LCE Results-ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर
Librarian Certificate Examination Results
Librarian Certificate Examination Results: In the year 2022, the Librarian Certificate Examination was conducted from 23 district level centers in the state. The Examination is being conducted in the month of June every year by Directorate of Libraries. The result of this test has been declared. Applicants who applied for these exam may check their results from the given link or www. dol.maharashtra.gov.in or given direct link.
ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल येथे चेक करा
Librarian Certificate Examination Results: In the year 2021, the Librarian Certificate Examination was conducted from 11 district level centers in the state. The result of this test has been declared. Applicants who applied for these exam may check their results from the given link or www. dol.maharashtra.gov.in. Students will be able to get the mark sheets at their centers after April 22, 2022.