गुजरात न्यायालयाचा निर्णय देशभरातील अंगणवाडी सेविकांना लागू करा, येथे वाचा- Maharashtra Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024 Vacancy Details & Application Form

As per the latest Maharashtra Anganwadi Bharti 2024 update –  The Gujarat High Court has directed the Centre and the state governments to regularise the services of anganwadi workers and helpers by formulating a policy to regularise them as class III and IV government employees.  The court noted that anganwadi workers have to do a lot of work. The Gujarat High Court has directed the state government to frame a policy to regularise anganwadi workers and helpers in government services within six months. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

गुजरात न्यायालयाचा निर्णय देशभरातील अंगणवाडी सेविकांना लागू करा

गुजरात उच्च न्यायालयाने केंद्र व गुजरात राज्य सरकारला अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वर्ग ३ व ४ चे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्यासाठीचे धोरण आखून त्यांच्या सेवा नियमित कराव्यात, असा आदेश दिला आहे.  न्यायालयाने नमूद केले की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. गुजरात उच्च न्यायालयाने ६ महिन्यांच्या आत अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय सेवेत नियमित करण्याबाबत धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत.

  • अ. भा. अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनची मागणी आहे की, गुजरात सरकारने दिलेल्या मुदतीत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे व केंद्र सरकारने हा निकाल देशभरात लागू करण्याचा निर्णय घ्यावा.
  • बालकांचे कुपोषण निर्मूलन आणि त्यांचे संगोपन व पूर्व शालेय शिक्षण यासारखे महत्त्वाचे प्रश्न हाताळणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे (आयसीडीएस) हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
  • यानिमित्ताने आयसीडीएस योजना कायम करा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशी मागणी आयफाच्या राष्ट्रीय महासचिव ए. आर. सिंधू राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभा शमीम, राष्ट्रीय सचिव राधा सुंकुरवार, राज्य महासचिव चंदा मेंढे व राज्य कार्याध्यक्ष संगीता कांबळे आदींनी केली आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2024 update – There will be a large number of new recruits in anganwadis in Maharashtra. The recruitment will be a great opportunity for women as the posts of helpers are lying vacant in many anganwadis in the state. The state government has decided to recruit around 15,000 anganwadi helpers. This is likely to provide employment to many unemployed women.

  • What should be the qualification? Educational Qualification: Must have passed 12th class. Additional marks: Additional marks will be given to widows, orphans, SC-ST, OBC, Special Backward Classes, candidates with two years of teaching experience.
  • How is the selection made? Selection based on marks: Candidates are selected on the basis of educational qualification, experience and reservation. Interview: In some cases, an interview may be conducted.
  • Why are these positions vacant? – Many anganwadi workers have been promoted as anganwadi workers as they have passed class XII. As a result, the posts of assistants have become vacant.

महाराष्ट्रात अंगणवाडी मदतनीस 15,000 पदांची भरती: नवीन संधी

महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन भरती होणार आहे. राज्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये मदतनीसांची पदे रिक्त असल्याने, ही भरती महिलांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

  • किती पदांची भरती होणार? – राज्य सरकारने अंदाजे 15,000 अंगणवाडी मदतनीसांच्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक बेरोजगार महिलांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
  • पात्रता काय असावी? शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. अतिरिक्त गुण: विधवा, अनाथ, एससी-एसटी, ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षाचा अध्यापन अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातील.
  • कशी केली जाते निवड? – गुणांवर आधारित निवड: उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आरक्षणाच्या आधारे केली जाते. मुलाखत: काही प्रकरणांमध्ये मुलाखत घेतली जाऊ शकते.
  • का रिक्त आहेत ही पदे? – अनेक अंगणवाडी सेविकांनी बारावी उत्तीर्ण केल्याने त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे मदतनीसांची पदे रिक्त झाली आहेत.
  • कशासाठी महत्त्वाची आहे ही भरती? – अंगणवाड्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन भरतीमुळे अंगणवाड्यांमध्ये अधिक कर्मचारी उपलब्ध होतील आणि मुलांना चांगली सेवा मिळू शकेल.
  • कधी होईल ही भरती? – भरती प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा संबंधित विभागात संपर्क साधावा.

As per the latest news the chief minister’s ladki bahini scheme in the state seems to be getting a good response. After the scheme, the state government has now announced recruitment of more than 14,000 women. The Mahayuti government is coming up with many new schemes for women. Women and Child Development Minister Aditi Tatkare has given a golden opportunity to women in Maharashtra. Aditi Tatkare has announced the recruitment of Anganwadi helpers and the last date for filling the form will be August 31. Under the Integrated Child Development Services Scheme, instructions have been given at all district and project levels to fill up 14,690 vacant posts of Anganwadi Sevika (helpers) in the state by the end of August 31, 2024. The ad will be published soon. Interested women should apply,” Said Aditi Tatkare. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मोठी बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, अंगणवाडी मदतनीसांच्या तब्बल 14,690 पदांसाठी भरती

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. राज्य सरकारने या योजनेनंतर आता महिलासांठी चौदा हजारांपेक्षा जास्त असलेल्य भरतीची घोषणा केली आहे. महायुती सरकर महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे. आदिती तटकरेंनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली असून 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Anganwadi


Maharashtra Anganwadi Bharti 2024 update – “Around 1.20 lakh anganwadi workers are being distributed smartphones across the state. As a special case for promotion, 3,500 anganwadi workers in the state have been exempted from class 12. A decision on providing pension facility to anganwadi workers will be taken soon,” Women and Child Development Minister Aditi Tatkare said while addressing a rally in Khed. He said the target is to make 36,000 anganwadis solar-powered in the first year where there is no electricity. She was speaking at a women’s rally organised by the Women and Child Development Department at K.D.G. Tatkare Auditorium in Khed and distributed mobile phones to anganwadi workers. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरु करणार, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

‘राज्यभरात सुमारे १ लाख २० हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून १२वी मधून सूट देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल”, अशी मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही, अशा पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेड येथील कै.द.ग.तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

  • ‘राज्यभरात सुमारे १ लाख २० हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून १२वी मधून सूट देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल”, अशी मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही, अशा पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेड येथील कै.द.ग.तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
  • माविम तयार करणार शालेय गणवेश – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व शालेय शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार बचत गटांच्या महिलांना शालेय गणवेशाचे कापड कटिंग करुन पुरविण्यात येणार आहे. त्याच्या शिवणकामासाठी ११० रुपये मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात २ लाख विद्यार्थी असतात. त्यासाठी ‘माविम’ने शिवणकाम केंद्रांवर अधिक भर द्यावा, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, लोकसंचालित साधन केंद्र खेड, नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
  • महिलांना सक्षम करण्यासाठी शासन पाऊले उचलत आहे. महिला दिनाला चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिलांचे सक्षमीकरण, समानता देणे, उद्योगात वाव देणे, बचतगट चळवळ सक्षम करणे, आधुनिक सुविधा देणे, शिक्षणाला प्राधान्य, सुरक्षितता अशा अष्टसुत्रीवर या धोरणात भर देण्यात आला आहे. बचत गटांच्या वस्तू पाठविण्याबाबत पोस्ट खात्याबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांनी मार्केटींगवर भर देताना पोस्टाच्या सुविधाचा लाभ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री यांनी स्वागत प्रस्ताविकाचा सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉलला देखील तटकरे यांनी भेट दिली.

Maharashtra Anganwadi Bharti 2024 for 13000 posts. Mini anganwadi centres will be upgraded to anganwadi centres. Women and Child Development Minister Smriti Irani said the state has been recognised as a complete anganwadi centre for 13,011 mini anganwadis in Maharashtra. Anganwadi workers and employees in the state were protesting. Anganwadi workers and sevikas had submitted a memorandum to MP Patil demanding that their various demands be conveyed to the central government. Taking note of this, MP Patil asked about the remuneration of anganwadi workers and various facilities in the budget session of the Lok Sabha. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Maharashtra State has been recognized as the complete Anganwadi Center of 13091 Mini Anganwadis in Maharashtra. Under Mission Saksham Anganwadi and Poshan 2.0, 50 thousand Anganwadi buildings will be constructed at a rate of ten thousand every year over a period of five years. Anganwadis are competent for maternity and childhood care and development. It is proposed to provide better infrastructure than traditional Anganwadi.

राज्यात १३ हजार अंगणवाड्यांना मान्यता – खासदार पाटील यांच्या प्रश्नावर बालकल्याणमंत्री इराणी यांची माहिती

मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील. महाराष्ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या, “मिशन पोषण २.० देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी, मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील”.

  1. महाराष्ट्रातील १३०९१ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत, ५० हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी सक्षम अंगणवाड्या आहेत. पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.
  2. इंटरनेट, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, एलईडी स्क्रीन, वॉटर प्युरिफायर केंद्रे आरओ मशिनचे आणि स्मार्ट शिक्षण उपकरणांनी सुसज्ज ११५० अंगणवाड्या झाल्या आहेत. अंगणवाड्यांचे मानधन वाढवतो. एक ऑक्टोबर २०१८ पासून केंद्र सरकारने अंगणवाड्यांचे मानधन वाढवले आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंत्रालय, अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना १८० दिवसांच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे.
  3. प्रसूती रजा, एकदा ४५ दिवसांसाठी गर्भपात सशुल्क अनुपस्थिती, तसेच २० दिवसांची वार्षिक पाने अनुज्ञेय आहेत. दोन साड्या आणि विम्याचे लाभ दिले गेले आहेत.
  4. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण: अंगणवाडी कोविड-१९ मध्ये गुंतलेल्या कामगार आणि अंगणवाडी मदतनीस संबंधित कामे, अंतर्गत ५० लाख विमा संरक्षण प्रदान केले आहे. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकार तत्पर आहे, असेही त्या म्हणाल्या.

Maharashtra Anganwadi Bharti 2024 for 13000 posts. As per the latest updates About 13,000 mini anganwadis in the state and 729 in Solapur district will be upgraded. Therefore, the servant working there will be promoted and an assistant will be appointed there. On the other hand, the Anganwadi will also have a separate building. At present, 37 supervisors, 207 sevikas and 829 helpers are vacant in anganwadis of Solapur Zilla Parishad. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

There are 932 mini anganwadis in Solapur district, out of which 729 anganwadis will be upgraded. The women and child development authorities have sent such a proposal to the government. Once it is approved, helpers will be filled in each of those anganwadis. In the remaining anganwadis, the posts of 100 helpers and 207 sewaks are also vacant. Their recruitment process will begin in a few days. Reliable sources said vacancies will be filled in all districts of the state.

अंगणवाड्यांमध्ये लवकरच मोठी पदभरती! सोलापूर जिल्ह्यात होईल १०७३ पदांची भरती; ७२९ मिनी अंगणवाड्यांचे होणार श्रेणीवर्धन

सोलापूर जिल्ह्यात ९३२ मिनी अंगणवाड्या असून त्यातील ७२९ अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. तसा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस भरल्या जातील. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये देखील १०० मदतनीस व २०७ सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यांची भरती प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

  • सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत असून त्याअंतर्गत सव्वालाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये तीन हजार १५३ मोठ्या तर ९२३ मिनी अंगणवाड्या आहेत. मोठ्या अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत असते तर त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमली जाते. मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे.
  • राज्यातील जवळपास १३ हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ७२९ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत सेविकेला पदोन्नती मिळेल आणि त्याठिकाणी मदतनीस नेमली जाईल. दुसरीकडे त्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत देखील असेल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेकडील अंगणवाड्यांमध्ये ३७ पर्यवेक्षिका (सुपरवायझर), २०७ सेविका व ८२९ मदतनीस, अशी पदे रिक्त आहेत. या पदभरतीला काही दिवसांत प्रारंभ होणार असून रे नगर प्रकल्पातील ४० मिनी अंगणवाड्यांमध्येही सेविकांची भरती होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्त पदांची भरती, मिनी अंगणवाड्यांमध्ये श्रेणीवर्धन अशा विविध मागण्या काही दिवसांपूर्वीच्या आंदोलनावेळी करण्यात आल्या होत्या. त्याची टप्प्याटप्याने पूर्तता केली जात आहे.

Solapur Anganwadi Bharti udpates एकूण रिक्त पदे

  • पर्यवेक्षिका – ३७
  • सेविका – २०७
  • मदतनीस – ८२९
  • एकूण – १,०७३

‘रे नगर’मधील अंगणवाडीचा पॅटर्न राज्यस्तरावर

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी रे नगर प्रकल्पातील एका अंगणवाडीला भेट दिली. त्यावेळी अंगणवाडीच्या भिंतीवरील चित्रे, रंगकाम व अंगणवाडीतील विविध चित्रे पाहून कौतुक केले. अशाच अंगणवाड्या राज्यभरात व्हाव्यात, असे त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून व सरकारकडूनही वाढीव निधी देऊन यापुढे नवीन अंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील उपसचिवांनी सोलापूरच्या रे नगरातील अंगणवाडीची रचना, खर्च याबद्दल सविस्तर माहिती मागविली आहे. आदर्श अंगणवाडीचा हा पॅटर्न आता राज्यभर जाणार आहे.


Recruitment of 13,531 posts for Anganwadi Sevika and Helpers in Maharashtra State will be held soon. This important decision has been taken to upgrade 13,011 mini-anganwadis in the Integrated Child Development Service. The decision will result in the recruitment of 13,011 posts of one assistant each. Also, for each of the 25 anganwadi centres, 520 posts of one head maid and supervisor will be recruited. Overall, many have expressed happiness over it. This has paved the way for the recruitment of 13,531 posts in the state. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्वाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय; 13531 पदांची होणार भरती

गावोगावी सुरू असलेल्या अंगणवड्या म्हणजे चिमूरड्यांचे हक्काचे खेळण्याचे, शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण. गावासह अगदी वाडी-वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहेत. याच अंगांवडीत काम करण्याऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Anganwadi Bharati 2024

  • एकात्मिक बाल विकास सेवेतील 13 हजार 11 मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे 13 हजार 11 पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे. तसेच प्रत्येक 25 अंगणवाडी केंद्रासाठी 1 मुख्यसेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने 520 पदांची भरती पान केली जाणार आहे. एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. याद्वारे राज्यात तब्बल 13 हजार 531 पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल 116 कोटी 42 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी कधी आणि केंव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

The state government has announced Rs. 2,000/- for Anganwadi Sevika and Anganwadi Helpers. A government order in this regard has been issued and soon money will be deposited in the accounts of Anganwadi, Mini-Sevika and Anganwadi Helpers. Ten thousand Anganwadi workers, helpers and Mini-Anganwadi workers will benefit from the district.

Under the Integrated Child Development Services Scheme, the government has given bhaubij gift to Anganwadi Sevika, Anganwadi Helpers and Min Anganwadi Sevika working for the financial year 2024-25. Like every year, this Diwali will be deposited in the accounts of Anganwadi Helpers, Sevika and workers. The action in this regard is taken by the Women and Child Welfare Department of the Zilla Parishad. On the same day, everyone will get the same amount of bhai dooj.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दोन हजार रुपये भाऊबीज

दहा हजार सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना फायदा. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज राज्य शासनाने जाहीर केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश निघाला असून, लवकरच अंगणवाडी सेविका, मिनीसेविका, तसेच मदतनीस यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे जमा होणार आहेत. जिल्ह्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना फायदा होईल.
शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे.
दरम्यान, दिवाळीत भाऊबीज मिळावी, या संदर्भात अंगणवाड कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केलं होती. त्यानुसार शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिन अंगणवाडीसेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट जाही केली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाह दिवाळीची भाऊबीज अंगणवाडी मदतनीस, सेविकांच्या खात्याव जमा होणार आहे. त्या संदर्भातील कार्यवाही जिल्हा परिषदेच्या महिल व बालकल्याण विभागाकडू- करण्यात येते. एकाच दिवशी सर्वांन समान पद्धतीने भाऊबीजची रक्कम मिळणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी चित्र

  • अंगणवाडी सेविका चार हजार ६०९
  • मदतनीस – चार हजार ६०९
  • मिनी अंगणवाड्या ७७८

As per the latest updates the process of promotion of 3,000 anganwadi sevika in the Maharashtra state will be completed soon. Anganwadi workers will be given Rs 12,800 for the purchase of mobile phones and the central government will pay the premium of Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana for the safety of anganwadi workers. He also said that the central government will extend all possible support for skill development of anganwadi workers and helpers. Detailed information about Anganwadi Helper Recruitment 2023 is given below. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नती मुख्यमंत्र्याची घोषणा; सेविकापदावर लागणार वर्णी

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वाटप करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवत असून, १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकेचा विमा हप्ता केंद्र शासन भरणार- स्मृती इराणी
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन खरेदीसाठी १२,८०० रुपये देण्यात येणार असून, अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


Recruitment for the post of Anganwadi Sevika has been announced in various districts of Maharashtra under Integrated Child Development Service Scheme, Child Development Project. There are total 969 vacancies will be filled under this recruitment. Applications are invited from eligible candidates for this recruitment. So this recruitment is going to be for female candidates only. Detailed information about Anganwadi Helper Recruitment 2023 is given below. Kindly visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

१२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती सुरु

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 969 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ही भरती केवळ महिला उमेदवारांसाठी असणार आहे. अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • एकूण पद संख्या – 969
  • शैक्षणिक पात्रता –
    • १२ वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
    • भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान १८ तर कमाल ३५ वर्षे वय असावे. (विधवा महिलांकरिता ४० वर्षे)
  • पगार – भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारा महिना ५,५०० पगार देण्यात येणार आहे.

Anganwadi Bharti Jahirat 2024

  1. Nanded Anganwadi Bharti 2023– 141 posts
  2. Ahmednagar Anganwadi Bharti 2023– 137 Posts
  3. South Jalgaon Anganwadi Bharti 2023 – 38 Posts
  4. South Amravati Anganwadi Bharti 2023 – 25 Posts
  5. Latur Anganwadi Bharti 2023 – 60 Posts
  6. Kolhapur Anganwadi Bharti 2023 – 91 Posts
  7. Osmanabad Anganwadi Bharti 2023 – 49 Posts
  8. Gadchiroli Anganwadi Bharti 2023 – 8 Posts
  9. Akola Anganwadi Bharti 2023 – 60 Posts
  10. Solapur Anganwadi Bharti 2023 – 9 Posts
  11. Jalgaon Anganwadi Bharti 2023 – 40 Posts
  12. Amravati Anganwadi Bharti 2023 – 154 Posts

Important Dates of Anganwadi Bharti 2024

See the below give table for important dates of anganwadi bharti in various district.

Important links of Anganwadi Bharti 2024


Angawadi Sevika Bharti Selection Process in Eklara, Buldhana is given here. A woman candidate who applied for the post of anganwadi Sevika has alleged lack of transparency in the selection process of Anganwadi Sevika recently recruited by Child Development Project Officer in Eklara Gram Panchayat of Talukaa. During the recruitment of Anganwadi Sevika in the village of Eklara, the guidelines of the government were not followed and the educational qualification, quality, age, dialect, etc. were not followed. Archana Sachin Chavan has written a written statement to Group Development Officer Manora alleging that child development project officers and members of the committee have done injustice to me by undermining my quality under the cover of financial transactions for personal gain. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अंगणवाडी सेविका भरती मध्ये निकष डावलून उमेदवाराचे निवड

  1. अंगणवाडी भरती 2023 – तालुयातील एकलारा ग्राम पंचायत मध्ये नुकत्याच बालविकास प्रकल्प अधिकारी द्वारा भरती करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराने केला आहे. एकलारा या गावातील अंगणवाडी सेविका भरती दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न करण्यात येऊन शैक्षणिक अर्हता,गुणवत्ता, वय बोलीभाषा इ. निकष डावलून बालविकास प्रकल्प अधिकारी व समितीतील सदस्यांनी व्यक्तिगत फायद्यासाठी पडद्याआडून आर्थिक व्यवहारा पोटी माझी गुणवत्ता डावलून माझ्यावर अन्याय केल्याचा लेखी आरोप अर्चना सचिन चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारा गटविकास अधिकारी मानोरा यांच्याकडे केली आहे.
  2. एकलारा ह्या गावात अंगणवाडी सेविकेची Anganwadi Servant भरती करण्यात आली असून, भरती करण्यात आलेल्या गावात ८० टक्के समाज हा बंजारा बोलीभाषा बोलतो याकडे आर्थिक देवाण घेवानीपोटी स्थानिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अपात्र उमेदवारास प्रथम क्रमांकावर ठेवून माझ्या नैसर्गिक निवडीवर व मी गुणवत्ता धारक असूनही मला डावलून माझ्यावर अन्याय केला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. झालेल्या भरती प्रक्रियेतील कागदपत्राची व गुणवत्तेची पुन्हा पडताळणी करण्यात येण्याची मागणी निवेदनकर्त्या महिलेने केली असून सदरील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याची मागणीही केली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे न करण्यात आल्यास न्यायालयाचा दार ठोठावणार असल्याचेही निवेदनकर्त्याने निवेदनात नमूद केले आहे.
  3. अंगणवाडी सेविका निवडी संदर्भात कुणाला आक्षेप असल्यास तसे लेखी स्वरूपात नोंदविण्याचे कार्यालयाद्वारे २३ मे रोजी संबंधितांना कळविण्यात आलेले आहे, पाच जून पर्यंत त्याची मुदत आहे. अंगणवाडी सेविका निवडी दरम्यान शासनाच्या नियम व अटीनुसार अनुसूचित जाती/ जमाती/ भटया जमाती प्रवर्गातील उमेदवारांना गुणदान देण्यात आलेले आहे, पारदर्शकतेला निवडीमध्ये सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2024 Stay till 17th April

Latest update regarding the Anganwadi Bharti 2023 for 20 thousand posts has been Postponement. As per letter dated February 7, 2023, as per November 2022 report, 20,601 employees including 4,509 Anganwadi Sevaks, 626 Mini Anganwadi Sevaks and 15,466 helpers were instructed to fill up the vacant posts by May 31, 2023.

Accordingly, all the project authorities in the state started accepting applications by issuing advertisements. However, the Anganwadi Employees’ Association had filed a petition in the Bombay High Court objecting to the revised educational qualification. The hearing was held recently and the court adjourned the recruitment till 17th April 2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भरतीला स्थगिती; अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच

राज्यातील २०,६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे १७ एप्रिल २०२३पर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दुपारी स्थगितीचे आदेश काढले.

  • ७ फेब्रुवारी २०२३च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • परंतु, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रताबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी अलीकडेच होऊन न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत या भरतीला स्थगिती दिली. दरम्यान अंगणवाडी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रकि्या सुरु असतानाच सुधारित शैक्षणिक पात्रतेमुळे भरतीला स्थगिती दिल्याने हजारो उमेदवार हवालदिल झाले आहेत.





Maharashtra Anganwadi Bharti 2023

Maharashtra Anganwadi Bharti 2023: Maharashtra Women and Child Development Department announced Anganwadi Recruitment for various vacancies in Anganwadi Centers including Anganwadi Sevak, Mini Anganwadi Sevak, Supervisor, Helper, Sevak, Posts. Eligible and Interested candidates may submit their application form. Applicants for Maharashtra Anganwadi Recruitment, should be 18 years to 40 years old. Application fee for general and OBC category women applying for Anganwadi recruitment is ₹ 300. And application fee of ₹ 100 will be charged for SC women. Details of recruitment process, examination and selection process etc., given below. Read the given details and keep in touch for further updates. Follow us on What App Group and Telegram Channel.

महाराष्ट्र महिला आणि बाल विकास विभागाने अंगणवाडी केंद्रांमधील विविध रिक्त पदांवर अंगणवाडी भरती जाहीर केली ज्यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मदतनीस, सेविका, भरती सुरु आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.

पात्रता- Eligibility Criteria For Maha Anganwadi Bharti 2023

  • अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्याची शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असावे.
  • 12 वी उत्तीर्ण महिला देखील अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा -महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिला, 18 वर्षे ते 40 वर्षे असावे
  • भरती फी – महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणार्‍या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांचे शुल्क ₹ 300 आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अर्ज शुल्क ₹ 100

आवश्यक कागदपत्रे – Essential Documents for Anganwadi Sevika Bharti 2023

  • Aadhar Card
  • Ration card
  • Caste certificate
  • Residence Certificate
  • Income certificate
  • Work Experience Certificate
  • Certificate related to educational qualification

अर्ज कसा कराल -How to Apply For Maharashtra Anganwadi Recruitment 2023

  • अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतर महाराष्ट्र अंगणवाडी भरतीचा अर्ज भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम, महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाला महाराष्ट्र अंगणवाडी भरतीचे अधिकृत संकेतस्थळ उघडावे लागेल.
  • भरतीमधील नोटिस बटणावर क्लिक करा, जिथे अंगणवाडी भरतीची लिंक दिली जाईल, त्या अंगणवाडी भरती लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर उघडेल.
  • फॉर्म अचूक भरायचा आहे, या मोबाईल नंबरमध्ये, इमेल आयडी, पात्रता, सर्व कागदपत्रे वरील सोबत अपलोड करायची आहेत.
  • आणि आपल्याला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल, त्याच बटणावर क्लिक करताच आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये आपली संपूर्ण तपशीलवार माहिती लिहिली जाईल, ती प्रिंट करा आणि सेव्ह करा.





The protest of Anganwadi workers is going on, and the opposition also raised this issue in the assembly hall, due to which the government has to give in and decide to increase the salary. Meanwhile, child development Minister Mangalprabhat Lodha has announced that the salary of Anganwadi workers will be increased by 20% and 20,000 Anganwadi workers will be recruited by the month of May 2023. Details of recruitment process, examination and selection process etc., given below. Read the given details and keep in touch for further updates. Follow us on What App Group and Telegram Channel.

 Anganwadi Salary-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ

आनंदाची बातमी! अंगणवाडी सेविकांच्या पगारात 20 टक्के वाढ होणार; तर मे महिनापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

अंगणवाडी सेविकांच्या पगारात 20 टक्के वाढ – दरम्यान, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे, तसेच हा प्रश्न विरोधकांनी देखील सभगृहात लावून धरला, त्यामुळं सरकारला नमते घेत पगारवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या पगारात 20 टक्के वाढ केली जाणार आहे, तसेच मे महिनापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविका भरती केली जाणार असल्याची घोषणा आज सभागृहात बालविकास मंत्री लोढा मंगलप्रभात लोढांनी केली आहे.

  • अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहे. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू होणार आहेत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. (27 फेब्रुवारी) सोमवारपासून सुरु झाले आहे. आज अंगणावाडी सेविका पगारवाढवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सभागृहात पाहयला मिळाली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर समोर आली आहे.
  • अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहे. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू होणार आहेत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं अनेक अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे.
  • आज विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
  • विरोधकांकडून सभात्याग – राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Eligibility Criteria for Anganwadi Bharti 2023

  1. बारावी  उत्तीर्ण हवी, उच्च शिक्षणालाही स्थान
  2. नव्या पदभरतीमध्ये अंगणवाडी सेविका किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. याशिवाय तिच्याकडे पदवी, पदव्युत्तर पदवी, अन्य उच्च शिक्षण असल्यास भरती प्रक्रियेत त्या शिक्षणासाठी विशेष गुणांचा भारांश दिला जाणार आहे.
  4. शिवाय किमान ३५ वर्षे ही वयोमर्यादाही घालण्यात आली आहे.
  5. शिवाय संबंधित उमेदवार खेड्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.





The recruitment process of 20,000 Anganwadi karmchari in the Maharashtra state will start soon, and this time the educational qualification and age limit of the candidates has also been increased. Earlier, 10th pass was the educational qualification for Anganwadi Sevak. She has now passed 12th class. Whereas the earlier qualification of 7th pass for Madatnis has been canceled and she has also been made 12th pass.

Also earlier the age limit of candidates was 21 to 30. This has also been changed. According to the new rules, candidates between the ages of 18 to 35 can now apply for this. Widowed women can apply up to the age of 40.

At present, the process of recruitment of servants from helpers by promotion is going on from all Zilla Parishads and after that the recruitment process will be started after the number of vacancies of helpers is determined.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादेत वाढ होणार, २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार

राज्यातील २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यावेळी शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारांच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. याआधी अंगणवाडी सेविकेसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. ती आता १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची आधीची पात्रता रद्द करून ती देखील १२ वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. तसेच याआधी उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३० अशी होती. यामध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना आता यासाठी अर्ज करता येणार आहे. विधवा महिलांना वयाच्या चाळीशीपर्यंत अर्ज करता येईल. सध्या सर्व जिल्हा परिषदांकडून मदतनीसांमधून सेविकांची पदोन्नतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर मदतनीसांच्या रिक्त पदांचा आकडा निश्चित झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बारावीच्या गुणांना मोठे महत्त्व

  1. या निवड प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना १२ वीला ८० टक्केहून अधिक गुण आहेत त्यांना १०० पैकी ६० गुण देण्यात येणार आहेत.
  2. ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५५ तर
  3. ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंतच्या उमेदवारांना ५० गुण देण्यात येतील.
  4. त्याखाली गुण असणाऱ्यांना ४५, ४० आणि ४० टक्केहून कमी गुण असणाऱ्या सरासरी ३५ गुण देण्यात येणार आहेत.
  5. पदवीधर आणि त्यातूनही अधिक शिक्षण घेतले असल्यास त्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

यांनाही अधिक गुण

  • विधवा आणि अनाथ, अनुसूचित जाती जमाती यांना १० गुण,
  • इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आणि सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रत्येकी ५ गुण जादा देण्यात येणार आहेत.

मोबाइल नीट वापरता यावा

  • आता अंगणवाड्यांसंबंधित सर्व अहवाल, शालेय पोषण आहार वाटप, मुलामुलींच्या वजनांची नोंद ही सर्व कामे मोबाइलवरच करावी लागतात.
  • त्यामुळे ॲन्ड्रॉईड मोबाइल सुलभपणे वापरता येणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता असल्याने शैक्षणिक पात्रता १० वी व सातवीवरून १२वी करण्यात आली आहे.

Primary and pre-primary education will be given special importance in the new National Education Policy. Therefore, the vacancies in all Anganwadi in Maharashtra will be filled. For this, as many as 20 thousand 601 old vacancies are going to be filled. Integrated Child Development Commissioner Rubal Aggarwal has directed all the Zilha Parishad to fill up the posts of Anganwadi Sevika, Anganwadi Helper and Mini Anganwadi Sevika before 31st May 2023. In new recruitment Anganwadi Sevak must have passed 12th at least. Apart from this, if she has degree, post graduation, other higher education, special marks will be given for that education in the recruitment process. Moreover, the minimum age limit is 35 years. Also the concerned candidate must be a local resident of the village.

20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती…

  1. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  2. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मेपूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.
  3. महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी – महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.
  4. अंगणवाडी सेविकांचा बांगडी मोर्चा – गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करत असून, सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी बांगडी मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही सोलापुरातील या अंगणवाडी सेविकांनी चटणी-भाकरी मोर्चा काढला होता.




अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 32,000 posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved. Now it is mandatory for female candidates to have at least 12th pass for this recruitment. Age criteria for this recruitment is between 18 to 35 & for widows 40 years. Complete Details of recruitment process, examination and selection process etc., given below. Read the given details and keep in touch for further updates. Follow us on What App Group and Telegram Channel.

अंगणवाडी सेविकांची भरतीपरीक्षा १०० गुणांद्वारे होणार ‘अशी’ राहील अंतिम निवड प्रक्रिया

राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे. हि भरती प्रक्रिया अशी पार पडेल त्याबद्दल सविस्तर माहिती खाली वाचा…!

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Process

  • अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.
  • दरम्यान, उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे.

Anganwadi Recruitment 2023 Exam and Selection Process

भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण

  • इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील.
  • ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत.
  • पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.
  • पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.




Important for Selection Process

निवडी संदर्भातील ठळक बाबी

  • एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड
  • शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी
  • शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
  • ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी
  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार

अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 20,000 posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved. The state government has announced that the recruitment process of 20 thousand Anganwadi workers will start within a 8 days it means it will be available from 8th February 2023 on-wards. Candidates see the more details given below and keep in touch for the further updates also follow us on whatsapp group and telegram for fast updates.

महाराष्ट्र  अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ राज्यातील अंगणवाड्यांमध्ये जवळपास २० हजार ४०० पदांची भरती केली जाणार आहे. सेविकासाठी आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्णची अट असणार आहे. मदतनीस व सेविकांची अंतिम निवड करण्याचा अधिकार तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनाच असणार आहे. आठ दिवसांत भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

Anganwadi Recruitment 2023 Application form

  • प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे.
  • अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे.
  • साधारणत: पुढील ८ दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल. इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात १४८ पर्यवेक्षिकांची देखील भरती केली जाणार आहे.




Vacancy Details of Anganwadi in Solapur

जिल्ह्यात साडेसहाशे जागांची भरती

  • सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ४२५ मदतनीस व २२५ सेविकांची पदे रिक्त आहेत. महापालिकाअंतर्गत दोन, नगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक आणि ग्रामीणसाठी प्रत्येक तालुक्यात एक बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून आता रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीत उच्चशिक्षित तरूणी, महिला अर्ज करतील. अध्यापनाचा अनुभव असलेल्यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या पदभरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, असे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Educational Details of Anganwadi Bhati 2023

  • बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक – अंगणवाडी सेविकासाठी यापूर्वी सातवी पास उत्तीर्णची अट होती. आता या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age limit of Anganwadi Sevika

  • याशिवाय उमेदवाराचे वय किमान १८ तर कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.

How to apply for Anganwadi Bharti 2023

  1. मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल
  2. राज्य शासनाच्या सूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
  3. मार्च महिन्यात सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
  4. पदोन्नती प्रक्रिया फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
  5. त्यानंतर मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल.

Selection Process of Anganwadi Bharti 2023

निवडीची अशी असेल प्रक्रिया

  • अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार; सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
  • तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
  • शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल.
  • सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.





अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 20 thousand posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved. The state government has announced that the recruitment process of 20 thousand Anganwadi workers will start after 26th January. At this time, the condition of passing the 12th examination has been fixed for the post.

  1. राज्य शासनाने २६ जानेवारीनंतर २० हजार अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे जाहीर केले आहे. या वेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे.
  2. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य हे तीन महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात कोरोना महामारीनंतर आजतागायत अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया झालेली नाही. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अंगणवाड्यांमधील पदे रिक्त आहे. त्यामुळे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या तीन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात अडचणी येत आहेत. ही त्रुटी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात २० हजार अंगणवाडी सेविकांची पदभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  3. मिशन पोषण २.० या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे.
  4. या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
    विश्वसनीय माहितीनुसार २६ जानेवारीनंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती मागवणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल

अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 20 thousand posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved and this recruitment will be started soon. Besides this, Chief Minister Eknath Shinde said today that a positive decision will be taken on issues such as insurance along with salary, classes for Anganwadis, new mobile phones etc., The recruitment of 20186 posts of Anganwadi workers, Anganwadi helpers and Mini Anganwadi workers has been approved and the Chief Minister also directed to complete this recruitment process in six months.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
41 Comments
  1. Shubhangi madhav Rajput says

    My study 12thclass from kurduwadi tel madha dist solapur

  2. Shubgangi madhav Rajput says

    My study 12thclass from kurduwadi tel madha dist solapur

  3. Pratiksha ajay mohare says

    Pratiksha ajay mohare , Age 23 , Female education – bsc , durge lay out kalmeshwar, nagpur 441501

  4. fulKali Buna Akhande says

    Amravati distric-

  5. Rameshwari Chawla says

    I am interested

  6. dayali kahandole says

    I am interested

  7. Dipti says

    Mast thane ahe

  8. Dhanashri Thakur says

    Nashik district chya jaga nibhaya tr sanga

  9. Madhuri Ghuge says

    Pune jilhyat Jr Java nighalya tr please sanga.

  10. Priyanka Phanse says

    I am interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!