शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश योजनेस अर्ज करण्यास मुदतवाढ – Hostel Admission 2024-25

Maharashtra Government Hostel Admission 2024-25

Maharashtra Government Hostel Admission 2024 – Extension of time to apply for “Pandit Dindayal Upadhyay Swayam” Yojana for students of Dhangar Samaj belonging to Nomadic Tribe – C Category studying after Class 12th. Under this scheme, students will get food, accommodation and subsistence allowance of Rs. 38,000/- to Rs. 60,000/-. An amount up to is deposited directly in the bank account of the students. The scheme is applicable to students belonging to dhangar community belonging to nomadic tribe C category. Under this scheme, a student needs at least 60 % marks in class 12 and the student should be eligible for hostel admission, the student should be a resident of the state of Maharashtra, the parent’s income should be Rs.2.50 lakh.  The main criteria/qualifications are that the maximum age of the student should not be more than 30 years, the student should not be engaged in any kind of job or business, the attendance of the student in the college should be at least 75 %.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to apply – The eligible students should submit their application along with the necessary documents to the Assistant Director, Other Backward Classes Welfare Office, Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Building Kalwa, Dist. Submissions should be made within the stipulated time at Thane 400605. Please note that applications received after the prescribed time will not be accepted.

शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळाल्यास इयत्ता १२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी “पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम” योजनेस अर्ज करण्यास मुदतवाढ.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद्, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसलेल्या भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय योजना’ लागू करण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस भोजन, निवास या सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच निर्वाह भत्त्यासाठी रु.३८,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. सदरील योजना भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत तसेच विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, महाविद्यालयातील विद्यार्थ्याची उपस्थिती किमान ७५ टक्के असावी आदी प्रमुख निकष /पात्रता आहे.
सदर योजने अंर्तगत अर्ज स्वीकृतीस यापूर्वी दि. ३०/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि अद्यापि उच्च शिक्षणाचे काही अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रकिया चालू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करण्यास शक्य न झाल्याने मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्याकडून खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

  • अ.क्र. – शैक्षणिक वर्ष – अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक – निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक
  • 1. उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष – दि. ११-११-२०२४ – दि. १५-११-२०२४
  • २ उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष – दि. ११-११-२०२४ – दि. १५-११-२०२४

सबब पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कळवा, जि. ठाणे ४००६०५ येथे विहित मुदतीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


Hostel Admission 2023- A hostel with a capacity of 250 girls will be started in the year 2022-2023 at Chembur, Mumbai by the Department of Social Justice and Special Assistance. Applications are invited from the students for hostel admission till 1st March 2023. Eligible students should submit the hostel admission application along with all the required documents within the prescribed time frame

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सन २०२२-२०२३ मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत ४ था मजला, चेंबूर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक ११६, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे १ मार्च २०२३ पर्यंत होईल. प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी :

विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन २०२२-२०२३ मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


Samaj Kalyan Hostel Admission 2022

Maharashtra Govt Hostel Admission 2022: The Department of Social Justice and Special Assistance has started the admission process for backward class students in government hostels. Online application is being invited for admitting the students of Scheduled Castes and Other Backward Classes who are studying from VIII onwards in the hostel of Social Justice Department.. Interested candidates may submit online application from through the given link.

लातूर : आठवीपासून पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या तसेच अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. जिल्ह्यात एकूण २५ वसतिगृह संख्या असून, या वसतिगृहांमध्ये २७९० प्रवेश क्षमता आहे. पैकी ११२९ जागा रिक्त आहेत. 

लातूर शहरातील विस्तारित एमआयडीसीत एक हजार मुलामुलींच्या वसतिगृहासह जिल्ह्यात एकूण २५ वसतिगृहे आहेत. या सर्व वसतिगृहात २७९० मुला-मुलींना राहण्याची सोय आहे. मुलींचे स्वतंत्र वसतिगृह आहेत. आठवीपासून पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहात गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. 

शासकीय वसतिगृहाचे सन २०२२-२३ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक

अ.क्र. अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
शालेय विद्यार्थी दि.17.07.2022 पर्यंत
इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.30.07.2022 पर्यंत
बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.24.08.2022 पर्यंत
4 व्यावसायिक अभ्यासक्रम दि.30.09.2022 पर्यंत

How to Apply For Government Hostel Admission 2022

  1. The applicant needs to register on the website Create User Id.
  2. The applicant can login using the credentials and fill the form as instructed.
  3. The applicant can fill the online application form for “Admission to Government Hostel” in the citizen login section: Online Application.
  4. Submit the application.

APPLY ONLINE FOR HOSTEL ADMISSION

REQUIRED DOCUMENTS FOR SAMAJ KALYAN HOSTEL ADMISSION

  • Transfer Certificate
  • Adhar Card
  • Domicile certificate
  • Id Proof
  • Applicants Last Year Report Card
  • Cast certificate (If Required)
  • Passport size photos
  • Pan Card
  • Income certificate
  • Board certificate

योजना राबविणे मागची उद्दिष्टे

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.

योजनेचे लाभाचे स्वरूप

1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.

अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० जून पर्यंत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
6. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.

संपर्क

1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
2. संबंधित गृहपाल , मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह.
3. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण.


Maharashtra Government Hostel Admission 2022:The Department of Social Justice and Special Assistance has started the admission process for backward class students in government hostels. In these hostels of the Social Welfare Department, accommodation has been arranged for students from class V to XII. Students can benefit from this. Seats are currently available for admission in hostels. Students should apply for it before the last date. Read More details as given below.

बारामती ,  पुणे जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या वसतिगृहांमध्ये आठवीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. सध्या पुणे जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मुलींसाठी देखील काही शासकीय वसतिगृह राखीव आहेत.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २३ वसतिगृहांमधील २ हजार ४८५ जागांपैकी १ हजार ३०९ प्रवेश झाले आहेत. सध्या १ हजार १७६ जागा रिक्त आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यामध्ये १० वसतिगृह राखीव आहेत. या वसतिगृहांमध्ये अद्यापही ४१६ जागा रिक्त आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशासाठी, लेखन साहित्याकरिता ४ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता,

यवतमाळ : मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी घेता यावी म्हणून समाज कल्याण विभागामार्फत मोफत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचव्या वर्गापासूनच वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. शासकीय आणि अनुदानित वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि व्हीजेएनटीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली  आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था होण्यास मदत होईल.


Maharashtra Government Hostel Admission 2022:The Department of Social Justice and Special Assistance has started the admission process for backward class students in government hostels. According to the schedule of the government hostel, the application is to be made offline for the school students.  Students who want to get admission in government hostels. They should receive the application from the Government Hostel for Backward Class Girls, Rahate Colony, Wardha Road and submit it before the given time.

SJSA Govt Hostel Admission 2022

SJSA मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रीया सुरु

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु असून रिक्त जागेकरीता प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह, निवासी शाळा सुरु करण्यात आली असून चालू शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक सत्राच्या रिक्त जागेकरीता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक समाज कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे. ज्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रहाटे कॉलनी, वर्धा रोड येथून अर्ज प्राप्त करुन निर्धारित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

वेळापत्रक यानुसार

  • शासकीय वसतिगृहाचे वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 15 जुलै पर्यंत राहील.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 जुलै राहील.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 25 जुलैपर्यंत, रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 27 जुलै आहे.
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 5 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 10 ऑगस्टपर्यंत  राहील.

दहावी अकरावीनंतर

  • दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ( व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 जुलै पर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट राहील. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत आहे.
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 17 ऑगस्ट आहे. तर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 27ऑगस्टपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 ऑगस्ट 2022पर्यंत पूर्ण होईल.

पदवी व पदव्युत्तरसाठी

  • बी.ए, बी.कॉम व बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका व पदवी आणि एम.ए.एम.कॉम व एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविकास आदी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 24ऑगस्टपर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 10 सप्टेंबर आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 सप्टेंबरपर्यंत राहील.
  • यानंतर रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 23 सप्टेंबर आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण होईल.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

  • व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 सप्टेंबर 2022पर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 3 ऑक्टोबर पर्यंत राहील.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 ऑक्टोरपर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनूसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 ऑक्टोबर आहे.
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहील.
  • अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!