Infosys Jobs: इन्फोसिस करणार राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मदत

Jobs in Infosys 2023

Jobs in Infosys 2023

Job Openings : 4263 Jobs in Infosys LinkedIn, a professional website, says that Infosys has 4263 jobs. It mainly has vacancies for Engineering, Software and QA category, Consulting, Project and Program Management posts. The remaining seats are in engineering-hardware and networking and IT and information security.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Job Openings : Infosys मध्ये 4263 नोक-या – लिंक्डइन या प्रोफेशनल वेबसाइटने म्हटले आहे की इन्फोसिसमध्ये 4263 नोक-या आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर आणि क्यूए श्रेणी, सल्लामसलत, परियोजना आणि कार्यक्रम व्यवस्थापन या पदांसाठी जागा आहेत. तर बाकी जागा इंजीनियरिंग-हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि आयटी आणि माहिती सुरक्षा क्षेत्रात आहे.

The school education department has decided to provide online training to teachers in the state who have not received the benefits of senior grade and selection grade due to lack of training. About 94,000 teachers in the state will benefit from this training. Infosys will help. A Memorandum of Understanding (MoU) was signed between the State Council for Educational Research and Training (SCERT) and Infosys in the presence of School Education Minister Varsha Gaikwad and Secretary Ranjit Deol.

इन्फोसिस करणार राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मदत

राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

शिक्षकांना 12 वर्षे आणि 24 वर्षे सेवा झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी तसेच निवड श्रेणी लागू होते. तथापि मागील पाच वर्षे प्रशिक्षण कार्यक्रम घेतला नसल्यामुळे हे लाभ देता येत नव्हते. हे प्रशिक्षण देण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. तथापि, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रशिक्षण देणे शक्य झाले नाही. या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यातील सुमारे 94 हजार शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. यावेळी एससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग तर इन्फोसिसच्या वतीने कार्यक्रम व्यवस्थापक किरण एन.जी., पुण्याच्या व्यवस्थापक मनोरमा भोई, सहयोगी उपाध्यक्ष सीमा आचार्य, इंजिनिअरिंग अकादमीचे प्रमुख व्हिक्टर सुंदर राज, कॉर्पोरेट घडामोडींचे प्रमुख संतोष अनंथपुरा आदी उपस्थित होते.
राज्यातील सुमारे 44 हजार शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांचा वापर वाढवून विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावेत, यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात प्रत्यक्षात शाळेचे वर्ग भरविणे शक्य नसल्याने विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भविष्यात राज्यातील शासकीय शाळा डिजिटल करणे, शाळांमध्ये रोबोटिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उभारणे यासाठी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहजरित्या आत्मसात करता यावी यासाठीही इन्फोसिसने सहकार्य करावे, याबाबत शिक्षणमंत्र्यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावर शालेय शिक्षण विभागास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबत इन्फोसिसनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

Infosys Bharti 2023- Infosys, the country’s second-largest software services company, has reported a 12% increase in profits this year. Therefore, the company has decided to recruit another 50,000 employees soon in Infosys. Infosys Chief Financial Officer said that the Given the growing demand in the future, we will focus on investing in capacity building in terms of sales, supply and research,”. So that they need more employees for to achieve the target. Read more details regarding Infosys Bharti 2022 are given below.

Infosys इन्फोसिस करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती

IT क्षेत्रात तब्बल 3,60,000 फ्रेशर्सना मिळणार Job

Infosys Bharti 2022

  1. इन्फोसिस या देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टेवेअर सेवा कंपनीला यंदा १२ टक्के वाढीव नफा मिळाला आहे. त्यामुळे कंपनीने आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  2. मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा महसूल २२.७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीला ५ हजार ६८६ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात माहिती तंत्रज्ञान सेवांच्या महसुलात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
  3. ग्राहकांनी आमच्यावर कायम ठेवलेल्या विश्वासामुळे आम्हाला मार्केट शेअर मिळत राहिला आहे, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले. इन्फोसिसचे मुख्य अर्थ अधिकारी म्हणाले, “भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता आम्ही विक्री, पुरवठा आणि संशोधन या दृष्टीने क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत”.

Infosys Bharti 2022: Infosys, a leading IT company, will hire 55,000 new people. The company’s CEO Salil Parekh said this on Wednesday. Graduates of Engineering and Science will get job opportunities in this recruitment.

“Infosys has set a target of 20 per cent growth in annual revenue in FY2022. That is why new people will be given the opportunity to join the company. Infosys focuses more on employee skills. For this, the newly recruited candidates are given training for six to 12 weeks.

Infosys Jobs in Pune

  • देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना नोकरीची संधी मिळणार आहे.
  •  आयटी उद्योग लॉबी नॅसकॉमच्या वार्षिक NTLF कार्यक्रमाला सीईओ पारेख यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी या नोकरभरतीबाबत माहिती दिली. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2022 साठी 55 हजार नवीन लोकांना इन्फोसिसमध्ये संधी देण्यात येणार आहे. शिवाय वर्ष 2023 मध्ये यापेक्षा जास्त लोकांची भरती करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
  •  “इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच नवीन व्यक्तींना कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. इन्फोसिस कंपनी नोकरदारांच्या कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. त्यासाठी नवीन भरती झालेल्या उमेदवारांना सहा ते 12 आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहितीही पारेख यांनी दिली.
  •  “प्रशिक्षित म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांत स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी लागणार आहे. परंतु, तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने तरुण पदवीधरांनी दर तीन ते पाच वर्षांनी स्वत:च्या कलागुणांना वाव देत नवीन कौशल्य प्राप्त केले पाहिजे. इन्फोसिसला भविष्यात वाढीसाठी खूप चांगली संधी आहे. याबरोबरच भविष्यातील कामांसाठी कुशल कर्मचार्‍यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  •  “ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हाती घेऊन काम केल्यामुळे कंपनी विक्रेत्यांसह आणि इतर भागधारकांसोबत काम करण्यास तयार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्लाउड, खासगी क्लाउड आणि प्लॅटफॉर्मला सेवा कार्य म्हणून एकत्रित करू शकते,” असे सीईओ पारेख म्हणाले.

As per the latest news Nilanjan Roy, Chief Financial Officer, Infosys, a leading IT company, said that Infosys is focusing on promoting talent and skills in the country. The company is also looking to increase investment to make it even better. As part of this, the company will recruit 55,000 or more under the Global Hiring Program.

कोरोना संकट काळात माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या यशस्वी घोडदौड करताना पाहायला मिळत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता आघाडीची IT कंपनी असलेल्या Infosys नेही ५५ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे.

  •  IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या  इन्फोसिस  कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर  इन्फोसिस  भर देत आहे.
  • तसेच याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे.
  •  Infosys कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसंबर २०२० मध्ये इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ होती. ती वाढून डिसेंबर २०२१ मध्ये २ लाख ९२ हजार ०६७ इतकी झाली आहे.
  • यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे. Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे
  •  दरम्यान, TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा कमावला. कर्मचारी संख्येबाबत बोलायचे झाले तर, TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे. तसेच Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत.

Infosys Bharti 2023– Infosys offers great internship opportunities. As part of the Springboard initiative launched by the company, an Infosys internship is being organized for Indian students who have just passed 12th standard. (Infosys Career 2022) The Infosys Springboard Internship Program is a great learning opportunity for students or learners who are looking to develop their existing skills and prepare to become global corporate professionals.

Infosys Internship-देशात सध्या IT कंपन्या आणि IT क्षेत्रातील नोकऱ्यांची  चर्चा आहे. IT क्षेत्रात हजारो नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बारावी उत्तीर्णांसाठी  नामांकित IT कंपनी Infosys नं इंटर्नशिपची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने सुरू केलेल्या स्प्रिंगबोर्ड उपक्रमाचा भाग म्हणून नुकतेच १२वी उत्तीर्ण झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस इंटर्नशिप आयोजित केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप प्रोग्राम हे विद्यार्थी किंवा शिकणार्‍यांसाठी शिकण्याची एक उत्तम संधी आहे जे त्यांच्या सध्याच्या कौशल्यांचा विकास करू पाहत आहेत आणि जागतिक कॉर्पोरेट व्यावसायिकांसारखे बनण्याची तयारी करत आहेत. ही इंटर्नशिप जमशेदपूर इथे असणार आहे.

Infosys Springboard internship Program-विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकलेले सैद्धांतिक ज्ञान व्यावहारिक कार्यात कसे लागू करावे याबद्दल इन्फोसिस तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. इन्फोसिस इंटर्नशिप कार्यक्रम  आयोजित केला जात आहे आणि हा कंपनीचा CSR उपक्रम असल्याने, विद्यार्थ्यांना कोणतेही स्टायपेंड दिले जाणार नाहीये.

विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 8 ते 12 आठवड्यांची ही इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमात मर्यादित जागा आहेत, त्यामुळे परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे कंपनी उमेदवारांची निवड करू शकते.

इंटर्नशिपसाठी ही पात्रता आवश्यक- Eligibility Criteria For Infosys Bharti 2022

  • अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष आणि पदवी किंवा पूर्ण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदारांना प्रकल्पाच्या विषयासाठी सुचविलेले सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि अभ्यासक्रमांच्या स्वयं-मूल्यांकन परीक्षांमध्ये 60 टक्के मिळवणे देखील आवश्यक आहे.
  • अर्जदारांना एक सर्व्हे फीडबॅक देखील सबमिट करणे आवश्यक आहे जे त्यांनी अर्ज बटणावर क्लिक केल्यावर सक्रिय होईल.

इन्फोसिस इंटर्नशिपसाठी असा करा अर्ज-How to apply for Infosys Springboard internship Program

  • ज्यांना अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.. इन्फोसिस इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम स्प्रिंगबोर्ड वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • इच्छुक सहभागींना 14 जानेवारी 2021 पूर्वी वेबसाइटवर दिलेल्या प्रोजेक्ट्सच्या सूचीमधून एक प्रोजेक्ट निवडावा लागेल.
  • सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांद्वारे घेतलेल्या कोणत्याही मुलाखतीसाठी देखील तयार असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांनाप्रोजेक्ट्सचे वाटप केले जाईल

Infosys Skill Development Program

The Department of Higher and Technical Education has entered into a Memorandum of Understanding (MoU) with Infosys to ensure that college students in the state receive skills-based education along with regular education and that new skills-based technical education be used by students for employment. Higher and Technical Education Minister Samant said that for the first time in the country, Infosys is cooperating for the benefit of students in Maharashtra. This will benefit about 40 lakh students and one lakh professors and non-teaching staff

राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातपारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण  आणि प्रशिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्यआधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठीउपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत (Infosys company agreement) सामंजस्य करार केला आहे, यासाठीची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत बोलत होते

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (सी एस आर) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत.

पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

3 हजार 900 अभ्यासक्रम

या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे. त्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या मंचावर उपलब्ध असलेले 3 हजार 900 पेक्षा अधिक कोर्सेस अभ्यासासाठी उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील प्राप्त होईल. तसेच इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिट्युटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही सामंत यावेळी सांगितले.

या दोन महाविद्यालयांची निवड

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी आणि शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थांसाठी खास करून तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधासोबतच प्रोजेक्ट इंटनशिप बद्दलची सुविधा आणि एलएमएसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. प्रोजेक्ट इंटर्नशिप आणि व्यवसायिक कौशल्य वाढविणाऱ्या कोर्सेसमुळे या दोन्ही संस्थांतील विद्यार्थी रोजगारक्षम होण्यास मदत होईल.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये

या मंचावरील कृती प्रवण अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या कोर्सेसची विद्यार्थ्यांना मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस, प्रकल्प व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्ये प्राप्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील. उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सर्व कोर्सेस वापरता येतील. उपक्रमाअंतर्गत डिजीटल किंवा आभासी पद्धतीच्या वर्ग खोल्या तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करु शकतील. तसेच याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

स्प्रिंगबोर्ड मंचावर उपलब्ध कोर्सेस विद्यार्थ्याकरिता वैकल्पिक कोर्सेस म्हणून शिकविता येतील व त्यासाठी शिक्षक वर्ग त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संचालन करतील. महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था जे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण वर्ग राबविणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डिजीटल कंटेट तयार करणे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम तयार करणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याचे तंत्र इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देखील इन्फोसिस कंपनीच्या विषय तज्ञामार्फत दिले जाईल.


Infosys Recruitment for Freshers

Currently, the IT sector is booming in terms of jobs and careers. Many IT companies have benefited greatly from the non-stop work during the Corona era. So these companies are now ready to make more profit by increasing the number of employees in the company. But for this, the companies have decided to hire not only IT professionals but also Freshers, The company will hire about 45,000 freshers this year.

 Jobs In IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार! जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. दरम्यान, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) बुधवारी सांगितले की, या वर्षी कंपनीमध्ये जवळपास 45,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे.

Infosys Mega Recruitment 2021

  • इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.
  • इन्फोसिसचे सीओओ (UB) प्रवीण राव यांनी सांगितले की, “बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 पर्यंत घेऊन जाणार आहोत.
  • याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवणार आहोत, ज्यात हेल्थ आणि वेलनेसचे उपाय, रिस्किलिंग प्रोग्रॉम आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश आहे.”

Currently, the IT sector is booming in terms of jobs and careers. Many IT companies have benefited greatly from the non-stop work during the Corona era. So these companies are now ready to make more profit by increasing the number of employees in the company. But for this, the companies have decided to hire not only IT professionals but also facers. Against this backdrop, the now renowned IT company Infosys has decided to hire freshers for various positions

सध्या IT सेक्टर जॉब्स  आणि करिअरच्या  बाबतीत प्रचंड जोमात आहेत. अनेक IT कंपन्यांना  कोरोनाच्या काळातहे काम बंद न पडल्यानं मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपन्या आता कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आणखी नफा कमवण्याच्या तयारीत आहेत. मात्र यासाठी कंपन्यांनी फक्त IT प्रोफेशनल्सच नाहीत तर फेसर्सनाही नोकरी देण्याचं ठरवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नामंकित IT कंपनी Infosys नं  विविध पदांसाठी फ्रेशर्सना नोकरी देण्याचं नक्की केलं आहे. याच काही जॉब्सबद्दल  आम्ही आज सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Infosys मध्ये Process Executive या पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 2021, 2020, 2019 बॅचच्या फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे. B.Com, किंवा  B.E पर्यँतशिक्षण झालेल्या आणि IT क्षेत्रातील काही ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवारांकडे काही विशेष गुण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उत्तम कम्युनिकेशन स्किलसह उत्तम लिखाणही करता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी tech-savvy असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

System Engineer

Process Executive नंतर Infosys मध्ये System Engineer पदाच्या काही जागांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. पदवीधर फ्रेशर्ससाठी हा जॉब असणार आहे. Bachelor Of Computer Science किंवा Bachelor of Engineering आणि IT क्षेत्राशी निगडित काही कोर्सेस केले असतील तर हा जॉब तुम्हाला मिळू शकणार  आहे. तसंच या जॉबसाठी Coimbatore हे लोकेशन राहणार आहे. या मध्ये उमेदवारांना कॉल्स, मेल्स यांना मॉनिटर करत राहावं लागणार आहे. तसंच Linux, Automation, E-Commerce यामध्ये उमेदवारांना काम असणार आहे. Service desk Management, Network, Linux हे स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Technical Process Executive

Infosys मध्ये BPO डिपार्टमेंटला Technical Process Executive या पदासाठी नोकरीची भरती होणार आहे. कोणत्याही शाखेतून BE ची पदवी पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरी असणार आहे. यासाठी उमेदवारांकडे कस्टमर सर्व्हिसचे गुण असणं आवश्यक आहे. तसंच कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी उमेदवारांकडे Analytical स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.


Jobs in IT Company

Infosys Recruitment for IT Professionals

Infosys, the country’s largest IT company, is set to have a major overhaul in the near future. IT professionals will have a great opportunity to work in this company. Currently, Infosys is hiring candidates for a number of job profiles, including RPA Developer / Consultant. Other vacancies that Infosys is recruiting for include Principal Architect, Specialist Programmer – Java Micro Services, Technology Analyst – Dead Stack, Technology Lead – React JS, Consultant Specialist Programmer – BigData and Azure Developers

देशातील दिग्गज IT कंपनी Infosys मध्ये येत्या काही काळात मोठी पदभरती  होणार आहे. IT प्रोफेशनल्सना  या कंपनीत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. देशात कोरोनामुळे इतर कंपन्या जरी नुकसान सहन करत असतील तरी IT क्षेत्राला (IT sector jobs) मात्र उधाण आलं आहे.  देशातील अनेक IT कंपन्यांना या काळात बराच फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचनुसार आता इन्फोसिस नं पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या, इन्फोसिस RPA डेव्हलपर/कन्सल्टंटसह अनेक जॉब प्रोफाइलसाठी उमेदवार नियुक्त करत आहे. इन्फोसिस ज्या इतर रिक्त पदांसाठी भरती करत आहे त्यामध्ये प्रिन्सिपल आर्किटेक्ट, स्पेशॅलिस्ट प्रोग्रामर -जावा मायक्रो सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट – मर्न स्टॅक, टेक्नॉलॉजी लीड – रिएक्ट जेएस, कन्सल्टंट स्पेशालिस्ट प्रोग्रामर -बिगडेटा आणि अझूर डेव्हलपर्स यांचा समावेश आहे.

 Jobs In IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

प्रत्येक कारकीर्द हा एक प्रवास आहे आणि म्हणूनच इन्फोसिसमध्ये  उमेदवारांना त्यांच्या कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी योग्य संधी आणि पाठिंबा मिळतो तसंच पुढील यशासाठी संधी मिळते असं Infosys नं आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हंटलं आहे.

कंपनीने अलीकडेच भारतातील 19,230 पदवीधर आणि देशाबाहेर 1,941 पदवीधरांची नियुक्ती करून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे असं Infosys चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी असं जूनमध्ये सांगितलं होतं

या लोकेशन्ससाठी असणार भरती

इन्फोसिस सध्या भारतभरातील अनेक भरती करत आहे. बेंगळुरू, कोईमतूर, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर आणि मुंबई या काही महत्त्वाच्या ठिकाणी सध्या Infosys ची भरती सुरु आहे. इतरही काही लोकेशन्सवर इन्फोसिस येणाऱ्या काही काळामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे.


 Jobs In IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

Infosys, a leading IT company, will hire 35,000 graduate students. This information has been given by the Chief Operating Officer of Infosys, Pravin Rao. These appointments will take place as the demand for digital talent increases. They have implemented a variety of activities for employees. “They have implemented a number of initiatives such as Employee Engagement Initiative, Career Acceleration Opportunities, Compensation Reviews and Development Interventions,”

IT क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती!

Quest Global कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती

यंदाचं आर्थिक वर्ष 2022 मध्ये इन्फोसिस ही आघाडीची आयटी कंपनी 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार आहे. याबाबतची माहिती इन्फोसिसचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर प्रविण राव यांनी दिली आहे. मार्च तिमाहीमध्ये इन्फोसिसची कर्मचारी संख्या 2.59 लाख होती. तर जून अखेरिच्या तिमाहीमध्ये इन्फोसिसची कर्मचारी संख्या 2.67 लाख आहे. नवनवीन टॅलेंटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे आम्ही या वाढत्या मागणीला पूर्ण करण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे आम्ही या 2022 च्या आर्थिक वर्षांत जगभरातून 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

 Jobs in IT Company खूशखबर! पाच आयटी कंपन्या करणार भरती

डीजीटल प्रतिभेच्या मागणीमध्ये वाढ झाली असल्यामुळे या नियुक्त्या होणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये एम्प्लॉयी एंगेजमेट इनिशिएटीव्ह, करीअर एक्सलरेशन अपॉरच्यूनिटीज, कॉम्पेसेशन रिव्ह्यूज् आणि डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन्स असे अनेक उपक्रम आम्ही राबवल्या असल्याचं राव यांनी म्हटलंय

Good News: TCS करणार 40 हजार फ्रेशर्स भरती

इन्फोसिसची प्रतिस्पर्धी आयटी कंपनी TCS ने यावर्षी 40 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. TCS चे पाच लाखांच्या वर कर्मचारी आहेत. त्यांनी मागील वर्षी जवळपास 40 हजार पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती केली होती.


TCS and Infosys, two of India’s leading companies, have plans for mega-recruitment even during the lockdown. Of these, Tata Consultancy Services (TCS) will start recruiting for over 40,000 posts. Infosys, India’s second largest IT company, will employ 26,000 freshmen on campus in the 2021-22 financial year.

 खूशखबर! आयटी कंपन्यांमध्ये 1 लाखाहून अधिक फ्रेशर्सना संधी

भारतातील TCS आणि Infosys या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मध्ये तब्बल 40 हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती.

TCS Recruitment 2021

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत TCS ला जबरदस्त नफा झाला होता. आगामी काळासाठीही कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाली आहेत. त्यासाठी TCS कडून 40 हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

Jobs in Infosys

भारताची दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिलीय. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे Infosys कडून सांगण्यात आले.


IT jobs will increase in 2021, which will require more than 44 lakh professions. About 95 per cent of CEOs in this IT sector predict that recruitment will be better in 2021 than last year. So, more than 67% of CEOs and CEOs believe that fiscal year 2021 will perform better than 2020.

आयटी सेक्टरमध्ये 44 लाख प्रोफेशनल्सची भासणार आवश्यकता

मुंबई 2021 मध्ये आयटी क्षेत्रातील नोकर्‍या वाढणार असून यामध्ये सुमारे 44 लाखाहून अधिक प्रोफेशन्सची आवश्यकता भासणार आहे, असे नॅसकॉमच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.

या आयटी क्षेत्रातील 95 टक्के सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंदाज आहे की मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये भरती अधिक चांगल्या प्रकारे होईल. तर, 67% हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सीईओ यांना असा विश्वास आहे की, वित्तीय वर्ष 2021 हे 2020 पेक्षा अधिक प्रकारे कामगिरी बजावेल.

नॅसकॉमने वित्तीय सेवा वर्ष 2020-21 (वित्तीय वर्ष 21) मध्ये माहिती सेवा क्षेत्राच्या 2.3% वाढीचा अंदाज लावला आहे. अंदाज असा आहे की, आयटी कंपन्यांचे उत्पन्न 2020 मधील 190 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत आर्थिक वर्षात 194 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. आघाडीच्या भारतीय आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या उत्तरार्धात विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली.

ही वाढ डिजिटल वर्षात आणि साथीच्या वर्षात कंपन्यांद्वारे तंत्रज्ञानाच्या वेगाने स्वीकारल्यामुळे झाली आहे. आयटी उद्योग संस्थेने आपल्या सामरिक पुनरावलोकन 2021 मध्ये म्हटले आहे की ’न्यू वर्ल्ड: द फ्यूचर इज व्हर्च्युअल’ ने आयटी क्षेत्राच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि डिजिटल अभ्याासनुसार नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात योगदान दिले. आयटी उद्योगाच्या उत्पन्नात डिजिटल खर्चाने 28-30% योगदान दिले.

कोविड -19मुळे वर्षभर व्यत्यय आला असूनही, राष्ट्रीय जीडीपीमध्ये जवळजवळ 8% योगदान दिले. एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या सेवा निर्यातीत 52% सापेक्ष वाटा होता. आयटीमधील महसूल वाढ प्रामुख्याने ई-कॉमर्सने झाली आहे. 4.8 टक्क्यांनी वाढून 57 बिलियन डॉलर झाली आहे. त्यानंतर हार्डवेअर विभागात 4.1 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे महसूल 16 अब्ज डॉलर्सने वाढला आहे.

आयटी कंपन्यांना अधिक मनुष्यबळाची गरज होती. इतर क्षेत्रांतील बर्‍याच कंपन्याही कर्मचार्‍यांनाही यात घेतलं आहे. या क्षेत्राकडून आर्थिक वर्ष 21 मध्ये 138,000 नवीन कर्मचारी कामावर असतील. आर्थिक वर्षाच्या अखेरीस या उद्योगात 4.47 दशलक्ष रोजगार उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविला आहे.

पोलिसनामा


IT Company Bharti 2021: India’s four leading IT companies TCS, Infosys, HCL Technologies and Wipro collectively plan to employ 91,000 candidates from the campus for the next financial year.

भारताच्या चार प्रमुख आयटी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि विप्रोने सामुहिकपणे पुढील आर्थिक वर्षासाठी कॅम्पसमधून 91,000 उमेदवारांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे. कारण लॉकडाऊन कमी झाल्यानंतर मागणीत तेजी आली आहे.

टीसीएसचे कार्यकारी व्हीपी आणि जागतिक एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी म्हटले होते की, कंपनीला आशा आहे की, पुढील वर्षी सुद्धा तेवढ्याच फ्रेशर्सला कामावर ठेवले जाईल, जेवढे यावर्षी (जवळपास 40,000) होते. इन्फोसिसने म्हटले की, ते पुढील आर्थिक वर्षात भारतात 24,000 कॉलेज पदवीधरांनी नियुक्त करतील, जे 15,000 पासून चालू आर्थिक वर्षासाठी योजनाबद्ध होते.

नोकरीची सुवर्णसंधी! HCL मध्ये मेगा भरती ; 20 हजार जणांना नोकरी देणार

एचसीएल टेक्नॉलॉजीसचे प्रमुख एचआर अधिकारी अप्पाराव व्हीव्ही यांनी म्हटले की, कामाचा वेग वाढण्याची अनेक कारणे आहेत. आम्ही जे लक्ष्य ठेवले होते, त्यापेक्षा 33% जास्त करत आहोत आणि आम्ही क्यू3 आणि क्यू4 मध्ये तेजी पहात आहोत. जर ग्राहकांनी आपली व्यस्तता वाढवली, तर त्यांना तिथेच जावे लागेल जिथे कौशल्य आहे. मागील वर्षी आमच्या मॅन पॉवरमध्धये 70% वाढ भारतात आणि 30% भारताच्या बाहेर होती. यावर्षी ही जवळपास 90%-10% असेल. आम्ही भारतात विशाल रँप-अप पहात आहोत.

अमेरिकेची मोठी कंपनी भारतामध्ये 20000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी, मिळणार ‘इतके’ लाख रूपये ‘सॅलरी

एचसीएलने 31 मार्च, 2022 ला समाप्त होणार्‍या आर्थिक वर्षात भारतात 15,000 फ्रेशर्स आणि 1,500-2,000 लोकांना नोकरीवर ठेवण्याची योजना बनवली आहे. सक्सेना फायनान्शियल ग्रुप (एसएफजी) च्या जेम्स फ्रीडमॅन यांनी उल्लेख केला आहे की, मागणी सामान्यपणे मूलभूत पायाशी संबंधित आहे. त्यांनी म्हटले की, जिथे मोठे सौदे होतात, तिथे भारताचा माईंडशेयर पुन्हा एकदा वाढत आहे.

इन्फोसिसने जर्मन ऑटोमोटिव्ह प्रमुख डेमलरशी इतिहासातील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा जिंकला आहे. सूत्रांनी सांगितले की, याचा अंदाज 3.2 बिलियन डॉलर आहे. टीसीएसने प्रूडेंशियल फायनान्शियलशी एक मोठा सौदा जिंकला. तर विप्रोने जर्मन रिटेलर मेट्रोसोबत एक मोठा करार केला.

सोर्स: पोलीसनामा


IT Jobs 2019 Mega Recruitment

Due to change in technology, from this year so many year traditional jobs will be available. It is expected that in new year near about 10 lakh new job opportunities will be available. But increment in the salary will be same as last year. Mean is some fields employment will be more but in information technology filed there will be many job opportunities will be available.

In this upcoming new year, first six months of the new year may provide better employment opportunities. As election for 2019 will be conduct this year, so now it is expected soon the recruitment to the maga job opportunities will be available to get.

IT Jobs 2019 Mega Recruitment

Raid-stand India is an human recurse service organization’s head Paul Dyupuis is said that after two years IT filed will provide so many job opportunities. Many companies will start their recruitment process from future planning. Due hugh market is going to start from e- commerce it will produce better job opportunities.

मेगाभरती-72,000 जागा- अद्यावत माहिती


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
12 Comments
  1. Abhishek says

    give mi a opportunity for our company

  2. Ashish Khorate says
  3. Vaishnavi Sanjay Bhatkar says

    Interested in Infosys company

  4. Vishal Sarwade says

    I am interested in infosays company

  5. Simran ikhar says

    Need a job also

  6. Machhindra Chavan says

    i also want to join your company

  7. Ashwin says

    Need a job

  8. Jyoti mane says

    Job

  9. Priyanka Mahendra Jagtap says

    I have an interested in Infosys company

  10. Sujata jadhav says

    Plz give me opportunity of our organization

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!