IGNOU Admit Card-इग्नू टीईई परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
IGNOU Admit Card
IGNOU Admit Card: Indira Gandhi National Open University (Indira Gandhi National Open University, IGNOU) has announced the admission card for December TEE. Candidates appearing for the examination can download IGNOU Admission Card 2021 for the December Term-End Examination (TEE) from the official website ignou.ac.in. The IGNOU December Term-End Examination will be held from March 4 to April 11, 2022.
IGNOU TEE admit Card 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University, IGNOU) डिसेंबर टीईईसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. परीक्षेला बसलेले नोंदणीकृत उमेदवार डिसेंबर टर्म-एंड परीक्षा (TEE) साठी इग्नू प्रवेशपत्र २०२१ अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वरुन डाउनलोड करू शकतात. इग्नू डिसेंबर टर्म-एंड परीक्षा ४ मार्च ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. इग्नू डिसेंबर टीईई हॉल तिकीट २०२१ नसेल तर उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घ्या.
डिसेंबर टीईईसाठी इग्नू२०२१ प्रवेशपत्रामध्ये उमेदवाराचे नाव, नावनोंदणी क्रमांक, नियंत्रण क्रमांक, परीक्षा केंद्र कोड, परीक्षा केंद्राचा पत्ता, अभ्यासक्रम कोड, परीक्षेची तारीख, सत्र, सत्राची वेळ/कालावधी, परीक्षेची तारीख आणि इतर मार्गदर्शक तत्त्वे इ. माहितीप्रमाणे विविध महत्त्वाचे तपशील देण्यात आले आहेत. याची तात्काळ खात्री करुन घ्या. नसेल तर इग्नूशी संपर्क साधून दुरुस्ती करुन घ्या.
असे करा डाऊनलोड- How to Download IGNOU TEE Admit Card
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
- ‘अलर्ट’ सेक्शनवर जा.
- ‘हॉल तिकीट डिसेंबर २०२१ टर्म एंड एक्झामिनेशन’ या टॅबवर क्लिक करा.
- एक नवीन विंडो उघडेल जिथे ‘Link for Hall Ticket’ वर क्लिक करा.
- तुमचा नावनोंदणी भरा आणि अभ्यासक्रम निवडा.
- ‘सबमिट’ टॅबवर क्लिक करा.
- इग्नू हॉल तिकिट डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
थेट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांनी डिसेंबर टीईईसाठी इग्नू प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करण्यापूर्वी हॉल तिकिटात दिलेले सर्व तपशील तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इग्नू डिसेंबर टीईईच्या हॉल तिकिटात काही चूक आढळल्यास, उमेदवारांनी ती तत्काळ दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जानेवारी सत्रासाठी इग्नू २०२२ साठी नोंदणी विंडो बंद करणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
IGNOU Admit Card: IGNOU has announced the admission letter for the June TEE exam. Hall Ticket 2021 for TEE has been announced on the official website ignou.ac.in. Students who are going to take this exam can go to the official website and download the hall ticket.
इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी हॉल तिकिट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात.
IGNOU Admit Card 2021: इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जून टर्म अॅण्ड परीक्षा. टीईईसाठी प्रवेश पत्र २०२१ हे अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शेड्यूल्डनुसार परीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
IGNOU Admit Card 2021 for June TEE
- इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा
- प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल.
- या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल.
- इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
- प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल
- प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा
- परीक्षेसंदर्भातील महत्वाची माहिती इग्नू प्रवेश पत्रावर मिळेल