TET Exam- महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षांचे नियोजन

Maha TET 2023

 MAHA TET Exam 2023

MAHATET Maharashtra Teacher Eligibility Test 2023

How to Fill Online Application Form

Maha TET 2023 Time Table.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

It is mandatory for the candidate to qualify both TET and Central Pre-Recruitment Test for recruitment of teaching staff on compassionate basis. Now only TET passed candidates will be appointed to the post of teaching staff on compassionate basis. Read More details are given below.

प्राथमिक शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रात परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच अनुकंपा तत्वावर शिक्षणसेवक पदासाठीही  टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, अनुकंपा तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देताना संबधित उमदेवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राम विकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संधार्भातील निर्देश पात्र व्दारे देण्यात आले.


अनुकंपा तत्त्वावरील शिक्षणसेवक नियुक्तीसाठी उमेदवाराला टीईटी आणि केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीत सवलत असेल किंवा कसे या बाबत ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागितलाहोता. प्राथमिक शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. २०१६च्या शासन निर्णयाने उद्भवलेली त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, प्राथमिक शिक्षकांची पात्रता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) निश्चित केली आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनुकंपा नियुक्ती देताना उमेदवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घ्यावी, असा अभिप्राय शिक्षण विभागाने दिला. त्यामुळे आता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाच अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्ती दिली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


MAHA TET Registration @mahatet.in

Maha TET Exam : The process for recruitment of 15 thousand teacher posts in the state will soon begin. But even after that, as more teacher posts will remain vacant, it has been decided to take TET for teacher recruitment. The Education Department has decided to conduct the TET exam again in the month of November for the recruitment of teachers. Read More details are given below.

शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र त्यानंतरही शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त राहणार असल्याने पुन्हा शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. मात्र टीईटी परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मे महिन्यात शिक्षक भरतीसाठी परिक्षा घेण्यात आली होती.

Maha TET Exam 2023

  • मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तरी सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरतीसाठी मंजूर झालेला जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा परिक्षा घेउन सीईटी घेण्यात आली तर शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे पुन्हा टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • कोरोनाच्या संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडल्याने मार्च 2020 पासून शिक्षक भरतीसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा भरती करण्यास ब्रेक लावण्यात आला होता.
  • मात्र गेल्या काही दिवसापासुन शिक्षक भरतीसह विवीध खात्यांमध्ये जागा भरती करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी टीईटी घेऊन निकाल लागल्यानंतर वेळेत सीईटी घेण्यात येईल आणि रिक्त जागा भरती केल्या जातील अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.
  • राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
  • त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले असून राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकामध्ये भरती होणार आहेत.

Maha TET Exam : According to the government decision dated 30 June 2022, 15 percent discount in the teacher eligibility test has been given to ex-servicemen, martyred soldiers’ wives and families of the state. Applicants need to apply online on the website https://mahatet.in for registration under ex-serviceman reservation. The last date for registration is 10 August 2022. Read More details as given below.

माजी सैनिकशहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूटउमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन

Maha TET-शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट; नोंद करण्याचे आवाहन

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021’ चे आयोजन 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर दि. 30 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे.

  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. तसेच नावातील स्पेलिंग बदल व जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने प्राप्त होत आहेत.
  • उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग/ जात संवर्गबाबतची दुरूस्ती असल्यास ही दुरूस्ती करण्यासाठी तसेच माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या Login मध्ये सुविधा देण्यात आलेली आहे.
  • उमेदवारांनी आपले निवेदन दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत देणे आवश्यक असून नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र Upload करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी/ ई-मेलद्वारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुन्हा: आपल्या Login मध्ये Update करणे गरजेचे आहे.
  • मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे (ई-मेल, फोन संदेश, लेखी पत्र इत्यादी) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
  • प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) राज्यातील माजी सैनिक ,शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट देणेबाबतचे प्रसिद्धिपत्रक 

येथे नोदणी करा


MAHA TET Answer Key 2021: Maharashtra State Examination Council, Pune conduct Maharashtra Teachers Eligibility Test 2021 on 21st November 2021. The answer key for this examination will be available here. Applicants who applied for the examinations may check their examinations answer key by using the following link. Following is the official website link to get the examinations to answer key. Check Maha TET 2021 Answer Key from the following link : –

  • Examination Board Name : Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune
  • Exam Name: Maharashtra TET
  • Official Website: www.mahatet.in
  • Date of Examination 21st November 2021

CHECK MAHA TET Exam Answer Key 2021 HERE


Maharashtra Teacher Eligibility Test passed smoothly on Sunday, November 21, 2021. The answer sheet for TET exam will be released soon. This answer sheet will be issued by Maharashtra State Examination Council. Candidates should keep on visiting the official website of TET mahatet.in for the latest information regarding TET Answer Sheet.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा  रविवार, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरळीत पार पडली. टीईटी परीक्षेची उत्तरतालिका  लवकरच जारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही उत्तरतालिका जारी करण्यात येईल. उमेदवारांनी टीईटी उत्तरतालिकेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी टीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mahatet.in ला भेट देत राहावी.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीच्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८, पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील साधारण ९० टक्के उमेदवारांची टीईटी परीक्षेला उपस्थिती होती. परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ४.३० पर्यंत अशा दोन सत्रात पेपर १ आणि पेपर २ पार पडले.

टीईटीची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल. उमेदवारांच्या हरकती, आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करण्यात येईल. MAHA TET Exam Answer Key 2021 ही १ डिसेंबर २०२१ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.


MAHA TET Exam

As per the latest news The schedule of Teacher Eligibility Test (TET-2021) conducted by Maharashtra State Examination Council has been changed once again. According to the earlier schedule, the examination will be held on October 30. Now, according to the revised schedule, it will be held on November 21. As the written test for the recruitment of various posts in the health department will be held on 31st October, it has been announced to reschedule the TET exam on 30th October.

Maha TET Hall Ticket – महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

परीक्षा परिषदेने सुरवातीला १० ऑक्टोबर रोजी ‘टीईटी परीक्षा २०२१’ घेण्याचे नियोजन केले होते. परंतु या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानंतर ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. परंतु आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार असल्याने पुन्हा ‘टीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. आता देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडूणक ३० ऑक्टोबर या तारखेला असल्याने पुन्हा एकदा ‘टीईटी’च्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे.

‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे सुधारित वेळापत्रक :

  • कार्यवाही : कालावधी
  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)

Maharashtra State Examination Council has changed the date of Teacher Eligibility Test (TET) to be held on 31st October. The exam will now be held on October 30. The decision was taken by the State Examination Council after the Health Department’s examination and TET came together.

Maha TET Hall Ticket – महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड आज होणार जाहीर

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे.TET परीक्षेचे प्रवेशपत्र 14 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.  आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि टीईटी एकत्र आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.  राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन 2018-19 नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.  इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.

Nyasa is a recognized company through which the examination process of the Department of Public Health will be completed. The canceled exam will now be held on October 24 and October 31. For this, it has been decided to postpone the Teacher Eligibility Test 2021 to be held on 31st October and the final announcement will be made today (Wednesday).

‘न्यासा’ ही कंपनी मान्यताप्राप्त असून त्याच कंपनीच्या माध्यमातून सावर्जनिक आरोग्य विभागाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला घेतली जाणार आहे. त्यासाठी 31 ऑक्‍टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) Teacher Eligibility Test 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंतिम घोषणा आज (बुधवारी) होणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा (Health Department Exam) तीन टप्प्यात घेण्याचे नियोजन केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

Arogya Vibhag Exam – आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET

सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला होईल. परीक्षेचे तीन टप्पे केले असून ‘टीईटी’ पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ती परीक्षा पुढे न गेल्यास 31 ऑक्‍टोबरऐवजी त्या दिवशीची परीक्षा त्याच्या पुढील रविवारी होऊ शकते. परंतु, त्यावर आज (बुधवारी) अंतिम निर्णय होईल.


MAHA TET Exam 2023

The ‘Maharashtra Teacher Eligibility Test 2021’ (TET) conducted by the Maharashtra State Examination Council was held on 10th October. But on this day, a written test has been organized by the Central Public Service Commission. The TET examination will now be held on October 31

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता  परीक्षा २०२१’ (टीईटी) १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये, ही बाब विचारात घेऊन ‘टीईटी’ परीक्षा आता ३१ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉलतिकिट) ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी उमेदवारांना १४ ते ३१ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या परीक्षेतील ‘पेपर-एक’ सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळात, तर ‘पेपर-दोन’ दुपारी दोन ते दुपारी साडे चार या वेळात होणार आहे, असेही सुपे यांनी ‘टीईटी’च्या सुधारित वेळापत्रकात स्पष्ट केले आहे.

सुधारित वेळापत्रक



Students studying in the final year of D.ED, BEd course will be able to apply for Teacher Eligibility Test (TET). This has brought great relief to thousands of students in the state.

डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maha TET 2021- MAHA TET परीक्षा २०२१ अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

हजारो विद्यार्थ्यांना संधी..

डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा करोनामुळे वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणी ती पण देता येणार नाही, असे सांगत डीएड, बीएएड पात्रताधारक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तीन ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यात या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


The Teacher Eligibility Test (Maha-TET) will be conducted by the School Education Department from September 15 to December 31, 2021 to fill the vacancies of teachers in various schools in the state.

Shikshak Bharti- शिक्षक विभागाकडून मुलाखतीसाठी निवड यादी लवकरच

राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेतली जाणार आहे

पहिली ते पाचवी गट आणि सहावी ते आठवी अशा दोन गटांसाठी परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शिक्षण विभाग टीईटी घेणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जाहीर करणार आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारने सहा हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे.


The way has been paved for teacher recruitment in the state. Now, the education department has taken an important decision to conduct the examination to be eligible for teacher recruitment. The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from 15 September to 31December 2021.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. आता १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ही परीक्षा होणार आहे. (tet exam will be in September)

राज्यात आजपर्यंत सहावेळा टीईटी घेण्यात आली असून, त्यात‌ ८६ हजार २८९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. १९ जानेवारी २०२० नंतर एकही परीक्षा घेण्यात आली नव्हती. राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती. शासनाने एप्रिलमध्ये मान्यतेचे पत्र पाठविले. तसेच मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे या परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा शासनाकडे परीक्षेची परवानगी मागितली होती. त्यावर शासनाने परीक्षा घेण्यासंबधीचा निर्णय नुकताच कळविला आहे.

राज्यात १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान टीईटी परीक्षा घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अपर सचिव प्रवीण मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त तथा अध्यक्षांना दिल्या‌ आहेत.

TET Exam- येत्या सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये 2 टप्प्यात TET परीक्षा होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

दोन वर्षानंतर परीक्षा

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.  दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.

परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता

कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात  दरवर्षी 7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे 10 लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.

टीईटी परीक्षा दोन गटात

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

शिक्षकांच्या  6100 जागा भरण्यास मंजुरी

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 8  जुलै रोजी राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. राज्य सरकारच्या त्यानिर्णयानुसार   स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील.

शिक्षण विभागात राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

दरवर्षी 7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे. १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 हजारांपेक्षा जास्त जागा भरण्यात आल्या आहेत.


The Teachers’ Eligibility Test (TET Exam) in Maharashtra is likely to be held in September this year. It has recently been informed by the Maharashtra State Council of Examination, Pune. General TET 2021 will be taken offline. This test will be based on Optical Marks Recognition. Form filling for this exam will start in July 2021.

TET Exam-‘तयारीला लागा ! येत्या सप्टेंबर मध्ये टीईटी होणार

महाराष्ट्रामध्ये टीचर्स एजिबिलिटी टेस्ट (TET Exam) यंदा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. नुकतीच पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन (Maharashtra State Council Of Examination) कडून त्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान शिक्षणक्षेत्रामध्ये शिक्षकी पेशा स्वीकारू इच्छिणार्‍या उमेदवारांना ही टीचर्स एजिबिलिटी टेस्ट पार करणं आवश्यक आहे. १९ जानेवारी २०१९ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता (TET Pass Certificate) आता ७ वर्षावरून आजीवन करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामुळे आता अनेकांना या परीक्षेबाबत उत्सुकता वाढली आहे.

Shikshak Bharti- पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

साधारण TET २०२१ ही ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामध्ये ऑप्टिकल मार्क्स रेकक्निशन (Optical Marks Recognition) च्या आधारे ही परीक्षा होणार आहे. जुलै २०२१ मध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. आम्ही ऑनलाईन जाण्याचा विचार करत होतो पण त्यासाठी अजून काही काळ जाईल. सध्या ही परीक्षा ऑफलाईन (Offline Exam) माध्यमातूनच घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी परीक्षा २०१३ साली घेण्यात आली होती. त्यानंतर सहा वेळेस परीक्षा घेण्यात आल्या आहेत. २०१९ ला राज्यात शेवटची टीईटी झाली होती.

शिक्षण विभागात राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

मागील वर्ष दीड वर्षात राज्यात असलेलं कोरोना संकट पाहता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात ही परीक्षा होणं अपेक्षित होते पाण तेव्हा देखील कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आता सप्टेंबर २०२१ मध्ये टीईटी २०२१ परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे.


TET Registration

There was talk that the Central Teacher Eligibility Test (CTET 2021) next month could be postponed due to the corona outbreak in the country. This discussion has now come to an end. Because this exam is going to take place at the given time. Registration has been suspended only for this.

देशातील करोना प्रादुर्भावामुळे पुढच्या महिन्यात होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी 2021) स्थगित केली जाऊ शकते अशी चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण ही परीक्षा दिलेल्या वेळेतच होणार आहे. केवळ यासाठीची नोंदणी थांबविण्यात आली आहे.

सीबीएसईची दोन टप्प्यात परीक्षा

सीबीएसईने आतापर्यंत जुलै महिन्यात होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जाहीर केले नाही. या ३१ जानेवारीला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशात करोनाची प्रकरणे खूपच कमी होती. दरवर्षी सीटीईटीची परीक्षा दोनवेळा आयोजित केली जाते. जानेवारी आणि जुलैमध्ये या परीक्षेचे आयोजन होते.

जुलै २०२० मध्ये देशाव्यापी लॉकडाऊनमुळे सीटीईटीची परीक्षा होऊ शकली नाही. ती परीक्षा रिशेड्यूल्ड होऊन ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार होती.

सीबीएसई आता दोन टप्प्यात सीटीईटीची परीक्षा घेणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांच्या शिकवण्यासाठी सीटीईटीचा पहिला पेपर देणे आवश्यक असते. तर सहावीपासून आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यााठी सीटीईटीचा दुसरा पेपर पास होणे गरजेचे आहे. कोणताही उमेदवार दोन्ही पेपर किंवा कोणत्याही एका पेपरची परीक्षा देऊ शकतो.


TET Certificates

The Union Ministry of Education has extended the validity of the Teacher Eligibility Test (TET) for more than 7 years and made it valid for the life of the teacher. Candidates after 2015 do not need to issue a new certificate. Since the validity period is mentioned on the TET certificate of 2013 and 2014, those candidates will have to issue a new certificate.

राज्यातील 40 हजार TET उत्तीर्णांना आता नवीन प्रमाणपत्र

राज्यात 2015 नंतर TET  उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर सात वर्षांच्या वैधतेचा उल्लेख नाही. त्यामुळे 2015 नंतरच्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तर 2013 आणि 2014 च्या TET प्रमाणपत्रावर वैधतेचा कालावधी नमूद केलेला असल्याने त्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र द्यावे लागेल.

त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेला राज्यातील 40 हजार 667 उमेदवारांना आता नवीन TET उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता आजीवन करण्यात आल्याने आता मुदत संपलेल्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक टी प्रक्रिया राबवली जाईल.

TET Certificate Validity

TET Certificate Validity- There is good news for candidates who want to become government teachers. Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has made a big announcement to give relief to teachers. The Union Ministry of Education has extended the validity of the Teacher Eligibility Test (TET) for more than 7 years and made it valid for the life of the teacher.

– पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. पोखरियाल यांनी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

Shikshak Bharti-शिक्षण विभागात प्राचार्यांची पदे रिक्त

शिक्षक पात्रता परीक्षा 2011 पासून अनिवार्य

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2011 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष ठरवण्यात आली होती.

नव्यानं टीईटी प्रमाणपत्र देण्यात येणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियान निशंक यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकार ज्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे ती नव्यानं जारी करतील, असं सांगितलं. 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं शिक्षक व्हायचं असेल तर आवश्यक करण्यात आलं होतं.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Anjali Shivshankar Salunke says

    Tet व tait exam kadhi aahe?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!