आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली
Maharashtra Online Rojgar Melava 2020
आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक घटकांवर पहायला मिळत आहे. उद्योग, व्यापारांची गती मंदावली आहे. त्यानंतर सुद्धा अर्थचक्राला गती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
मुंबई रोजगार मेळावा 2020
वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी व विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
बेरोजगारांना रोजगाराची संधीः ईकॉम एक्स्प्रेस 30,000 लोकांना देणार …
या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील संधींचा फायदा घेण्यासाठी तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून केंद्र शासनातर्फे सन् २००९ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात सन् २०१० पासून करण्यात आली आहे.
Maharashtra Job Fair 2020
कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये नामांकीत खासगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी एकूण २०० पेक्षा अधिक पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. तसेच पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल .
रोजगारांची संधी! 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!
असा करता येईल अर्ज
– पात्र असलेल्या उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदांकरिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात.
– उमेदवार आपल्या सेवायोजन कार्डच्या यूझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन मधून ऑनलाईन अर्ज करावे.
Flipkart मध्ये मेगा भरती; 70 हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार
– विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिंग पदविका (एएनएम, जीएनएम), आयटीआय पास, पदविधर उमेदवारांना सेवायोजन कार्डच्या आयडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करता येईल.
शिपायापासून अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या: बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगारीची संधी
इयत्ता नववीपासून बी.ई. इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु बेरोजगार आहात… अशा तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी खासगी कंपन्या पुढे आल्या आहेत. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी सुरू राहील
मुंबई रोजगार मेळावा 2020
.
पुणे ऑनलाईन रोजगार मेळावा
जिल्ह्यातील विविध कंपन्यांना त्यांच्याकडील नववी उत्तीर्णपासून पुढे दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मेकॅनिक, प्रॉडक्शन या शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदासाठी नोंदणी करता येईल. हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी www.rojgar.mahaswayam.org.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
Maharashtra Job Fair 2020
होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगइनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगइन करावे.
त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील पंडित दिनदयाल उपाध्याय-4 या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची माहिती घेऊन पात्रतेनुसार पदाची निवड करून ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवावा. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईलतसेच, ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.
बेरोजगार युवक युवतींनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Please job sar BSC typing english mrathi English MSCIT
BA, MSCIT, steno Marathi 120, qualifications…..
plz sir muze job ki jarut hai
YES
What’s job
Yes Mero ko job ki jaruri he