आयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त
Income Tax Nagpur and NADT Bharti
Income Tax Nagpur and NADT Bharti : There are 19 vacancies in the Indian Revenue Service (IRS) in the Nagpur zone of the Income Tax Department. RTI activist Sanjay Thul has received information under RTI that 100 posts of IRS have been sanctioned in Nagpur zone, out of which 81 posts are occupied by officers. The above information was given to Thule by Assistant Income Tax Commissioner Ramesh Mughol.
आयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त
आयकर विभागाच्या नागपूर झोनमध्ये १९ भारतीय महसूल सेवेची (आयआरएस) महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. नागपूर झोनमध्ये आयआरएसची १०० पदे मंजूर असून, त्यापैकी ८१ पदांवर अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांना माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झाली आहे. थूल यांना सहायक आयकर आयुक्त रमेश मुघोल यांनी उपरोक्त माहिती दिली.
सीसीआयटी नागपूरमध्ये ७५ आणि एनएडीटीमध्ये २५ पदे आयआरएसकरिता आहेत. यापैकी ८१ पदे भरण्यात आली आहेत. प्रधान आयुक्तांची तीन, अतिरिक्त आयुक्तांची सात आणि उपायुक्त व सहायक आयुक्तांची नऊ पदे रिक्त आहेत. या श्रेणीत एकूण ९३ पदे मंजूर असून, ७४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत.
संजय थूल म्हणाले, माहितीच्या अधिकारांतर्गत आयकर विभागाने माहिती उपलब्ध करून दिली आहे. नागपूर कार्यालयात एकूण १,३३५ पदे मंजूर असून, त्यापैकी ८७९ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मंजूर पदांमध्ये ४५६ पदे रिक्त आहेत. आयकर विभाग महसूल संकलनात सर्वाधिक महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागात दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा महसूल गोळा होतो. त्यानंतरही देशभरात या विभागात ३०,८१७ पदे रिक्त आहेत. विभागाकरिता देशभरात एकूण ७६,३२१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४५,५०४ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. थूल म्हणाले, नागपूर झोन आणि नागपूर कार्यालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही पदे भरली जात नाहीत. त्यामुळे लोकांची कामे प्रभावित होत आहेत. विभागाने मागणी केल्यानंतरही सरकार रिक्त पदे भरण्यास पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रुप-१ मध्ये आयआरएस अधिकाऱ्यांची भरती होते, त्या ठिकाणीही जवळपास ९०० पदे रिक्त असल्याची माहिती आहे.
सोर्स : लोकमत