निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजार जणांना पुन्हा कामावर घेणार, कारण काय? – Railways Bharti 2024

RRB Recruitment 2024 Apply Notification, Exam Date & More

RRB Recruitment 2024

For the past few days, there has been a shortage of staff in the Indian Railways. To overcome this shortage, the railway department has now decided to hire retired employees once again. The railway department is reportedly rehiring around 25,000 retired employees. However, some conditions have also been imposed. The railways will rehire only eligible employees. In the last few days, there has been a shortage of staff. The workload on existing employees is increasing. There have also been incidents of accidents in some places. In view of this, the Railways has taken this decision to address the shortage of staff. The entire responsibility of the recruitment process has been given to the zone heads.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In this recruitment process, all the posts from truckman to supervisor posts will be filled. Employees who are under the age of 65. Also, employees against whom disciplinary action has not been taken in the five years prior to retirement will get an opportunity to work again. Railway officials said these employees will be hired for two to five years.

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजार जणांना पुन्हा कामावर घेणार, कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमी दूर करण्यासाठी आता रेल्वे विभागाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभाग जवळपास २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, यासाठी काही अटी शर्तीदेखील लागू करण्यात आल्या आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे पात्र कर्मचाऱ्यांनाच पुन्हा कामावर घेणार आहे. गेल्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांची कमी जाणवू लागली आहे. विद्यमान कर्माचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या भरतीप्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी झोन प्रमुखांकडे देण्यात आली आहे.
  • या भरती प्रक्रियेत ट्रकमॅनपासून ते सुपवाझर पदांपर्यंत अशी सर्वच पदं भरली जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांविरोधात निवृत्त होण्याच्या आधीच्या पाच वर्षांत अनुशासनात्मक कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना २ ते ५ वर्षांपर्यंत कामावर घेतलं जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
  • रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्चमाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेला शेवटचा पगार वेतन म्हणून दिला जाणार आहे. तसेच प्रवास खर्च आणि इतर भत्तेही दिले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिले जाते, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून निवृत्त वेतनाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वेतन म्हणून दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणतीही पगारवाढ दिली जाणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

As per the latest updates of Railway Recruitment Board More than 1.5 lakh of the nearly 10 lakh sanctioned posts under the safety category are lying vacant in the Indian Railways, the Railway Ministry said in March in response to an RTI application. Though the vacancies are vacant, the safety of the railways is being given top priority and the railways has made huge investments in this regard in the last 10 years, officials said. Safety category posts include loco pilot, loco inspector, track maintainer, station masters, pointsman, electric signal maintainer and signaling supervisor. The total number of sanctioned, working and vacant posts in the safety category of the Railways is 10,941, 8,48,207 and 1,52,734 respectively. For further updates Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय रेल्वेत सुरक्षा श्रेणी अंतर्गतच्या सुमारे १० लाख मंजूर पदांपैकी दीड लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने मार्चमध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गतच्या अर्जाला उत्तर देताना सांगितले आहे. रिक्त पदे रिक्त असली तरी रेल्वेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, रेल्वेने गेल्या १० वर्षात यासंदर्भात मोठी गुंतवणूक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा श्रेणीच्या पदांमध्ये लोको पायलट, लोको इन्स्पेक्टर, ट्रॅक मेंटेनर, स्टेशन मास्टर्स, पॉइंट्समन, इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर आणि सिग्नलिंग सुपरवायझर यांचा समावेश होतो. रेल्वेच्या सुरक्षा श्रेणीतील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची एकूण संख्या अनुक्रमे १० लाख ९४१, ८ लाख ४८ हजार २०७ आणि १ लाख ५२ हजार ७३४ अशी आहेत.

RRB ALP Recruitment-कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी? जाणून घ्या


Railways Bharti 2024 – It was asked how many new employees were recruited by the Railways in the last five years. He also questioned whether the Railways has decided to cut its manpower in the coming days.  What is the unemployment in the country? The one who is getting up is trying for a government job. Millions of people are unemployed. Meanwhile, the Railways had recently released recruitment for 1.39 lakh posts. Applications were received from 2.37 crore candidates. As a result, the Railways has had to face a big challenge of testing so many candidates and selecting them from them.

In the last five years and in the current year, 302550 candidates were selected for various group C posts. Mp M V Satyanarayana had asked the railway minister about this. It was asked how many new employees were recruited by the Railways in the last five years. He also questioned whether the Railways has decided to cut its manpower in the coming days.

Railway Minister Ashwini Vaishnaw said that the vacancy and filling up of posts is a continuous process considering the importance of expansion and expansion of Indian Railways. These recruitments are made. Recently, two exams were conducted to fill 1.39 lakh posts. The minister said 2.37 crore candidates had appeared for the polls.

The Railway Minister told the House that there is a need to constantly review the number of sanctioned posts in human resource planning keeping in mind the introduction of new technology, methodology, creation of new assets etc.

रेल्वेने काढलेली 1.39 लाख जागांवर भरती, 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले; मंत्र्यांची माहिती

  • गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता.  देशात बेरोजगारी कितीय? जो तो उठतोय तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतोय. करोडो लोक बेरोजगार आहेत. अशातच रेल्वेने १.३९ लाख जागांसाठी नुकतीच भरती काढली होती. यासाठी २.३७ कोटी उमेदवारांचे अर्ज आले होते. यामुळे एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्याचे आणि त्यातून त्यांची निवड करण्याचे मोठे आव्हान रेल्वेला पेलावे लागले आहे.
  • गेल्या पाच वर्षांत आणि चालू वर्षात ३०२५५० उमेदवारांची विविध गटातील ग पदांसाठी निवड करण्यात आली. खासदार एम व्ही सत्यनारायण यांनी रेल्वे मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता.
  • यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे प्रस्थ आणि विस्ताराचे महत्व पाहता पदे रिक्त होणे आणि ती भरली जाणे ही एक सततची प्रक्रिया आहे. या भरती केल्या जातात. नुकतीच 1.39 लाख पदे भरण्यासाठी दोन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी २.३७ कोटी उमेदवार आले होते, असे मंत्र्यांनी सांगितले.
  • नवीन तंत्रज्ञानाचा परिचय, कार्यप्रणाली, नवीन मालमत्तेची निर्मिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मनुष्यबळ नियोजनातील मंजूर पदांच्या संख्येचा सातत्याने आढावा घेण्याची गरज आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

Read the Railway Mega Bharti updates here – According to data released by the Ministry of Railways in Parliament on August 7, Indian Railways has more than 2.50 lakh vacancies till July 1, 2023. Most of these vacancies belong to ‘Group C’ jobs. These include Station Masters, Technicians and Junior Engineers. According to a reply submitted by Union Railway Minister Ashwini Vaishnav in response to a question raised by Bharatiya Janata Party MLA Sushil Kumar Modi, there are a total of 2,48,895 vacancies in Group C posts across all zones. A total of 2,070 posts are vacant in Group ‘A’ and ‘B’. Of this, the North region has the highest number of vacancies with 32,468 posts, followed by East region with 29,869, West region with 25,597 and Central region with 25,281. For further updates Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय रेल्वेमध्ये 2.5 लाखांहून अधिक पदे रिक्त; सर्वाधिक उत्तर विभागात

संसदेत 7 ऑगस्ट रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये 1 जुलै 2023 पर्यंत 2.50 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. यातील बहुतेक रिक्त पदे ‘गट सी’ नोकऱ्यांशी संबंधित आहेत. यामध्ये स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश होतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुशील कुमार मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेल्या उत्तरानुसार, सर्व झोनमध्ये गट सी पदांवर एकूण 2,48,895 जागा रिक्त आहेत. गट ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये एकूण 2,070 पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर विभागात सर्वाधिक 32,468 पदे रिक्त आहेत, तर पूर्व विभागात 29,869, पश्चिम विभागात 25,597 आणि मध्य विभागात 25,281 पदे रिक्त आहेत. मंत्री अश्विनी वैष्णव असेही सांगितले की, 30 जून 2023 पर्यंतच्या अधिसूचनेनुसार एकूण 1,28,349 उमेदवार गट सी पदांसाठी (लेव्हल-1 वगळून) निवडले गेले आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • वैष्णव पुढे म्हणाले की भारतीय रेल्वेवरील गट अ सेवांमध्ये थेट भरती मुख्यतः केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे केली जाते. ‘यूपीएससी आणि डीओपीटी (कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग) यांना इंडेंट देण्यात आले आहेत.’ असेही ते म्हणाले. 1 डिसेंबर 2022 रोजी देशभरात रिक्त असलेल्या 3.12 लाख अराजपत्रित पदांमध्ये सर्वात जास्त रेल्वेच्या एकूण रिक्त जागा 2.5 लाख आहेत. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत देशातील सर्वात मोठे नियोक्ता मानल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते.
  • रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. 2019 मध्ये रिक्त पदे भरण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. रेल्वेने मार्च 2019 मध्ये रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. वैष्णव यांनी नमूद केले की रेल्वे ही एक मोठी संस्था आहे आणि रिक्त पदे भरणे आणि ती घडणे ही निरंतर प्रक्रिया आहे. रिक्‍तपदे प्रामुख्याने कार्यरत गरजांनुसार भर्ती एजन्सींसह रेल्वेद्वारे इंडेंट्सद्वारे भरली जातात.

Railway Recruitment 2023 updates regarding mega bharti – Railways had launched a mega recruitment drive in 2019 and currently the process of hiring the selected candidates is underway. The Railway Board has directed all its zones to launch a “special drive” to fill up vacancies for promotion in the security category. Under which large scale recruitment will be done. It is expected to recruit for one lakh posts under this. The Railway Recruitment Directive states that all methods like Select/Non-Select/Trade Test/LDCE (Limited Departmental Competitive Examination)/GDCE (General Departmental Competitive Examination) are used so that the vacancies are filled in time. For further updates Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तयारीला लागा; रेल्वेत लवकरच बंपर भरती; ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचालींना वेग

रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्तीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या ओव्हर टाइमचा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत वेगवेगान हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना अंतरिम आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, मंडळाने वेळोवेळी पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्याच्या आवश्यकतेवर भर देत या सूचना जारी केल्या आहेत. विभागीय रेल्वेने त्यातील रिक्त पदांचा तपशील तयार करावा आणि त्यावरील भरतीसाठी योजना तयार करावी. यासाठी झोन ​​विशेष मोहीम राबवू शकतात.
  2. रेल्वेकडून रिक्त पदांची अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. डिसेंबर 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागात एकूण 14,815 आणि वाहतूक परिवहन विभागात 62,264 पदे रिक्त आहेत. त्यांच्या उत्तरानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त जागा होत्या. ज्यात देशभरात 87,654 रिक्त जागा होत्या. त्यानंतर यांत्रिक विभागात 64,346 आणि इलेक्ट्रिकल विभागात 38,096 रिक्त जागा होत्या.
  3. रेल्वेने 2019 मध्ये एक मेगा भरती मोहीम सुरू केली होती आणि सध्या निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व झोनना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी “विशेष मोहीम” सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे.
  4. या अंतर्गत एक लाख पदांसाठी भरती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे भरतीच्या निर्देशात म्हटले आहे की, निवड/नॉन-सिलेक्ट/ट्रेड टेस्ट/एलडीसीई (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा)/जीडीसीई (सामान्य विभागीय स्पर्धात्मक परीक्षा) सारख्या सर्व पद्धतींचा वापर केला जातो, जेणेकरून रिक्त जागा वेळेत भरल्या जातील.

Latest updates published in the news paper is that there are 2.8 lakh posts of Group C and Group D will be recruited by the Board soon. There is a good news for the youth who are looking for jobs in Indian Railways (RRB). After releasing the notification by RRB, candidates can apply by visiting the official website. The application process will be given on the official website. Earlier, Railway Minister Ashwini Vaishnav had said in reply to a question by MP Pramod Tiwari in the Rajya Sabha that the board would soon recruit for 2.8 lakh posts. The board is preparing for that. For further updates Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती; तरुणांना मोठ्या प्रमाणावर मिळणार रोजगार

भारतीय रेल्वे (RRB) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मंडळाकडून गट क आणि गट ड च्या २.८ लाख पदांवर लवकरच भरती केली जाईल. अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.  यापूर्वी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की बोर्डाकडून २.८ लाख पदांसाठी लवकरच भरती केली जाईल. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Railways Bharti 2023 Details

  • रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व २१ आरआरबींकडून रिक्त पदांची मागणी केली आहे. २०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये, गट ड आणि गट क संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती केली जाईल. त्याची तयारी सुरू आहे.
  • मध्य रेल्वे यावर्षी २ लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे, ज्यामध्ये गट C आणि D पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम विभाग वगळता प्रत्येक झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त असतील.
  • याशिवाय मंडळ लवकरच अ आणि ब गटातील पदांसाठी भरती सुरू करणार आहे. ही भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०२० पासून ग्रुप-ए आणि बी पदांची भरती झालेली नाही. मात्र, या दोन्ही भरतीच्या अधिसूचनेबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
  • एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात भरतीची अधिसूचना निघू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी रेल्वेकडून ग्रुप डीच्या १ लाखाहून अधिक पदांवर भरती करण्यात आली होती.

Indian Railway Bharti 2023: As per the latest news, Minister Nirmala Sitharaman has announced that 75000 new employees will be recruited in Indian Railways. As per the Union Budget Indian Railway is now going to become even more superfast. Because now 2.4 lakh crore rupees will be given for Indian Railways. Many comforting announcements have been made in this budget. Read More details are given below.

भारीत्य रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे.  तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.  

Indian Railway Recruitment 2023

 नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी 
भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.

As per the latest updates about RRB Recruitment 2023 – Although the Ministry of Railways claims that it is working hard to fill up the vacancies, according to the statistics of December 1, 2022, it is clear that there are more than three lakh vacancies in the railways. Vacancies in gazetted and non-gazetted categories are included in various departments of railways including security and transport departments. According to railway department the number of vacancies is 3.11 lakh.




रेल्वेत तब्बल 3 लाख जागांचे रिक्त पदे

रिक्त पदे भरण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असले तरी १ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार रेल्वेत तीन लाखांहून अधिक रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा आणि वाहतूक विभागांसह रेल्वेच्या विविध विभागात राजपत्रित आणि अराजपत्रित श्रेणींमध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे. भरतीसाठी निश्चित कालमर्यादाही नाही ही रिक्त पदे कधी भरता येतील याबाबत रेल्वेने कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. विशेष म्हणजे, रेल्वेने गेल्या पाच वर्षांत १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली. मात्र, या कालावधीत यापैकी एकाही शिकाऊ उमेदवाराला कायम करण्यात आलेले नाही. रेल्वे अप्रेंटिसशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

  1. कर्मचारी कपातीची मानसिकताकर्मचाऱ्यांना बदललेल्या वातावरणात प्रशिक्षित करणे आणि स्वत:ला पुन्हा दिशा देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकार कमी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
  2. तीन सदस्यीय टास्क फोर्स नोकरशाहीमध्ये पंतप्रधानांच्या ‘कर्मयोगी’ संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांनी इन्फोसिसचे माजी सीईओ एस. डी. शिबू लाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
  3. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेतील तीन लाखांसह केंद्र सरकारमध्ये १० लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तेही भरून काढण्याची सरकारला घाई नाही हेच यावरून दिसते.

RRB Recruitment 2023 Vacancy details

एकूण रिक्त पदेविभाग पदसंख्या

  1. अकाऊंट १२४५५
  2. प्रशासन ४२२७
  3. सिव्हिल ८७६५४
  4. इलेक्ट्रिकल ३८०९६
  5. मेकॅनिकल ६४३४६
  6. मेडिकल ५१९३
  7. पर्सोनेल ३९४४
  8. सिक्युरिटी ९०६८
  9. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन १४८१५
  10. स्टोअर ८८८१
  11. ट्रॅफिक ट्रान्स्पोर्टेशन ६२२६४
  12. अन्य ५७८
  13. एकूण ३११५२१

Railway Bharti 2022

Ministry of Railways in consultation with UPSC i.e. Central Public Service Commission and Department of Personnel and Training has decided to recruit Indian Railway Management Service (IRMS) through Central Public Service Commission Specially Prepared Examination (IRMSE) from 2023.

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) रेल्वे मंत्रालयाने मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारी अंतर्गत आता UPSC ला रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षेचे आयोजन करावे लागेल, जी 2023 मध्ये घेतली जाईल. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस’ (IRMS) ची भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाईल. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) 2023 पासून ही भरती परीक्षा आयोजित करेल.
  • मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा परीक्षा (IRMSE) ही दोन टप्प्यांची परीक्षा असेल ज्यामध्ये प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पात्र उमेदवारांना परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच IRMS (मुख्य) लेखी परीक्षेत बसण्यासाठी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेत बसावे लागेल.

RRB Recruitment 2023 – असं असेल IRMSE चं पॅटर्न

  • आयआरएमएस (मुख्य) परीक्षेत सेट केलेल्या विषयामध्ये पारंपारिक निबंध प्रकारच्या प्रश्नांसह चार पेपर असतील. पहिल्या पेपरमध्ये दोन पात्रता पेपर असतील, जे 300-300 गुणांचे असतील. पेपर A उमेदवाराने निवडलेल्या भारतीय भाषेत असेल. तर, बी पेपर इंग्रजीमध्ये घेण्यात येईल. तेथे ऐच्छिक विषयाचे 250 गुणांचे दोन पेपर असतील. 100 गुणांची व्यक्तिमत्व चाचणीही घेतली जाईल.
  • स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि वाणिज्य आणि लेखा हे पर्यायी विषय आहेत. पात्रता पेपर आणि पर्यायी विषयांचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षा (CSE) सारखाच असेल. CSE आणि IRMS (मुख्य) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला दोन्ही परीक्षांसाठी वरीलपैकी कोणताही पर्यायी विषय निवडण्याचा पर्याय असेल. त्याला पर्यायी विषय स्वतंत्रपणे निवडण्याचा पर्यायही असेल.

RRB Recruitment 2023 Eligibility Criteria 

  1. पात्रता पेपर आणि वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम आणि लिपी सीएसई (मुख्य) सारखीच असेल. वयोमर्यादा आणि उमेदवाराला परीक्षेला बसण्याचा पर्याय CSE प्रमाणेच असेल. IRMSE परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता म्हणून अभियांत्रिकी, वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे.
  2. UPSC गुणवत्तेच्या क्रमाने चार विषयांनुसार अंतिम यादी तयार करेल आणि जाहीर करेल. CSE आणि IRMSE या दोन्हींसाठी प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेच्या फेऱ्या एकाच वेळी घेतल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की CSE सोबत IRMSE ला सूचित केले जाईल. UPSC च्या 2023 च्या परीक्षेच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, CSE (Prelims) अनुक्रमे 1 फेब्रुवारी रोजी अधिसूचित केले जाईल आणि परीक्षा 28 मे रोजी घेतली जाऊ शकते.





रेल्वे विभागात 35 हजार पदांची भरती; डेडलाईन जाहीर

India Railway Recruitment 2022: Good news for the aspirants working in Railways more than 35, 000 posts are going to be filled soon in many trades. Indian Railway Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे

  • या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.
  • रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.
  • आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

India Railway Recruitment 2022: Good news for the aspirants working in Railways more than 3000 posts are going to be filled soon in many trades. Recruitment has started for Apprentice Posts in Railways. Candidates must have passed 10th with minimum 50% marks from a recognized board. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Railway Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.

रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांसाठी आहे संधी

  • हावडा डिवीजन – 659 पद
  • लिलुआ ऑफिस- 612 पद
  • सियालदह डिवीजन – 440 पद
  • कांचरापाडा ऑफिस – 187 पद
  • मालदा डिवीजन – 138 पद
  • आसनसोल ऑफिस – 412 पद
  • जमालपुर ऑफिस – 667 पद

कोण करू शकतो अर्ज

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.

ओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.


Indian Railway Recruitment 2022: There are 2,65,547 vacancies in various sections of the railways. The Union Minister recently informed the House about the vacancies in the Gazetted and Non-Gazetted posts in the zone.RRB has started recruitment process for vacant posts in phases from 15th December 2020. In the last five years, the Railway Recruitment Board has recruited 1,89,790 people. Read More details as given below.

रेल्वेत तब्बल 2 लाख पदं रिक्त; कुठल्या झोनमध्ये किती आहेत जागा पाहा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी काल राज्यसभेत सांगितलं की, रेल्वेच्या विविध विभागांत 2,65,547 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 2,177 राजपत्रित आणि 2,63,370 अराजपत्रित पदं आहेत. माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवासदन (Dr. V. Shiva Sadana) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला नुकतीच दिली.

रेल्वे मंत्री म्हणाले, मध्य रेल्वेत 56 राजपत्रित (Gazetted) आणि 27177 अराजपत्रित (Non-Gazetted) पदे रिक्त आहेत. तर ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 87 राजपत्रित आणि 8477 अराजपत्रित पदे रिक्त आहेत. शिवाय, पूर्व मध्य रेल्वेत 170 राजपत्रित आणि 15268 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. पूर्व रेल्वेमध्ये 195 राजपत्रित आणि 28204 अराजपत्रित पदं, तर मेट्रो रेल्वेत 22 राजपत्रित आणि 856 अराजपत्रित पदं रिक्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

रिक्त जागांचा तपशील

  • उत्तर मध्य रेल्वे – 141 राजपत्रित, 19366 अराजपत्रित
  • ईशान्य रेल्वे – 62 राजपत्रित, 14231 अराजपत्रित
  • नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे – 112 राजपत्रित, 15677 अराजपत्रित
  • उत्तर रेल्वे – 115 राजपत्रित, 37436 अराजपत्रित
  • उत्तर पश्चिम रेल्वे – 100 राजपत्रित, 15049 अराजपत्रित
  • दक्षिण मध्य रेल्वे – 43 राजपत्रित, 16741 अराजपत्रित
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 88 राजपत्रित, 9422 अराजपत्रित
  • दक्षिण पूर्व रेल्वे – 137 राजपत्रित, 16847 अराजपत्रित
  • दक्षिण रेल्वे – 161 राजपत्रित, 19500 अराजपत्रित
  • दक्षिण पश्चिम रेल्वे – 65 राजपत्रित, 6525 अराजपत्रित
  • पश्चिम मध्य रेल्वे – 59 राजपत्रित, 11073 अराजपत्रित
  • पश्चिम रेल्वे – 172 राजपत्रित, 26227 अराजपत्रित

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, इतर युनिटमध्ये 507 राजपत्रित आणि 12760 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. ती पदं निर्माण करणं आणि भरणं ही सतत प्रक्रिया सुरुय. मात्र, कोरोना महामारी आणि विविध राज्यांनी लादलेल्या लॉकडाउनमुळं परीक्षेच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. देशात कोविडची (Coronavirus) पहिली लाट संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर RRB नं 15 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत रेल्वे भरती बोर्डानं 1,89,790 लोकांची नियुक्ती केलीय, असं त्यांनी सांगितलं.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
13 Comments
  1. siddheswar Gaikwad says

    Diploma in Electronics and telecommunications

  2. Ashwin Sakhare says

    HELLO, sir
    Good Evening
    I am ashwin sakhare from Maharashtra…
    I want to take part in this scheme..

  3. Ashwin Sakhare says

    Hello, Sir
    Good Evening…
    I am ashwin sakhare from Maharashtra.
    I want to take a part in this scheme…

  4. Ratna Kargaonkar says

    Yes muze joint karna hai

  5. sainath kamble says

    किती कालावधीचे प्रशिक्षण असेल आणि सेंटर्स कोणती असतील….

  6. Digambar suresh Ghorpade says

    8th pass

  7. Ritesh says

    Yes

  8. Prshant says

    Mujye CLS joining krni hy

  9. Rajendra Aurase says

    My Government jobs important

  10. Hanuman sangle says

    Hanuman sangle

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!