Indian Navy Merit Lists Declared
Indian Navy Merit Lists Declared
भारतीय नौदल मॅट्रिक रिक्रूट भरती: एप्रिल बॅचची मेरिट लिस्ट जारी
Indian Navy Results : Indian Navy Matriculate Recruitment Merit Lists Declared now. Candidates Check their merit lists from below given link on this page. Candidates download Merit List for for Merit List of MR (Chef), Merit List of MR (Steward) and for Merit List of MR (Hygienist). The merit list is in PDF format. Under this recruitment process, the Indian Navy will be recruiting six matric recruits….
भारतीय नौदलाने मॅट्रिक रिक्रूट भरतीच्या एप्रिल बॅचची मेरिट लिस्ट जारी केली आहे. ही मेरिट लिस्ट शेफ, स्टीवर्ड आणि हायजिनिस्टची आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज केले असतील तर नौदलाच्या भरतीसंदर्भातल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही यादी पाहू शकाल.
मेरिट लिस्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत भारतीय नौदलात ४०० मॅट्रिक रिक्रुट भरती होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान १४,६०० रुपये मासिक स्टायपेंड मिळणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डिफेंस पेचं लेव्हल ३ चं वेतन मिळेल. हे वेतन २१,७०० ते ६९,१०० या टप्प्यात असेल. शिवाय MSP 5,200 आणि DA मिळणार आहे.
या पदांतर्गत मास्टर चीफ पेटी ऑफिसरपर्यंतचं प्रमोशन मिळतं. या पदाचं पे स्केल ४७,६०० ते १,५१,१०० पर्यंत आहे. याव्यतिरिक्त MSP 5,200 आणि DA मिळणार आहे. याव्यतिरिक्त चांगली कामगिरी बजावणारे आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना कमिशन्ड ऑफिसर पदापर्यंतचं प्रमोशन मिळू शकतं.
ही मेरिट लिस्ट २० फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०२० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. यानंतर ही लिंक डिअॅक्टिवेट होईल.
MERIT LIST FOR MR 04/2020 BATCH
Click here for Merit List of MR (Chef)
Click here for Merit List of MR (Steward)
Click here for Merit List of MR (Hygienist)