LIC Admit Card
LIC Admit Card
Life Insurance Corporation (LIC) has announced admissions for two recruitment exams. This recruitment is being done for the posts of Assistant Engineer (LIC Assistant Engineer) and Assistant Administrative Officer (LIC AAO). Hall tickets for LIC AAO and AE exams have been announced on the official website licinidia.in
LIC Exam: LIC कडून AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) दोन भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. ही भरती सहाय्यक अभियंता (LIC Assistant Engineer)आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (LIC AAO)पदांसाठी केली जात आहे. असिस्टंट इंजिनीअरच्या ५० आणि एएओच्या १६८ पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. दोन्ही परीक्षांच्या प्रवेशपत्राची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. LIC AAO आणि AE परीक्षांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट licinidia.in वर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत डाऊनलोड करता येणार आहे. एलआयसी एएओ आणि एई मेन्सची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
LIC AAO and AE Admit Card: असे करा डाऊनलोड
- एलआयसी वेबसाइटवर जा. होमपेजवरील LIC करिअर विभागात जा.
- करिअर पेजवर असिस्टंट इंजिनीअर रिक्रुटमेंट आणि AAO (स्पेशलिस्ट) भरती २०२० च्या लिंकवर क्लिक करा.
- नवीन पेजवर जाऊन कॉल लेटर डाउनलोड लिंक वर क्लिक करा. Ibpsonline ची लिंक उघडेल.
- येथे दिलेल्या जागेत तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि ऑन-स्क्रीन सिक्योरिटी कोड टाकून लॉगिन करा.
LIC AE & AAO परीक्षांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा