शिक्षक भरतीसाठी सर्व व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध – Maha TAIT Exam 2023

Maha TAIT - https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/

Maha TAIT 2022 online registration – School Education Minister Deepak Kesarkar announced at an event in Pune on Monday that the Shikshak Bharti process will be started soon. Soon after that the education department has provided the facility to all the managements to advertise on the Pavitra Portal for teacher recruitment 2023. The State Government has conducted the ‘Teacher Aptitude and Intelligence Test 2022’ exam online from 22nd February to 3rd March 2023 for the recruitment of Shikshak Sevak, Teachers in all Local Self-Government and Private Management Schools of the State through the computerized system of Pavitra Portal.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

2,39,730 candidates registered for this exam. Out of them 2,16,443 candidates gave the actual test. So far 1,62,562 candidates have completed self-certification. The process of self-certification of the candidates who have cleared this test has been completed.

The facility of giving recruitment notification advertisement to all managements for Shikshak Bharti 2023 has been started on the Pavitra Portal. The necessary ‘User Manual’ is available on the portal. At present point list of 23 Zilla Parishad in the state has been validated. Point list of remaining Zilla Parishad will be available soon. Meanwhile, the education department clarified that the management must update the point list to fill the vacant posts of teachers.

How to Apply Maha TAIT Exam 2023

  • After that, the rest of the recruitment process will be completed by taking priority from 10th November 2023 from the candidates who have completed the self-certification. Out of the advertisement in 2019, 196 managements were made available for the post recruitment along with interviews, after the completion of their interview program, they have been provided the facility to register the interview results on the portal to complete the selection process, as well as include the name in the school system.
  • The concerned managements should visit the website ‘https://tait2022.mahateacherrecruitment.org.in’ to advertise the recruitment of teachers as per the ‘Teacher Aptitude and Intelligence Test 2022’ test.
  • Proceed as per the ‘User Manual’ on this portal.
  • The school education department has appealed to the management to contact the e-mail address ‘[email protected]’ if there is any problem in this regard.

User Manual for Application Form Filling for Self Certification

OFFICIAL WEBSITE

शिक्षक भरतीसाठी सर्व व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध

गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सोमवारी केली. त्यानंतर तातडीने शिक्षण विभागाने २०२३ मधील शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी राज्य सरकारने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च२०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतली.

  1. या चाचणीत दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व: प्रमाणपत्र पूर्ण केले आहे. ही चाचणी दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
  2. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
  3. २०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक ‘युजर मॅन्युअल’ पोर्टलवर उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची बिंदूनामावली लवकरच उपलब्ध होईल. दरम्यान शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
  4. २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या, तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार यांच्यातून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती देण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना २० ऑक्टोबरपासून सुविधा दिली जाईल.
  5. त्यानंतर स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून १० नोव्हेंबरपासून प्राधान्यक्रम घेऊन उर्वरित पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. २०१९मधील जाहिरातीपैकी १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसह पद भरतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याने त्यांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर इंटरव्ह्यू रिझल्ट नोंद करण्याची, तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट सुविधा उपलब्ध केली आहे.
  6. सर्व व्यवस्थापनांना पदभरतीची जाहिरात देण्याचे आवाहन – ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या चाचणीनुसार शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांनी ‘https://tait2022.mahateacherrecruitment.org.in’ या संकेतस्थळावर भेट द्यावी. या पोर्टलवरील ‘युजर मॅन्युअल’नुसार कार्यवाही करावी. याबाबत व्यवस्थापनांना अडचण असल्यास ‘[email protected]’ या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

Maha TAIT Exam 2023 Exam Pattern

Maha TAIT Exam 2023 will be conducted twice a year. As the government is ready to fill the vacancies of teachers in the state, the TAIT exam will now be conducted twice a year for eligible candidates for teacher recruitment. Two agencies have also been selected for this. State School Education Minister Deepak Kesarkar informed that 30 thousand vacant posts of teachers will be filled through TAIT and this process will be completed by April 2023.

महा ‘टेट’ 2022 चा निकाल जाहीर चेक करा – MAHA TAIT Results 2022

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल दि.२४/०३/२०२३आत्ता प्रसिद्ध झाला आहे , खालील लिंक वरून चेक करावा.

Check TAIT Results 2022 here

राज्यात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास सरकार तयार असल्याने शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. यासाठी दोन एजन्सीजची देखील निवड करण्यात आली आहे. TAIT द्वारे शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल दरम्यान यासाठी वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

  1. शिक्षक पदाच्या नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून प्रश्नोत्तराच्या तासावेळी उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन खासगी एजन्सींना भरतीचे काम देण्यात आले आहे.
  2. या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि त्या विश्वासार्ह आहेत, असे ते म्हणाले. शिक्षक भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील शैक्षणिक वर्षात हे शिक्षक रुजू होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
  3. शिक्षण विभागाकडून २०१२ पासून पूर्ण क्षमेतेने शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काहीजण निवृत्त झाले आहेत. आहेत त्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे.

Maha Aptitude and intelligence test will be conducted online by the exam council from 22nd February to 3rd March 2023. In order to give equal opportunity to all the interested candidates in the recruitment for the vacant posts of teachers and to select the high quality candidate for the post of Shikshan Sevak, the recruitment of Shikshan Sevak will be done on the basis of marks obtained in Aptitude and Intelligence Test. We see the compete Mahatait exam pattern here and also the eligibility, exam date etc., details below on this paragraph.

TAIT Results

Maha TAIT महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी

डी एड किंवा बीएड किंवा तत्सम अभ्यासक्रमपूर्ण केलेले व तसेच महाटीईटी, सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांचा शिक्षक भरतीकरिता पुढील टप्पा म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी.

  1. Exam Pattern परीक्षेचे स्वरूप – राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांकरिता भरतीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांना निवडीची एकसमान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  2. Question Pattern प्रश्नांचे स्वरूप – शासन निर्णयानुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी मुख्य विषय आहेत. तसेच मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित या विषयांचाही समावेश आहे. परीक्षेचा एकूण २०० प्रश्नांचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) राहील. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १५ फेब्रुवारी २०२३च्या नंतर येतील.
    भाषा – इंग्रजी १५ प्रश्न (गुण १५), मराठी १५ प्रश्न (गुण १५) सामान्य ज्ञान ३० प्रश्न (३० गुण), बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र-सामान्यज्ञान ३० प्रश्न (३० गुण), अंकगणित- ३० प्रश्न (३० गुण), बुद्धिमत्ता चाचणी ३० प्रश्न (३० गुण). या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  3. Syllabus अभ्यासक्रम – महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
  4. Aptitude अभियोग्यता – या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, समायोजन/व्यक्तिमत्त्व, अवकाशीय क्षमता, कल/आवड भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी) इत्यादी उपघटक राहतील.
  5. Intelligence बुद्धिमत्ता – या घटकांतर्गत आकलन, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी इत्यादी उपघटक राहतील. अंकगणित, संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी इ. मराठी व इंग्रजी व्याकरण, म्‍हणी व वाक्प्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक आदी.

Maha TAIT अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी २ लाख ४० हजार उमेदवारांची नोंदणी

The deadline for registration for this exam ended on Sunday (i.e. 12th February 2023). State Examination Council Commissioner Shailaja Darade informed that 2 lakh 40 thousand candidates have registered for this examination. This test will be conducted for the recruitment process of teachers. Read more details below.

Maha TAIT 2023 राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनातील विविध विभागातील रिक्त पदांवर मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. त्यात शिक्षकांच्या पदांचाही समावेश आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिंमापन चाचणी घेतली जाणार आहे. २०१७मध्ये झालेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीनंतर गेल्या पाच वर्षांत ही परीक्षाच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसासाठी नोंदणी करण्याची मुदत रविवारी संपली.


MAHA TAIT Exam 2023 Online Application from Date has been extended till 12th February 2023. Earlier last date was 8th February 2023. Now students will able to apply till 12th February 2023. And Last date for printing your application is also change, Not this date is 23th February 2023. Candidates can also make online payment till 12th February 20223. After that No TAIT Application Form will be accepted. New Maha TAIT 2022 Time Table is given below:

शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित ; आज पासून अर्ज सुरु

Pavitra Portal – खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी १२ फेब्रुवारी २०२३ आहे. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 31/01/2023
Closure of registration of application 12/02/2023
Closure for editing application details 12/02/2023
Last date for printing your application 23/02/2023
Online Fee Payment 31/01/2023 to 12/02/2023

MAHA TAIT Exam 2023- The ‘Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)-2022’ exam will be conducted online for teacher recruitment. Online Application form started now. Eligible and Interested candidates may apply online through the https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/. Online application start from 31st Jan 2023. The closing date for submission of online application form is 8th Feb 2023. “Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (Maha TAIT) 2022” will be conducted online from 22/02/2023. Read More details are given below.





Maha TAIT 2023

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.

  • परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
  •  सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

MAHA TAIT EXAM 2022 Time Table

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 31/01/2023
Closure of registration of application 08/02/2023
Closure for editing application details 08/02/2023
Last date for printing your application 23/02/2023
Online Fee Payment 31/01/2023 to 08/02/2023




Maha TAIT Application Form Important Thinks

  1. While filling the application form, the candidates should fill in the information about the educational and professional qualifications like class 10th, class 12th, diploma, degree etc. and disability, if they belong to reserved category, from the original certificate.
  2. Scanned latest color photograph, signature, left hand thumb impression and self-signed affidavit must be uploaded in the online application form.
  3. The notification regarding the examination medium, syllabus, eligibility, application procedure and duration is available on the website of Maharashtra State Examination Council www.mscepune.in.
  4. Candidates will be contacted through SMS, Email for this examination and further proceedings.
  5. Therefore, the candidates are requested to provide their mobile phone number and Email ID correctly.
  6. There is no need to attach copies of any certificates along with the online application form.
  7. Candidates will be provisionally admitted to the examination subject to verification of original certificate and result will be declared.
  8. Any discrepancy between the information filled in the online application form and the original certificates will result in cancellation of the candidature at any level.

 उमेदवारांची पात्रता- Educational Criteria For Maharashtra TAIT Exam 2023

निवड प्रक्रिया पद्धत : Selection Process for Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) – 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः Maha TAIT Application 2022 Process

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
    • (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
      X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 200X300 pixels
      फाईल साईज 20 kb50kb –
    • (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 140X60 pixels
      फाईल साईज 10kb 20kb
    • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
      आकारमान 240X240 pixels in 200 DPI
      फाईल साईज 20 kb 50kb
    • (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 800×400 pixels in 200 DPI
      फाईल साईज 50kb-100kb –
    • स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना

परीक्षेचे शुल्क : Maha TAIT Exam 2022 Application Fees

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२- जाहिरात 

ऑनलाईन अर्ज  सादर करण्यासाठी लिंक 




Maha TAIT Exam 2023- Latest updates Maha TAIT Exam is that As many as 65,000 teacher posts are vacant in primary, secondary and higher secondary schools in the state. For that, ‘Tate’ exam will be organized. 35 thousand teachers will be recruited. Against this backdrop, the ‘TET’ exam will be conducted online in February at centers across the state.

शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरूण-तरूणी परीक्षा देतील असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरु आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरूणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

दोन टप्प्यात ६५ हजार शिक्षक भरती

सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे. त्यामुळे दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.


Maha TAIT Exam : Aptitude and intelligence test required for teacher recruitment will be conducted online soon. The online test will be conducted from February 17 to 28 through one of TCS, IBPS and MKCL. The exam schedule will be announced on 16 December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha TAIT Exam and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates

पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स अॅप्टिट्यूट ॲण्ड इन्टेलिजन्स टेस्ट- टीएआयटी) म्हणजेच थेट ही परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिला.

TAIT Exam 2022

यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू.चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टिचर एलिजिबिलिटी टेस्ट-टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली परंतु, कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्रतेसाठी टेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मागील टेट चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर ही परीक्षाच घेण्यात आली नाही, असे म्हटले होते.


पुणे शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maha TAIT Exam 2022

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब—ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब—ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे


Maha TAIT Exam 2022: Important updates regarding Maharashtra Teachers Aptitude and Intelligence Test. Aptitude and intelligence test for recruitment of teachers has not been conducted in the state for last four years. Now after four years the teacher aptitude test will be conducted by an external system. Read More details regarding Maharashtra TAIT Exam 2022 are given below.

चार वर्षांनंतर होणार शिक्षक अभियोग्यता चाचणी

  1. शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) घेतली जाते. मात्र 2017 नंतर मागील चार वर्षांत ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे.
  2. यंदा फेब्रुवारी महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ही परीक्षा लांबणीवर पडली. खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या गुणांआधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले. सहा महिन्यांत एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत डिसेंबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली. यंदा मात्र परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) चे आयोजन करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पॅनलमधून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. जागा रिक्त असूनही आता पंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने पात्र उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करावे, अशी मागणी डीएलएड आणि बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. sheetal umak says

    what is process to complent against ibps

  2. Archana says

    Corona mule kahi vidyarthyana TET exam deta nahi nahi aali, tyancha he vichar gov. ne karava. 2017 pasun tet ghetalich nahi. mg tet compulsory ka, yat student chi ky chuk.

  3. Admin says

    Maha TAIT Exam 2023 Online Apply

  4. Hanumant says

    How to pay exam fees

  5. Pratik kumbhare says

    I am 12th class completed to gadge baba ,University . my BA first continue to badge baba uniarcity.University I want a job

  6. Pratik kumbhare says

    I an interested to job

  7. Umakant virappa Pawar says

    I am MSc organic chemistry completed and 75% srtmununiversity

  8. Umakant virappa Pawar says

    MSc organic chemistry in srtmun University 75 %

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!