DVET आयटीआय ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी ३ दिवसांची वाढ, येथे पहा वेळापत्रक..! – ITI Admission 2024

DVET Admission 2024

ITI Admission 2024

DVET ITI Admission 2024 date extend – The admission process for government and private industrial training institutes (ITIs), which impart skilled education, is currently underway. As per the schedule, the deadline for submission of online applications was Sunday (June 30). However, the deadline has now been extended and online applications can be submitted till 5 pm on July 3. 

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार रविवारपर्यंत (दि. ३०) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत होती. मात्र, आता ही मुदत वाढवली असून ३ जुलैला सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 

  • चार जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी तर चार व पाच जुलैला गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, अर्जातील माहितीत बदल करणे ही प्रक्रिया होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प, प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया पाच जुलैला सुरू होणार असून सहा जुलैला सायंकाळी पाचपर्यंत ही प्रक्रिया होईल.
  • मराठवाड्यातील १४९ आयटीआयमधील २१ हजार ९४४ जागांसाठी तब्बल ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहे. नांदेड जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ४ हजार ६८४ जागा उपलब्ध आहे. त्या खालोखाल लातूर जिल्ह्यात शासकीय आणि खासगी आयीआयमध्ये प्रवेशाच्या ३ हजार ९६४ जागा उपलब्ध आहे. त्यानंतर बिड जिल्ह्यात ३ हजार ४४४, छत्रपती संभाजीनगर २ हजार ८४४, परभणी २ हजार ४१२, धाराशिव २ हजार ९२, जालना येथे १ हजार ५६८, हिंगोलीत ९३६ अशा जागा उपलब्ध आहे.

DVET Admission 2024 | ITI private, government seats available: ITI admission process schedule announced. The online application form for admission to Industrial Training Institutes (ITIs) in the state will be available from Monday (June 3). The Directorate of Vocational Education and Training has released the schedule for ITI admissions. A total of 1,48,568 seats this year including 92,364 seats in 418 government ITIs and 56,204 in 608 non-government ITIs Admission will be granted.
In the download section on the website of the https://admission.dvet.gov.in of the Directorate of Vocational Education and Training, the method, rules and procedures for ITI admission are given. The brochure will be made available in PDF format from June 3. Students will be able to do online work like filling admission form and registration fee, selecting ITI centers, etc.

ITI Admission Process Time Table

  • Online Admission Application dt. 3 to 30 June
  • Determination of Admission Application : 5th June to 1st July
  • Presentation of profession and institution wise options and preference for the first round of admission : Dt. 5 June to 2 July
  • Release of Preliminary Merit List : 4th July
  • Objection against merit list and modification of information in admission form 4th to 5th July
  • Release of Final Merit List : 7th July

Centralized Online ITI Admission Process – 2024 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2024

आयटीआयसाठी सोमवारपासून प्रवेश अर्जास सुरुवात – प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

ITI खासगी, सरकारी अशा दीड लाख जागा उपलब्ध : ITI प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी सोमवारपासून (दि. ३) ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ४१८ शासकीय आयटीआय ९२ हजार ३६४ आणि ६०८ अशासकीय आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ अशा एकूण १ लाख ४८ हजार ५६८ जागांवर
प्रवेश दिले जाणार आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये आयटीआय प्रवेशाची पद्धत, नियमावली आणि कार्यपद्धती याबाबत दि. ३ जूनपासून पीडीएफ स्वरूपात माहितीपुस्तिका उपलब्ध करून दिली जाईल. प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे आदी कामे विद्यार्थ्यांना ऑनलाइन करता येतील.

ITI Admission असा करा अर्ज?

प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्जानुसार मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत जवळच्या आयटीआयमध्ये पडताळणीसाठी सादर करावी लागणार आहे. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवारांचे सर्व अर्ज रद्द होतील. प्रवेश अर्जात प्राथमिक मोबाइल क्रमांक नोंदविणे गरजेचे आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत वेळोवेळी एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोबाइल क्रमांक बदलता येणार नाही.

ITI प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे दि. ३ ते ३० जून
  • प्रवेश अर्ज निश्चित करणे : ५ जून ते १ जुलै
  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : दि. ५ जून ते २ जुलै
  • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ४ जुलै
  • गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे ४ ते ५ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ७ जुलै

ITI प्रवेशप्रक्रियेचे प्रवेश फेरी

  • पहिली प्रवेश फेरी : १५ ते १९ जुलै
  • दुसरी प्रवेश फेरी : २८ जुलै ते २ ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : १० ते १४ ऑगस्ट
  • चौथी प्रवेश फेरी : २१ ते २४ ऑगस्ट

आयटीआय संस्थांमधील रिक्त जागा

  • विभाग | शासकीय | खासगी | एकूण जागा
  • अमरावती | १५,९८८ | ४१४४ | २०,१३२
  • छत्रपती संभाजीनगर | १४,०९२ | ६७३६ | २०,८२८
  • मुंबई | १५,६७६ | ४४६० | २०,१३६
  • नागपूर | १४,५५२ | १२,८५६ | २७.४०८
  • नाशिक | १४,८९२ | १५,९२४ | ३०,८१६
  • पुणे | १७,१६४ | १२,०८४ | २९,२४८
  • एकूण | ९२,३६४ | ५६,२०४ | १,४८,५६८

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे दि. ३ ते ३० जून
  • प्रवेश अर्ज निश्चित करणे : ५ जून ते १ जुलै
  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : दि. ५ जून ते २ जुलै
  • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ४ जुलै
  • गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे ४ ते ५ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ७ जुलै

प्रवेशाबाबत मार्गदर्शन :

  • शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३ जूनपासून सकाळी १० ते ११ या वेळेत प्रवेश-प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. आयटीआय संस्था प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील.
  • रोजगार क्षमतेत वाढ होण्यासाठी युवकांचा कौशल्य विकास होणे महत्त्वाचे आहे. दहावीनंतर आयटीआयमधून एक ते दोन वर्ष प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार मिळविण्यासह व्यवसाय करण्यासाठी सक्षम होता येते. – दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय.

Online Admission 2024

ITI Admission 2024-govokri.in

REGIONWISE HELPLINE NUMBER (From 10:00 AM to 06:00 PM) विभाग निहाय मदत कक्ष क्रमांक (सकाळी 10.00 वाजेपासुन सायंकाळी 06.00 वा वाजेपर्यंत)

REGIONWISE HELPLINE NUMBER(From 10:00 AM to 06:00 PM)
विभाग निहाय मदत कक्ष क्रमांक(सकाळी 10.00 वाजेपासुन सायंकाळी 06.00 वा वाजेपर्यंत)
Sr.No
(अनु क्र)
Region
(विभाग)
Districts in Region
(विभागांतर्गत जिल्ह्ये)
Helpline Number
(मदत कक्ष क्रमांक)
1 Nagpur Region
(नागपूर विभाग)
Nagpur
(नागपूर)
+91-7249541065
Chandrapur
( चंद्रपूर)
+91-8605567886
Gadchiroli
( गडचिरोली)
+91-9420143888
Bhandara
(भंडारा)
+91-7387483408
Gondiya
(गोंदिया)
+91-9579037163
Wardha
( वर्धा)
+91-9158583955
2 Nashik Region
(नाशिक विभाग)
Nashik
(नाशिक)
+91-9423902015
Dhule
(धुळे)
+91-9699536014
Nandurbar
(नंदुरबार)
+91-8275763010
Jalgaon
(जळगांव)
+91-7744813579
Ahmednagar
(अहमदनगर)
+91-9699453647
3 Aurangabad Region
(औरंगाबाद विभाग)
Aurangabad
(औरंगाबाद)
+91-7058982585
JALNA
(जालना)
+91-9422575851
PARBHANI
(परभणी)
+91-9422964450
HINGOLI
(हिंगोली)
+91-9890363588
OSMANABAD
(उस्मानाबाद)
+91-9403650363
LATUR
(लातूर)
+91-9960483651
NANDED
(नांदेड)
+91-9970845098
BEED
(बीड)
+91-9270005363
4 Mumbai Region
(मुंबई विभाग)
Mumbai City
(मुंबई शहर)
+91-8689986244
Mumbai Suburban
(मुंबई उपनगर)
+91-8828707003
Thane
(ठाणे)
+91-8591294718
Raigad
( रायगड)
+91-8149922734
Palghar
(पालघर)
+91-7506609413
Ratnagiri
(रत्नागिरी)
+91-9607408401
Sindhudurg
(सिंधुदुर्ग)
+91-8668323408
5 Amravati Region
(अमरावती विभाग)
Amravati
(अमरावती)
+91-9424830360
Akola
(अकोला)
+91-9423762229
Yavatmal
(यवतमाळ)
+91-9422186233
Washim
(वाशीम)
+91-7588209318
Buldhana
(बुलढाणा)
+91-9403727272
6 Pune Region
(पुणे विभाग)
Pune
(पुणे)
+91-8857984822
Satara
(सातारा)
+91-9850035342
Sangli
(सांगली)
+91-7276140139
Solapur
(सोलापूर)
+91-7709629659
Kolhapur
(कोल्हापूर)
+91-9423044948

DVET ITI 2024– Admission.Dvet.Gov.In

Helpline Number (From 10:00 AM to 06:00 PM)
8104-493-361, 8104-460-640, 9108-259-812


Students who have not yet registered online for ITI 4th round admission will be able to register till 5 pm on 7th October 2023. Consolidated merit list will be released at 10 pm, while between 8th to 10th October 2023, registered and unadmitted students are required to study institution-wise and profession-wise vacancies and attend the institution-level counseling admission round in person. It has been informed that the students who have already registered at the beginning of the admission process will be able to go and take admission in the institute in the fourth round till October 10 according to the vacancies. Candidates Read the complete details given below on this page regarding the DVET ITI Admission 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची आता अखेरची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. त्याअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशासाठी समुपदेशन फेरी सुरू असून, प्रवेशासाठी ही अखेरची संधी आहे. चौथी प्रवेशासाठी अजूनही ऑनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही ७ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. रात्री दहा वाजता एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, तर ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान नोंदणीकृत तथा अप्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेश प्रवेश फेरीसाठी व्यक्तिशः संस्थेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत १० ऑक्टोबरपर्यंत रिक्त जागांनुसार संस्थेत जाऊन प्रवेश घेता येईल, असे कळविण्यात आले आहे.

Extension of time till 6th September 2023 for admission in Government Industrial Training Institute. The actual admission of the students will take place from September 8 to 12, the information was given by the Industrial Training Institute. 6 September Evening 5 is the deadline. Proceedings Will be up to at 7th September at 5 p.m. 

आयटीआयला आज अखेरची मुदत

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत होतील, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आली. ६ सप्टेंबर सायं. ५ ची मुदत आहे. कार्यवाही ७ ला सायं. पाच पर्यंत असेल.


So far 78,420 students have taken admission in the three rounds of ITI admission 2023. Students selected in the third round of admissions to Industrial Training Institutes (ITIs) in the state have been given another two days extension for admission. Earlier, students could take admission on 15th and 16th. However, due to two days of holidays, the admission deadline has been extended for two more days. The fourth round will be announced on August 20. The admission period for this round will be from 21 to 24. After that admissions will be done at the institutional level. Candidates Read the complete details given below on this page regarding the DVET ITI Admission 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

आयटीआयच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ निश्चित

तीन फेरीत आतापर्यंत ७८ हजार ४२० विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ मिळाली आहे. आयटीआयच्या तीन फेरीत आतापर्यंत ७८ हजार ४२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आतापर्यंत तिसऱ्या यादीत निवडलेल्या ४० हजार २५५ पैकी १५ हजार ९९२ इतक्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
यापूर्वी, विद्यार्थ्यांना १५ आणि १६ तारखेला प्रवेश घेता येणार होते. मात्र, दोन दिवस सुटी असल्याने आणखी दोन दिवसांची प्रवेशाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा अधिक वाढताना दिसत आहे. अजून चौथी व संस्थास्तरावरील फेरी प्रवेश शिल्लक आहेत.
पहिल्या फेरीत ४५ हजार ४२ व आहेत. दुसऱ्या फेरीत १७ हजार ६४१ अशा ६२ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर तिसऱ्या फेरीत आतापर्यंत १७ हजार ५५८ प्रवेश झाले आहेत. कॅप फेरीतील १ लाख ३८ हजार ७९० जागांपैकी पहिल्या फेरीत ९१ हजार १०७ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती.
यामध्ये शासकीय आयटीआयमधील ७५ हजार १० लॉटमेंटपैकी ३५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केले आहेत. तर खासगी आयटीआयमधील १६ हजार ९७ पैकी १० हजार ५ अशा एकूण ४५ हजार ४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर दुसऱ्या फेरीत ४९ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी अलॉट केले होते. त्यापैकी १७ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत

असे आहे चित्र

  • एकूण जागा : १,५३,०६४
  • केंद्रीभूत प्रवेश जागा : १.३८७९०
  • तीन फेऱ्यांत प्रवेश घेतलेल्यांची संख्या : ७८ हजार ४२०

चौथी फेरी २० ऑगस्टला

  • ■ २० ऑगस्टला चौथी फेरी जाहीर होणार आहे.
  • ■ या फेरीत प्रवेशाची मुदत २१ ते २४ असणार आहे. त्यानंतर संस्थास्तरावर प्रवेश होणार आहेत.

ITI Admission 2023


Admissions to government Industrial Training Institutes (ITIs) in the state will begin from Monday (12th June 2023). The first admission list will be announced on 20th July 2023 and the admission will begin. Students can apply through the website https://admission.dvet.gov.in. 10th pass and fail is the minimum qualification for ITI admission. Candidates above 14 years with minimum educational qualification or above will be eligible for ITI course. The students taking admission this year have been provided online facility to apply, pay the registration fee, select the preferred ‘ITI’, amend the application and raise objections. Candidates Read the complete details given below on this page regarding the DVET ITI Admission 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

‘ITI’ प्रवेशाची संधी! १२जूनपासून प्रवेशाला प्रारंभ

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  1. राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
  2. दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.
  3. फिटर, इलेक्ट्रिशनला सर्वाधिक पसंती – औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.

ITI Admission 2023 Time Table

‘आयटीआय’ प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै
  • पहिली प्रवेश फेरी : २० जुलै
  • द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै
  • दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट
  • चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

  1. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १२ जूनपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
  2. विद्यार्थ्यांना केवळ एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द करून त्यास प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल. तसेच, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जाची निश्चिती करणे आवश्यक आहे.
  3. प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी व खासगी संस्थास्तरीय फेरी अशा सहा फेऱ्या होणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे तसेच सविस्तर प्रवेशासंदर्भात माहितीपुस्तिका https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
  4. विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत एक ते शंभर पसंतीक्रम देता येणार आहेत.पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास त्या संस्थेतच प्रवेश घ्यावा लागेल. अन्यथा चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

  • ■ ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : दि. १२ जून ते ११ जुलै
  • ■ अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे : दि. १९ जून ते ११ जुलै
  • ■ पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे : १९ जून ते १२ जुलै
  • ■ प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे १३ जुलै (स. ११ वाजता)
  • ■ गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे : व १४ जुलै
  • ■ अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १६ जुलै
  • ■ पहिली प्रवेश फेरी : दि. २० ते २५ जुलै
  • ■ दुसरी प्रवेश फेरी : दि. २१ ते ४ ऑगस्ट
  • ■ तिसरी प्रवेश फेरी दि. १ ते १४ ऑगस्ट
  • ■ चौथी प्रवेश फेरी दि. १० ते २४ ऑगस्ट
  • ■ संस्थास्तरीय समुपदेशन फेरी : दि. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येईल.
  • ■ खाजगी संस्था स्तरावरील प्रवेश २१ जुलैपासून सुरु होणार आहेत.

ITI Admission 2023 Link


ITI Admission 2022

All India Vocational Session and Annual Supplementary Examination has been conducted on 25th November by the Directorate General of Training for the trainees admitted in Industrial Training Institute (ITI) in the admission session from 2014 to 2021 but failed in the examinations. For this, the trainees are requested to contact their industrial training institute by 10th Nov 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) २०१४ ते २०२१ या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या मात्र परीक्षांमध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

‘आयटीआय’साठी अखेरची संधी

राज्यभरातील खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या अध्ययनास महिना उलटला आहे. मात्र, अजूनही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘डीजीटी’च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख जागांसाठी १५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी राज्य परीक्षा मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही आयटीआयमध्ये प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) पुरवणी प्रवेश वेळापत्रकही जाहीर केले.


ITI Admission 2022: Recently the result of 10th re-examination was declared. Another chance of admission has been given to the students who have passed this examination and have not yet applied for ITI admission and students can apply online till 11th September 2022 through the https://admission.dvet.gov.in/

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेले आणि आत्तापर्यंत दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ७) ते रविवार (ता. ११) दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घोषित केले आहे.

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश फेरीचेही वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

त्याचप्रमाणे अद्ययावत प्रवेश वेळापत्रक संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट द्यावे, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकड्यांचा समावेश सद्यःस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेला आहे.

उमेदवारांनी आयटीआयनिहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा, त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी नमूद केले आहे

प्रवेशाचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची विभागनिहाय आकडेवारी :

विभाग : प्रवेश क्षमता : झालेले प्रवेश : झालेल्या प्रवेशाची टक्केवारी

  • अमरावती : १८,९१६ : १५,७७५ : ८३.४० टक्के
  • औरंगाबाद : २०,८८८ : १५,६५४ : ७४.९४ टक्के
  • मुंबई : २०,२५२ : १५,८५९ : ७८.३१ टक्के
  • नागपूर : २८,४५६ : १७,९५२ : ६३.०९ टक्के
  • नाशिक : २९,९१६ : १९,००७ : ६३.५३ टक्के
  • पुणे : ३१,६८८ : २१,४२५ : ६७.६१ टक्के
  • एकूण : १,५०,११६ : १,०५,६७२ : ७०.३९ टक्के

Admission Notification new

APPPLY HERE 


ITI प्रवेश २०२२ चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

The ITI Admission 2022 4th round time table is given below. Complete ITI rounds details are given below, The candidates have to fill out the online application from from the below given official website on or before the last date after release. It is advisable for the candidates to read the complete eligibility criteria carefully before filling out the application form. Here we provide the ITI admission 2022 details, Merit list, Provisional list, Selection Lists, College List etc., Keep visit us for the further updates.

ITI Online Registration

ITI Rounds

ITI Admission 2022: Industrial Training Institutes (ITI) has released the admission time table for admission Process. ITI admission process has conduct on online. The first round process of this admission has been completed. Institution and profession wise selection list will be released on 6th August. In the institute selected in the second round, the students will be present for the verification of all the original documents from 8th to 12th August and the actual admission process:

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्यांपैकी ४४.११ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट मिळाली होती. त्यापैकी ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट मिळाली होती. यामध्ये शासकीय आयटीआयमधील ७५ हजार ७९९, तर खासगी आयटीआयमधील १६ हजार ३४१ विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट जाहीर झाली होती. त्यातील  शासकीय आयटीआयमध्ये ३१ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी (४१.५२ टक्के), तर खासगी आयटीआयमध्ये नऊ हजार २३७ विद्यार्थ्यांनी (५६.५२ टक्के) प्रवेश निश्चित केला आहे.

ITI Admission Second Round Timetable

दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

  • – संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे : ६ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजता)
  • – दुसरी फेरीत निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थिती राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे : ८ ते १२ ऑगस्ट

‘आयटीआय’ पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या –

तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय

  • – ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७५,७९९ : १६,३४१ : ९२,१४०
  • – प्रवेश निश्चित केलेले : ३१,४७३ : ९,२३७ : ४०,७१०
  • – प्रवेश घेतलेल्यांची टक्केवारी : ४१.५२ टक्के : ५६.५२ टक्के : ४४.१८ टक्के

पहिल्या फेरीतील पुणे विभागातील प्रवेशाची आकडेवारी :

तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय

  • – ‘ॲलॉटमेंट’साठी उपलब्ध जागा : १७,५६४ : १४,१२४ : ३१,६८८
  • – ॲलॉटमेंट मिळालेल्या जागा : १४,१२१ : ४,४१२ : १८,५३३
  • – प्रवेश घेतेलेल्यांची संख्या : ५,९६४ : २,५५६ : ८,५२०

सर्वाधिक जागा असणाऱ्या ट्रेडमध्ये पहिल्या फेरीत झालेले प्रवेश

ट्रेड : झालेले प्रवेश : प्रवेशाची टक्केवारी

  • इलेक्ट्रिशियन: ८,५३८ : ६३.२४ टक्के
  • फिटर :४,७३८ : ४५.६१ टक्के
  • वेल्डर : ३,५३५ : ३३.६८ टक्के
  • कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट : २,८१० : ४२.१० टक्के
  • मेकॅनिक डिझेल : २,५३२ : ४७.१२
  • मेकॅनिक मोटर व्हेईकल : २,५३९ : ५१.८८ टक्के
  • इलेट्रॉनिक्स मेकॅनिक : १,३२९ : ४१.६८

ITI Admission 2022: The last date for admission to Industrial Training Institutes (ITI) has been extended till 27th August 2022 and interested and eligible students from Mumbai Division should apply for the same through www.dvet.admission.gov.in before the 27th August 2022. Read More details are given below.

????????मुंबई जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे शोधा 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशासाठी २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे. मुंबई विभागाच्या वतीनं मुलुंड आयटीआय इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (एडीट) करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी संकेतस्थळावर १ ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असं दुर्गे यांनी सांगितलं.

मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात ६७ शासकीय आयटीआय असून यामध्ये ४९ सर्वसाधारण आयटीआय, ३ महिलांकरिता आयटीआय, १० आदिवासी आयटीआय, २ अल्पसंख्याक आयटीआय, ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खाजगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये २० हजार १८४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


ITI Admission 2022: Final Merit List for Industrial Training Institute Admission 2022 has been published and merit number has been made available in the account of all the candidates and also informed to them through SMS. In the admission process for the academic year 2022-23, the proportion of girls compared to boys in the ITI admission process is 13 percent.  Students should appear for verification of all original certificates from July 30 to August 3, 5 PM in the institute selected for the first round of admission and take actual admission process. Read More details as given below.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेत आयटीआय प्रवेश प्रक्रियेत मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अत्यल्प असे १३ टक्के एवढे आहे. मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव असतानाही प्रवेशासाठी मुलींचे प्रमाण कमी आहे. संचालनालयाने ३ लाख ८ हजार ४३९ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. तात्पुरत्या गुणवत्ता यादीनंतर दोन दिवसात अर्ज पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५० हजाराने वाढल्याने गुणवत्ता यादीतील संख्या तीन लाखाच्या पुढे गेल्याचे सुत्रांनी सांगितले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी १७ जून ते २३ तुलै दरम्यान झाली. प्रवेश फेरी वेळापत्रकानुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत मुला-मुलींच्या अर्जाची संख्या लक्षात घेतली तर दोन्ही अर्जांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले. एकूण ३ लाख ८ हजार ४३९ अर्जांपैकी २ लाख ६७ हजार २३५ मुलांचे अर्ज आहेत तर केवळ ४१ हजार १९८ अर्ज मुलींचे आहेत.

दहावीनंतर करिअरच्या दृष्टिकोनातून आजही विद्यार्थिनी आयटीआयमधील अभ्यासक्रमांच्या पर्यायाचा विचार करत नसल्याचे चित्र आहे. आयटीआयमध्ये मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव असताना अर्जांचीच संख्या कमी असल्याने आरक्षित जागांवर मुलांमधून प्रवेश देण्यात येतो असे सुत्रांनी सांगितले. मुलींच्या प्रमाणाबाबत आयटीआयमधील प्राचार्य, शिक्षकांनी याबाबबत मतमतांतरे आहेत. आयटीआयमधील अवजड मशनरी अभ्यासक्रमाला कमी प्राधान्य, टेबल ट्रेडची अधिक निवड यासह आयटीआयमधील अनेक अभ्यासक्रम मुलींसाठीही उपयुक्त आहेत, रोजगाराच्या संधीही आहेत हे पोहचविण्यात संचालनालय कमी पडल्याचेही कारणे सांगितले जातात.

राज्यभरात आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज हे दहावीत ५६ ते ५९ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे आहेत. एकूण अर्जापैकी ४४ हजार ८११ विद्यार्थी या गुणांमधील आहेत. त्यापाठोपाठ ६१ ते ६५ टक्के मिळविलेल्यांमध्ये ४४ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत.

पहिल्या यादीत प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ३ ऑगस्टपर्यंत संबंधित संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासह याच दरम्यान दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य देण्याची प्रक्रियाही सुरू असणार आहे

अशी आहे गुणवत्ता यादी..

  • टक्के विद्यार्थी संख्या
  • १०० टक्के असलेले विद्यार्थी ५३
  • ९६ ते ९९ टक्के २
  • ९१ ते ९५ टक्के ३५२
  • ८६ ते ८९ टक्के ३५९९
  • ८१ ते ८५ टक्के १२१४९
  • ७६ ते ७९ टक्के २३६२२
  • ७१ ते ७५ टक्के ३३४७०
  • ६६ ते ६९ टक्के ४१९१६
  • ६१ ते ६५ टक्के ४४५६७
  • ५६ ते ५९ टक्के ४४८११
  • ५१ ते ५५ टक्के ३८९०३
  • ४६ ते ४९ टक्के ३१७१४
  • ४१ ते ४५ टक्के २२०९०
  • ४० टक्क्यांपेक्षा कमी १११९१


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!