नोकरीची उत्तम संधी; रेल्वेत 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी परीक्षा होणार
Indian Railway Recruitment 2020 : केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, रेल्वेनेही तब्बल 1,40, 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.
अर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मित्तीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे.
RRB NTPC Computer Based Test Date Notification
रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
सोर्स : लोकमत
Indian Railway Bharti 2020
Indian Railway Recruitment 2020: Corona is comforting news for the unemployed in times of crisis. Employment opportunities are available for young people who want government jobs. RRB NTPC 2020 recruitment process has been started. Under this, about 35 thousand 208 vacancies will be filled in the railways.
नोकरीची उत्तम संधी; भारतीय रेल्वेत ३५ हजार जागांसाठी भरती
Indian Railway Recruitment 2020
Indian Railway Bharti 2020 : कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता(DA), घरभाडे(HRA) परिवहन भत्ता(Transport) पेन्शन योजना(Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.(Indian Railway Recruitment 2020)
पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड
Indian Railway Bharti 2020 : आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.
10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये बंपर भरती
आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयोमर्यादा:
- सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे
- ओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे
- अनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे
Plz job
I am thankful and I am need this job
Maj iti jal hahe
[email protected] Pravin jangal Ade is 12th pass mo 9021979361MH bhtsawangi thanda dist hingoli
7057384717
railway ne kutlya company la tender dile??