MHT CET: MPSC आणि B ed सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय
MHT CET 2022
Maha CET Exam 2022 @cetcell.mahacet.org
MHT CET Exam: The examination of B.Ed. and BHMCT will be held on 21st August 2022 through the CET chamber. Candidates who have appeared for the Maharashtra Public Service Commission examination along with these examinations should immediately inform the CET chamber through e-mail, so that they can change the batch for the examination conducted through CET. Action can be taken.
MPSC आणि B ed सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता बी.एड. सीईटी २०२२ या व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टपासून होणार आहे. मात्र याच दिवशी लोकसेवा आयोगाचीही एक परीक्षा असल्याने या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बॅच बदलून नव्याने परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी संबधित विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे ई-मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Maha CET Exam 2022 Schedule : Important information for students preparing for Maha CET exam 2022. Maharashtra State Common Entrance (Maharashtra CET) has released revised exam Schedule. As per the revised schedule, the CET exam will be held from August 2 to August 25. Applicants who applied for these exam may check their revised exam schedule from cetcell.mahacet.org or given link.
MHT CET 2022 – MHT सीईटी विविध कोर्सचे हॉलतिकीट डाऊनलोड करा..!
Maha CET Exam 2022 PCM group
- महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स द्वारे आयोजित करणाऱ्या सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सविस्तर माहिती cetcell.mahacet.org या संकेत स्थळावर पाहू शकतात. परिक्षेच्या तारखांबद्दल आणि हॉलतिकिट(Hallticket) कधी जारी होणार याबद्दलची माहीतीही या संकेतस्थळावर दिली आहे.
- सुधारित वेळापत्रकानुसार सीईटी परिक्षा 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. MHT-CET PCM ग्रुपच्या परिक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या वेळात तर PCB या ग्रुपच्या परिक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. पीसीएम च्या ग्रुपचे हॉलतिकिट 26 जुलै रोजी जारी करण्यात येईल तर पीसीबी ग्रुपचे हॉलतिकिट 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येईल.
- सध्या अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात. पण पुढील वर्षापासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी जाहीर करताना बारावीच्या गुणांना आणि सीईटी परिक्षेतील कामगिरीला समान महत्व दिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना बारावीतही चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे.
- दरम्यान, बारावी बोर्ड आणि सीईटी या दोन्ही परिक्षांच्या गुणांवर विद्यांर्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या गुणांवरूनच वि़द्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेचा देखील चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. तर सीईटी परिक्षेसंंबंधी अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सुधारित परीक्षेचा तारखा येथे पहा
The CET Cell has decided to give a special opportunity to make changes in the application form filled online. Students will be able to change their name, date of birth, photograph, signature, group change (PCM and PCB change). This update will be available to students between 23rd and 30th June 2022. More details as given below.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान आपल्या स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ६ लाख ६ हजार १४२ उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे.
काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत. या चुका दुरूस्त करण्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे दूरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात बदल करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, ग्रुप बदल म्हणजे (पीसीएम व पीसीबी बदल) करता येणार आहे. ही सुधारणा विद्यार्थ्यांना २३ ते ३० जूनदरम्यान स्वत:च्या लॉगिनमधून करायची असल्याची माहिती माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
MHT CET 2022– Some important changes have been made in the CET examination by the State Board of Education. Till now students were being admitted on CET marks for degree education. However, now the degree will be given on the marks of 50 per cent of 12th standard and 50 per cent of CET. This will definitely increase the importance of 12th standard marks. Read More details as given below.
हाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आहे ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना आले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.
- MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे.
- तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत.
- दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती.
- त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
- त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
MHT CET 2022- The JEE exam and the university exam have no option but to postpone the CET. Both exams were expected to take place on the same day as the earlier CET schedule. This led to the decision to postpone the CET, said Ravindra Jagtap, Commissioner, CET Cell. According to the new schedule, CET will be organized for undergraduate and postgraduate courses from August 2 to 25. According to the CET cell, the July schedule has been changed to August due to JEE, NEET and university session examinations.
केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ (JEE Mains 2022) आणि ‘नीट’ (NEET 2022) परीक्षांसाठी राज्याच्या सीईटी सेलतर्फे (MHT CET 2022) घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाइक प्रवेश परीक्षा (Commen Entrance Test, CET) पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सीईटी’ सेलकडून (CET Cell) जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आठवडाभरातच हा निर्णय बदलण्यात आला असून, आता ऑगस्ट महिन्यात परीक्षा होणार असल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पुढे गेल्याने प्रवेशांची प्रक्रियाही लांबणार असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार आहे.
- नव्या वेळापत्रकानुसार दोन ते २५ ऑगस्टदरम्यान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’चे आयोजन केले जाणार आहे. ‘जेईई,’ ‘नीट’परीक्षा आणि विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमुळे जुलै महिन्यातील वेळापत्रक बदलून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल होती. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तीन महिन्यांहून अधिक वाट पहावी लागणार आहे. परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार असल्याने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.
- हे प्रवेश नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहतील. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुन्हा एकदा उशिराने सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव होता म्हणून परीक्षांचे आयोजन आणि प्रवेश प्रक्रियांना उशीर झाला होता. यंदा प्रवेश परीक्षा वेळेत होतील, अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, याही वर्षी ‘सीईटी’ लांबणीवर पडणार असल्याने विद्यार्थ्यांसह, उच्च शिक्षण संस्थांनाही मनस्ताप होणार आहे.
- जेईई’ परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षा यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही परीक्षा ‘सीईटी’च्या आधीच्या वेळापत्रकाच्या तारखांच्या दिवशीच येण्याची शक्यता होती. यामुळे ‘सीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया ‘सीईटी’ सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली
MHT CET 2022- Registration
MHT CET Exam Registration 2022- The date of registration for various courses has been extended by the State Common Entrance Test Cell, Maharashtra. Apirl 15 was the last date for registration. Candidates will now be able to register till 11th May 2022. Candidates will be able to register on the official website cetcell.mahacet.org.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम.एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
MHT CET 2022 : अशी करा नोंदणी
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
MHT CET 2022 Date Update
मुंबई : सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांदरम्यान एमएचटी सीईटी असेल तर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी ट्विटरवर एमएचटी सीईटी परीक्षांची तारीख पुढे ढकलल्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली होती. इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक अशा नावाने या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी महा-एमएचटी-सीईटी / प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र महा-एमएचटी-सीईटी
- पीसीएम (PCM) ग्रुप – 05 ते 11 ऑगस्ट, 2022
- पीसीबी (PCB) ग्रुप – 12 ते 20 ऑगस्ट, 2022 (15, 16 व 17 ऑगस्ट वगळून )
एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, बी.प्लॅनिंग इत्यादी आणि आणखी अभ्यासक्रमासाठीची सीईटी आणि त्यांच्या तारखा वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत. या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती आणि तारखा दिलेल्या आहेत. दरम्यान या संदर्भातली माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलंय
वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आले असून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
CET वेळापत्रक
MHT CET Exam : The state’s CET exams will be held in the first week of August due to JEE Main and NEET exams .CET exam dates will be announced soon. The first session of JEE Main Exam will end on 29th June, the second session will end on 30th July, 2022, and the final examination will be held on 17th July, 2022. As a result, MHT CET 2022 exams in the state will be held in August, so that these exams do not clash with each other. Read More details as given below.
MHT CET 2022 Date Update: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET 2022) ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सामंत यांनी आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर ही घोषणा केली आहे. जेईई मेन (JEE Main) आणि नीट (NEET) परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.
सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून तर दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते.
MHT CET Exam Registration 2022- The date of registration for various courses has been extended by the State Common Entrance Test Cell, Maharashtra. March 31 was the last date for registration. Candidates will now be able to register till April 15. Candidates will be able to register on the official website cetcell.mahacet.org.
MHT CET 2022: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell, Maharashtra) विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहेत. आता उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३१ मार्च ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.
MHT CET 2022 : अशी करा नोंदणी
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
महत्त्वाच्या तारखा- Important Date
- महाराष्ट्र सीईटी परीक्षेची तारीख – १७ आणि १९ मे २०२२
- नोंदणीची अंतिम तारीख- १५ एप्रिल २०२२
सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागातील आठ विषय, उच्च शिक्षण विभागाचे आठ आणि कला शिक्षण विभागाचा एक विषय अशा १७ विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटीकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार सीईटीच्या परीक्षा ३ जूनपासून सुरू होत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा ३ ते १० जूनदरम्यान होणार आहेत. तर, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेली एमएचटी सीईटी ११ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (पीसीएम) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ ते १६ जून; तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीबी) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. कला शिक्षण विभागाची परीक्षा १२ जूनला होणार आहे. यासाठी आता १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
MHT CET Exam Date 2022- CET dates for courses conducted under the Department of Higher and Technical Education have been announced. The CET examinations of the Department of Higher Education will be held from June 3 to 10, 2022, the examinations of the Department of Technical Education will be held from June 18 to June 28 and the CET examinations of the Department of Arts will be held on June 12, 2022. This information was given by Higher and Technical Education Minister Uday Samant.
MHT-CET २०२२ च्या नोंदणीस सुरुवात
येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी (CET exam) विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत (CET cell) सुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्चा शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक तीन ते दहा जून 2022, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा दिनांक आकरा ते आठ्ठावीस जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा बारा जून 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. यासोबतच अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका वेळापत्रक व परीक्षेत बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
- तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 03 जून ते 10 जून, 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत.
- तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 11 जून ते 28 जून 2022 यादरम्यान होणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अ
- भ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
MHT CET Exam 2022- This is important news for students preparing for MHT CET 2022. State Common Entrance Test Cell (State Common Entrance Test Cell, MHT CET 2022) has announced the syllabus and grading scheme. Students preparing for MHT CET 2022 can check the syllabus and marking scheme by visiting the official website mhtcet2022.mahacet.org. Read More details as given below.
MHT CET Exam 2022: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सीईटी परीक्षेसाठी (State Common Entrance Test Cell,MHT CET 2022) अभ्यासक्रम आणि गुणांकन स्कीम जाहीर केली आहे. एमएचटी सीईटी २०२२ परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mhtcet2022.mahacet.org वर जाऊन अभ्यासक्रम आणि मार्किंग स्कीम तपासू शकतात. या परीक्षेची तयारी करणारे सर्व उमेदवार जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि मार्किंग योजनेनुसार स्वत:ची तयारी करू शकतात. एमएचटी सीईटी २०२२ च्या अभ्यासक्रमामध्ये सीईटी प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणाऱ्या विषयांची यादी देण्यात आली आहे.
MHT CET Marking Scheme
- सीईटी सेल महाराष्ट्राने एमएचटी सीईटी २०२२ मार्किंग स्कीम देखील जारी केली आहे.
- एमएचटी सीईटी परीक्षा २०२२ ही कॉम्प्युटर माध्यमातून होणार असून यामध्ये निगेटीव्ह मार्कींग असणार आहे.
- एमएचटी सीईटी २०२२ प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्स (JEE Mains) च्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठीण्य पातळी नीट (NEET) च्या बरोबरीची असेल.
एमएचटी सीईटी २०२२ च्या नोटीफिकेशननुसार, एमएचटी सीईटी प्रश्नपत्रिका तयार करताना इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमाला २० टक्के वेटेज आणि बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के वेटेज दिले जाईल. करोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (Maharashtra State Council for Educational Revision and Training) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (biology)आणि गणित विषयांचा काही भाग वगळण्यात आला आहे. इयत्ता अकरावी (२०२०-२१) चे विषय देखील एमएचटी २०२२ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम आणि मार्कींग स्कीम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MHT CET 2022– The Maharashtra State Common Entrance Examination Cell (MHT CET Cell) conducts entrance examinations for the selection of eligible candidates for admission to various undergraduate (UG) and post-graduate (PG) courses in various disciplines like Engineering, Pharmacy, Agriculture etc. The registration process for Maharashtra Common Entrance Examination 2022 (MHT CET 2022) is starting from 10th February. March 31 is the last date to apply for MHT CET 2022.
MHT CET 2022: सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिं, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३१ मार्च ही एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
MHT CET 2022: या स्टेप्स फॉलो करुन करा अर्ज
- महाराष्ट्र सीईटी २०२२ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- नवीन पेजवर ‘New Registration’ वर क्लिक करा.
मागितलेले तपशील भरून नोंदणी करा आणि अर्ज सबमिट करा. - महाराष्ट्र CET २०२२ नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत दिली
- जाईल.
- शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.
MHT CET २०२२ साठी महत्वाचे निर्देश
- उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- MHT CET २०२२ च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
- सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे
- आहे.
- उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे.
- सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा.
- प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.
LLB.FOR 3YEAR