online Apply

Mega Bharti 2021 latest updates received today that the various vacancies have been vacant in various 08 departments of Government. According to the information received from the Union Ministry of Personnel, as on 31st December 2019, there are over 40,000 vacancies in the departments of Housing, Postal, Railways, Defense, Atomic Energy, Financial Services, and Revenue. Of these, 14,000 are for Scheduled Castes, 12,000 for Scheduled Tribes, and 15,000 for OBCs. More details as given below.

सरकारच्या विविध आठ विभागांत मागासवर्गीयांची ४० हजारांवर पदे रिक्त

वर्षाला दोन कोटी रोजगार भरती करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळातही केंद्र सरकारच्या विविध आठ विभागांत मागासवर्गीयांची सुमारे ४० हजारांवर पदे रिक्त आहेत.  केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत  केंद्र सरकारच्या गृहनिर्माण, टपाल, रेल्वे, संरक्षण, अणुऊर्जा, वित्तीय सेवा आणि महसूल विभागासह इतरही विभागांत चाळीस हजारावर पदे रिक्त आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीची १४ हजार, अनुसूचित जमातीची १२ हजार आणि ओबीसींच्या १५ हजारावर पदांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदे रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत कमी पदे भरण्यात आल्याने हा अनुशेष निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अनुसूचित जातीच्या २८ हजार ३८६ पदांपैकी १३ हजार ९७१ पदे भरण्यात आली. अनुसूचित जमातीच्या २२ हजार पदांपैकी ९ हजार ४०० तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) २८ हजार ९६२ पदांपैकी १३ हजार पदे भरण्यात आली आहेत.

ऑल इंडिया कॉन्फेड्रेशन ऑफ सेंट्रल गव्हरमेन्ट ईम्प्लॉईज या संघटनेचे पश्चिम विभागाचे सचिव गुरुप्रीर्तंसग म्हणाले की, खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या नीतीमुळे विविध विभागात हजारो पदे रिक्त आहेत. एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या संख्यने वाढत असून केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घेत आहे. ही गंभीर बाब आहे.

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी सांगितले की, अनुसूचित जमातीची पदे रिक्त असणे ही दुर्दैवी बाब आहे. संविधानाच्या कलम १६ (४ अ) या तरतुदीचे उल्लंघन आहे. राज्याप्रमाणे केंद्रात जात प्रमाणपत्र पडताळणीचा कायदा नसल्याने आदिवासींसाठी राखीव जागा गैरआदिवासींनी बळकावल्या.


Mega bharti 2021 latest updates received on today that the various vacancies has been vacant in various 29 department of Government. As per the latest news there are 2 lakh 193 vacancies in 29 main departments of the government for direct service and promotion. Read More details as given below.

शासनाच्या २९ विभागांत दोन लाख जागा रिक्त; नाेकरभरती कधी होणार?

शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदाेन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात तब्बल ४६ हजार ९६२ जागा जिल्हा परिषदांमधील आहेत.

Mega Bharti 2022 Online Apply

 सर्वाधिक रिक्त जागा गृहविभागात 

 रिक्त असलेल्या दोन लाख पदांपैकी सर्वाधिक २४८७८ पदे एकट्या गृहविभागात आहेत. त्या खालाेखाल जलसंपदा २० हजार ८७३, तर सार्वजनिक बांधकाम विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत. मृदा व जलसंधारण विभागात एकही पद रिक्त नसल्याची माहिती देण्यात आली. ;रिक्त पदे २ लाख १९३ पदे ;सरळसेवेची रिक्त पदे १ लाख ४१ हजार ३२९ पदोन्नतीची रिक्त पदे ५८ हजार ८६४

 आउटसाेर्सिंग, कंत्राटीवर जाेर 

 राज्यात बेराेजगारी प्रचंड वाढली आहे. तरुणांना नाेकऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनाचा  नव्या नाेकरभरतीऐवजी आउटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जाेर दिसताे. त्यातूनच निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात आहे.


राज्यात हजारो पदे आउटसोर्सिंगने खासगी कंपन्यांमार्फत भरणार

As per the the latest news : Mega Bharti in various departments of the state government, public undertakings, corporations and corporations, municipalities and local bodies will be held through outsourcing and through private contractors. Read the more details below:

राज्य शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजारोंची भरती आउटसोर्सिंगद्वारे आणि खासगी कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सुमारे तीन लाख रिक्त पदे भरण्यासाठी नियमित पदभरती करण्याची मागणी लावून धरली असताना त्याला फाटा देत आउटसोर्सिंगचेच धोरण पुढेही राबविण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. हे करताना वेगवेगळ्या विभागांना आउटसोर्सिंगने भरतीचे पूर्वी असलेले अधिकार काढून घेत कामगार विभागाच्या छत्राखाली ही भरती केली जाईल. उच्च कौशल्य, कौशल्य, निमकौशल्य असलेले आणि अकुशल अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असेल.

Mega Bharti 2022 – Apply Online

कामगार विभागाने २ सप्टेंबरला हे सगळे मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात खासगी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. आतापर्यंत शासनाचे विविध विभाग आपापल्या अखत्यारित ही भरती करीत होते. आता सर्वच विभागांतील भरती व देखभालीसाठी खासगी कंपन्यांचे ‘एम्पॅनलमेंट’ करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला सकाळी ११ला निविदा काढण्यात आली आणि लगेच दोन तासांत शुद्धिपत्रक काढण्यात आले. बोटावर मोजण्याइतक्या विशिष्ट कंपन्यांना कंत्राट मिळवून देण्याचा अशुद्ध हेतू या शुद्धिपत्रकामागे असल्याची चर्चा आहे. ही जागतिक निविदा आहे, पण राष्ट्रीय व जागतिक दर्जाच्या कंपन्यांना संधीच मिळणार नाही अशा पद्धतीने शुद्धिपत्रक काढण्यात आले. काही विशिष्ट आयएएस अधिकारी आणि कंत्राटदार तर या मागे नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शुद्धिपत्रक काढण्यापूर्वी ‘प्री बिड कॉन्फरन्स’ घ्यावी, त्यात सर्व संभाव्य निविदाकारांशी शासनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून शुद्धिपत्रक तयार करावे, या आदर्श पद्धतीला मूठमाती देण्यात आली

Mega Bharti 2021 – Maharashtra State Mega bharti of 72000 Post is Starting Soon. After Maratha aarakshan Clearance this Mega Bharti Process is starting Soon. All Details & Important Links will be available Soon on www.GovNokri.in.

10% Aarakshan Latest Updates – 4th Feb 2019

Mega bharti New Update on 4th Feb 2019

Mega Bharti 2021 – Maharashtra State Government will start their mega recruitment very soon. The official notification for Maharashtra Government Mega recruitment will be soon released. For this Maharashtra Government does planning regarding to conduct the mega recruitment process. In upcoming few days the official recruitment advertisement will be released For Mega Bharti 2021.

In this mega recruitment it is expected that the recruitment process will be conduct for ZP post will be for 672 vacancies of various posts. The details for filling up these vacancies of Mega Bharti 2019 will be released soon. Maharashtra Government is expected to released the official recruitment notification for filling up these vacant seat will be released on 18th or 19th December 2018.

72000 Posts Mega Bharti Online apply of Mega Bharti 2022

Name of Departments Total Posts
Gram Vikas Vibhag (ग्रामविकास विभाग)
11005 Posts



Arogya Vibhag (आरोग्य विभाग)
10568 Posts
Gruh Vibhag (गृह विभाग)
7111 Posts
Krushi Vibhag (कृषी विभाग)
2572 Posts
Pashusanvardhan Vibhag (पशुसंवर्धन विभाग)
1047 Posts
Sarvajanik Bandhkam Vibhag (सार्वजनिक बांधकाम विभाग)
837 Posts
Jalsampada Vibhag (जलसंपदा विभाग)
827 Posts
Jalsandharan Vibhag (जलसंधारण विभाग)
423 Posts
Matsya Vyavsay Vikas Vibhag (मत्स्य व्यवसाय विकास विभाग)
90 Posts
Nagar Vikas Vibhag (नगरविकास विभाग)
1664 Posts

As per the latest updates of Mega Bharti 2021 for 72000 Vacancies Recruitment Process – This recruitment should be online. Written examine will be held on February 2019. More details are as follows:

New Update महाराष्ट्रात विभाग निहाय ७२००० पदांसाठी  भर्ती पुढील आठवड्यात सुरु होणार आहे, ‘मराठा आरक्षणामुळे राज्य सरकारी सेवेतील ७२ हजार पदांची महाभरती थांबविण्यात आली होती. नोकरभरती तत्काळ सुरू केली जाईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भात नवीन अपडेट्स लवकरच www.GovNokri.in वर उपलब्ध होतील..




Mega Bharti 2022 Online Apply- Maharashtra Mega bharti News on 29 March 2019 – In today’s assembly Chief Minister of Maharashtra state Devendra Fadanvis said that there will be mega recruitment for various department of state government For Mega Bharti 2021. In coming two year various departments of Maharashtra state government will have vacancies of about 72 thousand. These all various vacancies of the posts will start filling in coming year. This mega recruitment will be conduct into two steps, in first step recruitment will be start for 36 thousand vacancies & in next step remaining positions will be filed.

Also the Chief Minister of Maharashtra state shows the various vacancies available in the various departments of Maharashtra states governments. These recruitment process will be soon get start & ore details about this will be available soon, as he added. At initial stage about 36 thousand vacancies are going to fill for  following mention departments

Rajya Shasan Bharti 2021 Various Vacancies Available :

  • Agricultural – 2500 Posts
  • Animal Husbandry – 1047 Posts
  • Fish Farming– 90 Posts
  • Rural Development – 11 Thousand Posts
  • Health Department – 10568 Posts
  • Home Ministry – 7111 Posts
  • Construction – 8337 Posts
  • Water Resource Department – 8227 Posts
  • Water Conservation Department – 2423 Posts
  • Urban Development– 1500 Posts

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Maharashtra Mega Bharti 2023 New updates

  2. Iranna says
  3. Kureshi Mohasin Ahmad says

    Sir Mai eak berozgar ladka hoo muze job ki jarirat hai ?
    Meri padhhai 12th hogai science me se ab mera SY Bsc secondiar chalu hai 2021

  4. Rohan says

    Job chahiye

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!