ITI Pune Bharti- औंध आयटीआयमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण
ITI Pune Recruitment 2022
ITI Pune Training : Vocational training for minority students will be provided in Aundh ITI. Short-term employable free business training programs for minority youth have been organized in the Industrial Training Institute since March 13. Read More details are given below.
कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १३ मार्चपासून अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हातील सर्व नवीन जॉब्स आणि जाहिराती येथे पहा
अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम,शिख, जैन,पारसी,ख्रिश्चन तसेच बौद्ध,नवबौद्ध,हिंदू-महार या घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत अशा बेरोजगार युवक,युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
ITI Vocational training for minority students
- सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये फील्ड टेक्निशियन-एसी,सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल,क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४,ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३,मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
- यापैकी फील्ड टेक्निशियन-एसी हा अभ्यासक्रम १३ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा असून किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण शिक्षण असावे.या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना युवतींना प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे.
- अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्याचा असून प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट,आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत.
- अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (९८५०१५१८२५),जे.आय.गवंडी (८०८७१५०५०५) व सोहेल शेख (९६३७३९५८३३) यांच्याशी संपर्क साधावा.या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी केले आहे.
ITI Pune Bharti 2022: The proposal to start Industrial Training Institute (ITI) at Yerawada in Pune district and to create posts for this institute was approved in the recent Cabinet meeting. Approval was also given for a total of 40 posts in 18 ITIs and 23 teachers and 17 non-teachers. Read More details regarding ITI Pune Recruitment 2022 are given below.
पुणे जिल्ह्यातील ITI मध्ये 40 नव्या पदांची होणार भरती!!
ITI Pune Recruitment 2022: पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय (ITI) सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी ४० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.
येरवडा येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या आयटीआय मधील १८ तुकडया व त्यासाठी आवश्यक २३ शिक्षकीय व १७ शिक्षकेतर अशा एकूण ४० पदनिर्मितीच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक आस्थापना, औद्योगिक समूह यांची मोठी संख्या आहे. येरवडा व नगररोड या क्षेत्रात रांजणगाव, चाकण एम.आय.डी.सी. हे आशिया खंडातील नामांकित उद्योगक्षेत्र आहेत. या ठिकाणी फियाट, बजाज इलेक्ट्रीकल, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स, हायर इंडिया लि. येझाकी, बेकर गेजेस आदी ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रातील उद्योग आहेत.
- पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक होतकरू उमेदवारांना या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सध्याच्या मंजूर संख्येवरील जागांवर प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळणे दुरापस्त होत आहे.
- त्यानुसार स्थानिक गरजा तसेच मागणी विचारात घेऊन येरवडा येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.
- या आयटीआय मधील १८ तुकडया व त्यासाठी आवश्यक २३ शिक्षकीय व १७ शिक्षकेतर अशा एकूण ४० पदनिर्मितीच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.
- या आयटीआयमधील यंत्रसामुग्री, हत्यारे याकरिता २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांच्या अनावर्ती खर्चाकरिता व ४० शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वेतन व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रतिवर्षी आवर्ती खर्चासाठी २ कोटी २५ लाख ६३ हजार रुपयांच्या इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या संस्थेकरिता शिक्षक व शिक्षकेतर पद निर्मितीसाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.
I am interested