Medical Education-खुशखबर! परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा १२ जानेवारी रोजी
Medical Education Department Bharti 2024 -Notification, Vacancy, Apply Link
Medication Education | Medical Degree – Students completing medical studies abroad are required to pass the medical degree examination abroad if they want to pursue medical profession in India. The National Board of Examinations (NBSHSE) has announced the date of the exam, which will be held on January 12, 2025.
Every year, many students go abroad to study medicine. This includes more students going to China and Russia. After completing their medical studies, these students come back to India to pursue medical profession. However, the National Commission for Medical Sciences has made foreign medical degree examination mandatory for these students to prevent them from coming to India with degrees on the basis of money. Candidates Read the complete details given below on this page regarding the Medical Examine 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा १२ जानेवारी रोजी
परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करायचा असल्यास परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. वैद्यकीय परीक्षा संदर्भात असलेल्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे त्यानुसार ही परीक्षा १२ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशी जातात. यामध्ये चीन व रशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी पुन्हा भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. मात्र पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणार्यांना आळा घालावा यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या विद्यार्थ्यांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा बंधनकारक केली आहे. तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता करणे बंधनकारक असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे १२ ते १५ टक्के इतकेच असते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे १२०० तर देशात १० हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आंतरवासिता करण्यासाठी येतात. यावर्षी परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा १२ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी येत्या काही दिवसांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी परीक्षेला बसण्यासाठी अर्जदारांना ७ हजार ८० रुपये इतके नोंदणी शुल्क भरावे लागले होते. ही परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाईल. दोन्ही भागांमध्ये एकूण १५० बहुपर्यायी प्रश्न असतील.
Medical Education Department Bharti 2022
Medical Education Department Bharti 2022- Latest updates regarding Medical Education Department is that There will be recruitment of 4500 posts under the medical education department in the state. Candidates Read the complete details given below on this page regarding the Medical Education Department Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
वैद्यकीय शिक्षण विभागात ४५०० पदांची भरती
Official website of Medical Education Department in Maharashtra is https://medical.maharashtra.gov.in. Candidates see the further details regarding this news here.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूषखबर आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत साडेचार हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचऱ्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी टीसीएस आयओएन या कंपनीमार्फत होणार भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचऱ्या संवर्गातील सुमारे ४५०० पदे भरण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
Medical Education Department Bharti 2022: The post of Medical Director is vacant in the Department of Medical Education. The role of medical education department hospitals across the state is important in the treatment of coronary heart disease. But the post of permanent medical director has been vacant for the last 35 months. Read More details as given below.
वैद्यकीय शिक्षण विभागात वैद्यकीय संचालक पद रिक्त
करोनाग्रस्तांवर उपचारात वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यभरातील रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु गेल्या ३५ महिन्यांपासून कायम वैद्यकीय संचालकाचे पद रिक्त आहे. आता ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच आयुष खात्याचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली हेही या महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे महत्त्वाची पदे भरली केव्हा जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
- वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित राज्यातील वीसहून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये असून इतर खासगी रुग्णालयावरही या खात्याकडून लक्ष दिले जाते. करोना काळात राज्यातील सर्व रुग्णालयांत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. दोन्ही लाटेत मोठय़ा संख्येने रुग्णांवर उपचार झाले. त्यामुळे या खात्यातील महत्त्वाची पदे शासनाने तातडीने भरणे अपेक्षित आहे. परंतु येथील संचालकांचेच पद ३५ महिन्यांपासून रिक्त आहे.
- वैद्यकीय शिक्षण खात्यात डॉ. प्रवीण शिनगारे हे जानेवारी २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर या पदाची अतिरिक्त जबाबदारी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे होती. सहा महिन्यांपूर्वी तेही सेवानिवृत्त झाले. त्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांना वैद्यकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली. दरम्यान, डॉ. शिनगारे सेवानिवृत्त होऊन ३५ महिने झाल्यावरही या पदावर कायम अधिकारी नाही.
- त्यातच आयुष खात्याचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली हेही या महिन्यात निवृत्त होत आहेत. भविष्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्यास झटपट निर्णयासह नवीन यंत्रणा उभारण्यासाठी ही पदे भरणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया या विभागातील विविध डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.
- ‘‘वैद्यकीय शिक्षण खात्यासह आयुष खात्यातील कायम संचालकाचे पद तातडीने भरण्यासाठी नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे. सध्या रुग्णांवर उपचारासह इतर कोणत्याही निर्णय प्रक्रियेत अडचणी येऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जात आहे.’’