कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत, सहकार विभागाची मान्यता – KDCC Bank Bharti 2023
Kolhapur District Central Co-Operative Bank Bharti 2023 @ https://kdccbank.com/
Kolhapur District Central Co-Operative Bank Bharti 2023 @ https://kdccbank.com/ update is given here. The Department of Cooperatives has allowed 330 employees who retired from Kolhapur District Bank to be reinstated. Employees who retired from other positions including Manager, Deputy Manager & Inspector will have to work as Clerk and Peon. In this, 130 Peon and 200 Clerks will be taken in KDCC Bank Bharti 2023. Pune Zilla Bank hired retired employees for a period of two years. After that, the proposal was duly sent to the Reserve Bank for approval. This ‘Pune Pattern’ will be implemented by Kolhapur District Bank. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत, सहकार विभागाची मान्यता
कोल्हापूर जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त झालेले ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत घेण्यास सहकार विभागाने परवानगी दिली आहे. व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, निरीक्षकसह इतर पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लिपिक व शिपाई पदावर काम करावे लागणार आहे. यामध्ये १३० शिपाई तर २०० लिपिक म्हणून घेतले जाणार आहेत. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Kolhapur District Central Co-Operative Bank Recruitment 2023 @ https://kdccbank.com/
- जिल्हा बँकेमध्ये २००९ ला भरती झाली होती. त्यानंतर गेल्या चाैदा वर्षांत भरती झाली नाही. मात्र, तब्बल ९०० हून अधिक कर्मचारी कमी झाले. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवर कमालीचा ताण जाणवत आहे. सध्या बँकेच्या १९१ शाखा असून व्यवसाय १३ हजार कोटी इतका आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले आणि व्यवसाय तीन पटीने वाढला. त्यामुळे अनेक शाखांत कर्मचारीच नाहीत. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या असून काही कर्मचाऱ्यांना आजारी असताना कामावर यावे लागत आहे.
- ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि भरती करता येत नसल्याने संचालक मंडळाने बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बँकेने सहकार विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्याने ३३० सेवानिवृत्त कर्मचारी बँकेच्या सेवेत पुन्हा येणार आहेत. संचालक मंडळात मंजुरी घेऊन कर्मचाऱ्यांना हजर करून घेतले जाणार आहे.
- KDCC Bank Bharti 2023 लिपिकाला २० हजार पगार – लिपिकाला २० हजार रूपये तर शिपाई पदावर काम करणाऱ्यांना १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
- २० महिन्यांचा करार? – वित्तीय संस्थेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावर जबाबदारी देणे जोखमीचे असते. या कर्मचाऱ्यांसोबत २० महिन्यांचा करार केला जाणार असून त्यांच्याकडून सुरक्षितता म्हणून किमान ५ लाख रूपये ठेव घेण्याबाबत विचार सुरू आहे.
- सेवानिवृत्त ४५० कर्मचाऱ्यांचे अर्ज – दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा काम करण्यास तयार असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. तब्बल ४५० कर्मचाऱ्यांचे अर्ज बँकेकडे आले आहेत.
- KDCC Bank Bharti 2023 ‘भरती’चा पुणे पॅटर्न – पुणे जिल्हा बँकेने दोन वर्षांच्या मुदतीने सेवानिवृत्त कर्मचारी घेतले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे रीतसर प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊन भरती केली होती. हा ‘पुणे पॅटर्न’ कोल्हापूर जिल्हा बँक राबवणार आहे.
Kolhapur District Central Co-Operative Bank Bharti 2023 @ https://kdccbank.com/