Job Opportunity -खासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती

Mega Bharti 2022: There is good news for you if you are also looking for a job. According to Team Lease’s Employment Outlook report, companies plan to recruit in large numbers in the July-September quarter. A large number of job opportunities will soon be available in various sectors in the country. The next three months will see good employment opportunities in e-commerce, technology, education. Employment opportunities will be decided in cities like Bangalore, Chennai, Hyderabad, Mumbai and Delhi. More updates regarding Mega Bharti 2022 visit our website regularly. Read More details as given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची योजना आखली आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढल्यामुळे  व्यवसायातही  वाढ झाली आहे. याबाबतची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.

  •  टीमलीजच्या रोजगार दृष्टीकोन अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत नवीन नोकर भरती करण्याचा कंपन्यांचा हेतू 7 टक्क्यांवरून 61 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तिमाहीत, नवीन भरती करण्याचा इरादा 54 टक्के होता.
  • देशभरातील 14 शहरांमध्ये असलेल्या जवळपास 900 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • अहवालानुसार, मेट्रो आणि टियर-1 शहरांमध्ये त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते 81 टक्के गुण होते, जे दुसऱ्या तिमाहीत 89 टक्के गुणांवर पोहोचले आहे.
  • याशिवाय, जर आपण द्वितीय श्रेणीतील शहरांबद्दल बोललो, तर येथे नवीन भरती करण्याचा इरादा 7 टक्क्यांवरून 62 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर तिसऱ्या श्रेणीतील शहरांसाठी ही शक्यता तीन टक्क्यांनी वाढून 37 टक्क्यांवर गेली आहे.
  • ग्रामीण आणि शहरी भागातही नवीन नोकरभरती करण्याच्या इराद्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षेत्रनिहाय दृष्टीकोनातून, दिल्ली उत्पादनात सर्वाधिक 72 टक्के भरती क्षमतेसह आघाडीवर आहे, तर मुंबई (59 टक्के) आणि चेन्नई (55 टक्के) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • सेवांच्या बाबतीत, बंगळुरूच्या सर्वाधिक 97 टक्के कंपन्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत भरती करण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ मुंबई (81 टक्के) आणि दिल्ली (68 टक्के) आहे.

Mega Bharti 2022: Private companies will be hiring a large number of employees in the next quarter. In addition, many are likely to benefit from government jobs during this time. The recruitment process is also likely to start on behalf of the central government. The central government has announced to create one million new jobs in the next one and a half years. Therefore, the recruitment process for various posts under the Central Government is likely to start in the near future.

खासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती

Mega Bharti – विभागनिहाय टप्प्याटप्याने जूनअखेरीस भरती प्रक्रिया सुरु होईल

  •  देशावर दोन वर्ष  कोरोना   संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा  मोठा फटका हा कंपन्यांना बसला.
  • मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता कंपन्यांकडून देखील गेल्या दोन वर्षांत झालेले आपले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगाराच्या अनेक संधी  उपलब्ध होणार आहेत.
  • भारतात पुढील काही महिने जॉब मार्केट मजबूत स्थितीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत Manpower Group’s employment scenario चा सर्वेक्षण अहवाल मंगळवारी जाहीर झाला.
  • या सर्वेक्षण अहवालानुसार पुढील काही महिन्यांत देशातील जवळपास 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 2022 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रोजगार भरतीचे प्रमाण हे गेल्या आठ वर्षांती सर्वोच्च स्थानावर असेल असा या अहवालाचा अंदाज आहे

Mega Bharti 2022- सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त

 अहवाल काय सांगतो 

 सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जवळपास 63 टक्के कंपन्या या मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत. तर बारा टक्के कंपन्यांकडून कर्मचारी कपातीची शक्यता आहे. 24 टक्के कंपन्या कर्मचारी धोरणात कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भारतातील कंपन्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. परिणामी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमामात कर्मचारी भरती करण्यात येऊ शकते. कोरोना काळात उत्पादनाची मागणी घटल्याने कर्मचारी कपात करण्यात आली होती.

 


राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

Skill Development Training : 3 lakh youths in the state will be given training in banking, financial services, insurance in the next 3 years and will be provided employment opportunities. Training will be imparted to graduates, youth studying in the last year of graduation, youth who have dropped out of education after 12th standard. The 350-hour training, which lasts for about 3 to 5 months, will be completely free.

राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षांच्या कालावधीत बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन, आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून त्याचे हस्तांतर केले. आयसीएआय ही केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयांतर्गत कार्यान्वित संस्था आहे.

३ ते ५ महिन्यांचे मोफत प्रशिक्षण

या उपक्रमांतर्गत पुढील ३ वर्षांत राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाऊंटिंग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणारे हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल.

फडणवीसांना भेटल्यानंतर अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिका-यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस आणि मुंबई येथेही काही अधिका-यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.


Industrial Training Institute (ITI) students will now have the opportunity to work in a five-star hotel. For this, a Memorandum of Understanding (MoU) was signed between Government ITI in Mulund and ITC Hotel Limited, a chain of five-star hotels, in the presence of State Skill Development, Employment and Entrepreneurship Minister Nawab Malik.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित  हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


MahaArogya Skills Development Program

In the next three months, 20,000 trained manpower will be made available from various 36 courses in the fields of healthcare, nursing and paramedical. For this, the CM Health Skills Development Program was launched Thursday at the hands of Chief Minister Uddhav Thackeray and in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar.

युवक-युवतींना रोजगाराची संधी; 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण

कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

राज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे.

यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी करा – https://bit.ly/3xuvD9j


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Rupali hatwar says

    Job joing thank you

  2. Rupali hatwar says

    Thank you

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!