MUHS Exam : वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा लांबणीवर

MUHS Exam 2022 Postponed

Medical Exam 2022- Due to the outbreak of Omicron virus, the examinations of medical students conducted by the Maharashtra University of Health Sciences have been postponed (MUHS Exams). Medical PG Exams will now be conducted from 14th February 2022. These exams were to start on January 17, 2022.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (MUHS Exams postponed) आल्या आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Medical PG Exams) आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ((Medical UG Exams) ) या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.

राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


MUHS Exam Time Table

Maharashtra University of Health Sciences (MUHS) summer session – 2021 examination schedule has been changed. Detailed information in this regard has been published on the official website of the University www.muhs.ac.in.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) उन्हाळी सत्र- 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा वेळापत्रकात  बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द

नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2021

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी 2021 सत्रातील परीक्षा राज्यातील विविध 177 परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष, तृतीय वर्ष विविध विद्याशाखांचे पदवीच्या विद्यार्थ्यांचे दि. 12 ते 30 ऑक्टोबर 2021 दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सदर परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करणेबाबत कार्यवाही करावी असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.

Examination – विद्यापीठ उन्‍हाळी-२०२१ टप्‍पा क्र ३ परीक्षा (दि १२/१०/२०२१ ते ३०/१०/२०२१) संचलनाबाबत New


Medical UG Exam 2021

The Medical UG Exam 2020 conducted by Maharashtra University of Health Sciences (MUHS) will start from June 10. If the Covid test of the students appearing for these examinations is positive, a special examination will be conducted for the students who are absent from the examination.

Medical Exam 2021: MUHS च्या वैद्यकीय परीक्षार्थींना दिलासा

UG Medical Exam June 2021 Update: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (MUHS) घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा (Medical UG Exam 2020) येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी (Covid 19) पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्या बद्दल तो प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


The examinations for the postgraduate medical course will start from August 16. The written examination for the summer session 2021 postgraduate medical course of the university was scheduled from 24th June 2021. Considering the situation of Kovid-19, the examination was postponed for some time for the safety of the students.

Medical PG Exams 2021: पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाची उन्हाळी सत्र २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचा कालावधी मिळेल. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-१९ आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून घेण्यात याव्यात.


Medical Exam 2021

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार!

The examinations for medical students in the Maharashtra state, which will start from June 2, will now be held from June 10 to 30, Medical Education Minister Amit Deshmukh has said. These examinations include the first, second and third year examinations of MBBS, BDS, BAMS, BHMS, BPTH, BPTH and BSC Nursing degree examinations. Read the more details below:

  • राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत,अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
  • राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या परीक्षांमध्ये MBBS,BDS,BAMS,BHMS,BPTH BPTH आणि BSC नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.
  • या वैद्यकीय पदवी परीक्षा सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

The examinations for the postgraduate medical courses for the academic year 2020-21 were to start from May 25. Due to coronary conditions, they were postponed and would start from June 24. Now again they have been postponed indefinitely.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. मात्र त्या आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या परिपत्रकाची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


Written examinations for all degree courses of Maharashtra University of Health Sciences will be held in June 2021. More detailed information and schedule in this regard has been published on the official website of the University www.muhs.ac.in

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा माहे जून २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा दोन जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने सुधारित तारखा जारी केल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी- २०२० व उन्हाळी २०२१ सत्रातील लेखी परीक्षा सध्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत.


Medical Exam 2021: वैद्यकीय परीक्षा लांबणीवर

Medical Exam 2021: Medical examinations have also been postponed. This information was given by Medical Education Minister Amit Deshmukh. The exams, which were scheduled to be held from April 19, will now be held in June.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार आहेत.

तसेच या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

In view of the increasing prevalence of corona in the state and the increasing number of patients, there is a demand from the people’s representatives, students and organizations to postpone the examination. Examinations will be conducted by Maharashtra University of Health Sciences from 19th April to 30th June.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची वाढती संख्या पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, संघटनांकडून होत आहे. अभ्यासिका देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र, सदरील परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आज करोनाबाधित आहेत. तर परीक्षेला बसता यावे म्हणून लक्षणे असून सुध्दा अनेक विद्यार्थी करोनाची चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.


Medical Exam 2020

वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रक्रियेत यंदा करण्यात आलेल्या बदलांनी विद्यार्थी गोंधळले आहेत. अखिल भारतीय कोटय़ातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्यामुळे कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यानंतर देशपातळीवरील प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. मात्र, राज्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही किंवा राज्याची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली नाही. आता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल, तर पहिली प्रवेश यादी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्याच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी पेचात सापडले आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

*   प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी – १२ नोव्हेंबर, सायं. ५ वाजेपर्यंत

*   महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – ६ ते १३ नोव्हेंबर

*   पहिली गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर, सकाळी ८

*   पहिली प्रवेश यादी – १५ नोव्हेंबर, सायंकाळी ५

*   पहिल्या यादीनुसार प्रवेश घेणे – २० नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

पेच काय?

यंदा नीटचा निकाल वाढल्यामुळे राज्याच्या यादीत नेमके स्थान कसे आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मुळातच गोंधळ आहे. महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या १५ टक्के जागांवरील प्रवेश अखिल भारतीय कोटय़ातून करण्यात येतात. या कोटय़ाची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोटय़ातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोटय़ातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेता येणे शक्य नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. राज्याने गुणवत्ता यादी अखिल भारतीय कोटय़ाच्या यादीपूर्वी जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाविद्यालयांचे पर्याय भरण्यासाठी काही तास..

सध्याच्या वेळापत्रकानुसार १२ नोव्हेंबपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहेत, तर १३ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. राज्याची गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला सकाळी जाहीर करण्यात येणार आहे. कोणत्या महाविद्यालयातील उपलब्ध जागा किती आहेत, राज्याच्या यादीतील स्थान काय आहे यानुसार कोणत्या महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे याचा अंदाज विद्यार्थी घेतात. त्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहेत.

Maharashtra University of Health Sciences is preparing to conduct the final year examination of BDS from 17th August and the postgraduate medical examination from 25th August. However, as Karona’s condition is still critical in Maharashtra, including Mumbai, the university’s decision on the exam should be canceled or postponed immediately, a public interest petition was filed by Akash Rajput and some other students. It was done by Kuldeep Nikam.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा परीक्षा १७ ऑगस्टपासून

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होत आहेत..

‘परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असताना आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याकरिता तयारी केली असताना, या टप्प्यावर स्थगिती देऊन त्यांच्या हिताला बाधा पोहचवता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवून मेडिकल अभ्यासक्रमाच्या १७ ऑगस्टपासूनच्या परीक्षांना स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा १७ ऑगस्टपासून तर, पदव्युत्तर मेडिकलच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्याची तयारी केली आहे. मात्र, मुंबईसह महाराष्ट्रात करोनाची स्थिती आजही गंभीर असल्याने परीक्षेचा विद्यापीठाचा निर्णय रद्द करावा किंवा तूर्तास त्याला स्थगिती द्यावी, अशा विनंतीची जनहित याचिका आकाश राजपूत व अन्य काही विद्यार्थ्यांनी अॅड. कुलदीप निकम यांच्यामार्फत केली होती.

‘परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र, परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे हे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंती अॅड. निकम यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत केली.

तेव्हा विद्यापीठातर्फे अॅड. राजशेखर गोविलकर यांनी या विनंतीला तीव्र विरोध केला. ‘देशभरातील अभिमत विद्यापीठे व अन्य विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना निकालपत्रे मिळाली नाही, तर करिअरच्या बाबतीत त्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. उच्च शिक्षण व विशेष शिक्षणात त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. शिवाय पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होऊन संबंधित विद्यार्थी पदवीधर होणेही सध्या गरजेचे असून करोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची मदत होईल. म्हणून या परीक्षा होणे गरजेचे आहे. विद्यापीठाने त्या संदर्भात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. शिवाय हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहे’, असे म्हणणे अॅड. गोविलकर यांनी मांडले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने स्थगितीची विनंती फेटाळली. ‘परीक्षांच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी विद्यार्थ्यांनी याचिका केल्या आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या आणि तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार न करता या टप्प्यावर संपूर्ण परीक्षा स्थगित करणे योग्य होणार नाही. ज्यांची परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची तयारी नसेल त्यांनी परीक्षा न देण्यामागे ठोस कारणे भविष्यात मांडली आणि ती न्यायालयाला पटली, तर त्यांच्या बाबतीत स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निर्देश न्यायालय देऊ शकते. त्यामुळे तूर्तास स्थगितीची विनंती फेटाळण्यात येत आहे’, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

रुग्णांवर उपचार कसे करणार?

‘तुम्ही करोनाच्या भीतीमुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यासाठी घाबरत असाल, तर मग रुग्णालयात रुग्णांवर उपचार तरी कसे करणार‌?’‌ असा प्रश्नही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकादार विद्यार्थ्यांसमोर सुनावणीदरम्यान उपस्थित केला.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!