Jobs in BDO India-देशाच्या ‘या’ कंपनीत तब्बल 25 हजार लोकांना मिळणार जॉब; पहा कुठे?
BDO India Careers & Jobs @ www.bdo.in/en-gb/careers
Jobs in BDO India
BDO is the sixth largest audit firm in the country. The company began by serving mid-market customers. Now the company also does audit work for many municipalities including the big business group (BDO India). The company says that the 6 largest audit firms in India will grow a lot in the coming years. That’s the reason as many as 25000 people will get jobs in this company of the country. An Indian company has said that it will give jobs to nearly 25 thousand people. BDO India, an Indian company working in the accounting field, it will give an opportunity to 25 thousand people to work in the company in the next 5 years. Accordingly, nearly 5 thousand people can get jobs every year. Read the more details below:
देशाच्या ‘या’ कंपनीत तब्बल 25 हजार लोकांना मिळणार जॉब; पहा कुठे?
BDO India जगभरात सध्या आर्थिक मंदीचं वारं वाहत आहे. फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र वेगळच चित्र पहायला मिळत आहे. नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
BDO India Careers & Jobs
एका भारतीय कंपनीने जवळपास 25 हजार लोकांना जॉब देणार असल्याचं सांगितलं आहे. अकाउंटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या बीडीओ इंडिया या भारतीय कंपनीने येत्या 5 वर्षांत 25 हजार लोकांना कंपनीत काम करण्याची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार दरवर्षी जवळपास 5 हजार लोकांना जॉब मिळू शकतो.
About BDO India
- BDO India या कंपनीमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील आठवड्यात 5 हजारांच्या वर गेली आहे. कंपनीचे इंडिया मॅनेजिंग पार्टनर मिलिंद कोठारी यांनी सांगितलं की, बीडीओने 2013 मध्ये केवळ 230 कर्मचारी आणि 2 ऑफिसद्वारे काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता कंपनीत 5 हजाराच्या वर कर्मचारी आहेत. कंपनी 2028 च्या अखेरीस, भारतातील ऑपरेशनमध्ये सुमारे 17 हजार तर ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये 8 हजार लोकांची भरती करेल.
- BDO कंपनीने 10 वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक सेवा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रावर अर्न्स्ट अँड यंग (EY), डेलॉइट, PwC आणि KPMG सारख्या (BDO India) मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. BDO च्या सरासरी वार्षिक वाढीपैकी 40 टक्के ही ऑडिट विभागातून येते. कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी 40 ते 45 टक्के दराने वाढत आहे.
BDO Work / Services कंपनी या क्षेत्रात देते सेवा
- मिलिंद कोठारी म्हणतात की, BDO ही देशातील सहावी सर्वात मोठी ऑडिट फर्म आहे. कंपनीने मध्य-मार्केट ग्राहकांना सेवा देण्यापासून सुरुवात केली.
- आता ही कंपनी बड्या उद्योग (BDO India) समूहांसह अनेक महापालिकांच्या लेखापरीक्षणाचे कामही करते.
- भारतातील 6 मोठ्या ऑडिट कंपन्या येत्या काही वर्षांत खूप वाढतील असं कंपनीचं म्हणणं आहे.
BDO India Careers & Jobs Details and apply link