RTO Bharti 2023- नागपूर शहर आणि ग्रामीण आरटीओमध्ये अनेक पदे रिक्त
Maharashtra RTO Bharti 2023
Maharashtra RTO Bharti 2023– This is the status of 5 rural RTO offices under Nagpur division. There are total 330 sanctioned posts in these 5 offices out of which 141 posts are vacant. Read More details are given below.
Rajya Parivahan Vibhag Bharti 2023
नागपूर शहर आणि ग्रामीण आरटीओमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने कामावर वाईट परिणाम होत आहे. आरटीओ (शहर) मध्ये एकूण 61 पदे रिक्त आहेत. एकूण १४६ पदे मंजूर असून त्यापैकी ८५ पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण आरटीओमध्ये एकूण 131 पदे मंजूर असून त्यापैकी 69 पदांवर नियुक्ती आहे तर 62 पदे रिक्त आहेत. नागपूर विभागांतर्गत ५ ग्रामीण आरटीओ कार्यालयांची ही स्थिती आहे. या 5 कार्यालयांमध्ये एकूण 330 मंजूर पदे असून त्यापैकी 141 पदे रिक्त आहेत.
Nagpur RTO Recruitment 2023
गडचिरोली RTO मध्ये 52 मंजूर पदांपैकी 26 पदे, चंद्रपूर RTO मध्ये 66 मंजूर पदांपैकी 26 पदे, गोंदिया RTO मध्ये 45 मंजूर पदांपैकी 14 पदे आणि भंडारा RTO मध्ये 36 मंजूर पदांपैकी 13 पदे आहेत. वर्धा आरटीओमध्ये 46 मंजूर पदांपैकी 18 पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाकडून रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते, मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.
रिक्त असलेली महत्वाची पदे : – Maha RTO Vacancy 2023
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 1 पद, मोटार वाहन अभियोक्ता 1 पद आणि मोटार वाहन निरीक्षक 10 पदे रिक्त आहेत. याशिवाय सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 1 पद, प्रशासकीय अधिकारी 1 पद, यंत्रणा प्रशासक 1 पद, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 15 पदे, कर वसुली अधिकारी 2 पदे, कंत्राटी वाहन तपासणी अधिकारी 2 पदे, वरिष्ठ लेखा परीक्षक. खाते 1 पदे, लिपिक टायपिस्टची 14 पदे, चालकाची 3 पदे, एकूण 61 पदे रिक्त आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (पूर्व) मध्ये 56 मंजूर पदांपैकी 28 पदे रिक्त आहेत. येथे मोटार वाहन निरीक्षकाची 7 पदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची 1 पदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची 1 पदे, वरिष्ठ लेखा परीक्षकाची 1 पदे, मुख्य लिपिकाची 1 पदे, टंकलेखकाची 1 पदे, लिपिक टंकलेखकाची 3 पदे, सहाय्यक कोषाध्यक्ष के. ३ पदे, हवालदार १ पद, चौकीदार १ पद व इतर २ पदे रिक्त आहेत.
Soon 48 Assistant Motor Vehicle Inspectors Will Be Promoted In The State
“The transport department has decided to promote 48 assistant motor vehicle inspectors and some assistant regional transport officers. The proposal has gone to the General Administration Department and will be approved soon. Preference will be given to RTO offices with more vacancies when making appointments. “
आरटीओ’अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त!
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत.
करोनामुळे परिवहन खात्यातील भरारी पथकांचा महसूल निम्म्याने घटला आहे. मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विलंबानेच का होईना पण, परिवहन खात्याने राज्यातील ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे.
राज्यात परिवहन खात्याच्या अखत्यारितील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन अशी (आरटीओ) ५० कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या अखत्यारित ५० ते ७५ भरारी पथके आहेत. या पथकांकडून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. टाळेबंदी काळात या पथकांची कारवाई बंद होती. त्यामुळे यावर्षी केवळ ३९ कोटी ९७ लाख २४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल मागच्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यात पुन्हा मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने भरारी पथकांना कारवाईसाठी बाहेर पडता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सहा सहायक अधिकाऱ्यांनाही पदोन्नती
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने सहा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदावर पदोन्नती देण्याचा प्रस्तावही सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. त्यामुळे हे सहा अधिकारीही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
‘‘परिवहन खात्याने ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि काही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निश्चित केले आहे. हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे गेला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. नियुक्ती करताना जास्त जागा रिक्त असलेल्या आरटीओ कार्यालयांना प्राधान्य दिले जाईल.’’
सोर्स:लोकसत्ता
आरटीओ’निरीक्षकांची ८०० हून अधिक जागा रिक्त!
Due to a large number of vacancies for Motor Vehicle Inspectors and Assistant Motor Vehicle Inspectors in the state, the work in RTOs is being hampered. There are more than 800 vacancies in both the posts, followed by Regional Transport Officer, Assistant and Deputy Regional Transport Officer. As a result, many works related to vehicles are being delayed and special action against illegal traffic in the state has been suspended.
रिक्त पदांमुळे ‘आरटीओ’तील कामकाज मंदगतीने
राज्यात मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्यामुळे आरटीओतील कामांचा खोळंबा होत आहे. या दोन्ही पदांच्या एकूण ८०० हून अधिक जागा रिक्त असून त्यापाठोपाठ प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदांचाही समावेश आहे. त्यामुळे वाहनांशी संबंधित अनेक कामांना विलंब होत असून राज्यातील अवैध वाहतुकीविरोधातील विशेष कारवाई थंडावली आहे.
आरटीओत शिकाऊ वाहन परवाना, पक्का परवाना याबरोबरच वाहन चाचणी, वाहन तपासणी इत्यादी वाहनांशी संबंधित कामांसाठी दररोज अनेक जण येत असतात. टाळेबंदीआधी आरटीओत येणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे आरटीओ नेहमीच गजबजलेले होते. टाळेबंदी लागताच सुरुवातीचे चार महिने वर्दळच नव्हती. मात्र शिथिलिकरणानंतर आरटीओतील कामकाज हळूहळू पूर्ववत झाले. त्यातच अनेकांनी मोठय़ा संख्येने खासगी वाहने घेण्यावर भर दिला. परिणामी कामकाज वाढले. करोनामुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती आणि त्यातच कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढला आहे. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओतील परिवहन अधिकारी, सहाय्यक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारीबरोबरच मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकू ण ८५५ जागा रिक्त आहेत. यातील मोटार वाहन निरीक्षकाची ८६७ मंजूर पदे असतानाच २७९ पदे, तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या राज्यात १,३०२ मंजूर पदांपैकी ५३३ पदे रिक्त आहेत.
आरटीओ’अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त!
परिणामी शिकाऊ परवान्यासाठी परिक्षेच्या तारखा वेळेत न मिळणे, पक्का परवावा देण्यासाठीही काहीसा विलंब होणे, याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालवाहतूक यावरील कारवायाही थंडावल्या आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहाय्यक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्याही रिक्त जागा त्वरीत भरण्याकडे सरकारने दुर्लक्षच के ले आहे.
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच रुजू होतील. तर मोटर वाहन निरीक्षकांमध्ये ४६ जणांची बढती असून त्याची शासनाकडून मंजुरी येणे बाकी आहे. याशिवाय सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याही जागा भरल्या जाणार असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारीमध्येही लवकरच बढती देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी बढती देण्यासाठी असलेल्या समितीची बैठक झालेली नाही. ती झाली की पुढील प्रक्रि याही होईल.