सीआयसीएसईतर्फे दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – ICSE Board 2024
CISCE Exam 2024 – The Council for the Indian School Certificate Examination (CISCE) has released the schedule for class 10 and 12 exams. The class 12 exams will be held from February 12 to March 3, while the class 10 exams will be held from February 21 to March 4. It has been decided to provide a new facility for re-evaluation of answer sheets from the 2024 examination and the compartment examination has been canceled. ICSE Board 2024 time table are given below.
Cisse said in a press release. The class 10 exams will be held from 11 am to 1 pm except the arts exam. The arts exam will be held from 9 am to 2 pm. The exams for all subjects of class 12 will be held from 2 pm to 5 pm. Instructions regarding the examination have also been given along with the exam schedule. The date-wise schedule of the exam has been made available on the cisce.org website. The results will be declared in May.
The CISCE has decided to cancel the compartment exam from the 2024 examination. It has been decided to provide a new facility for re-evaluation with the existing facility of re-checking answer sheets after the declaration of the results of the regular examination. It has also been clarified that students will be able to take the improvement test for a maximum of two subjects.
सीआयसीएसईतर्फे दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ३ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. २०२४च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीआयसीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेत कला विषयाची परीक्षा वगळता अन्य विषयांच्या परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहेत. कला विषयाची परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह परीक्षेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे दिनांकनिहाय वेळापत्रक cisce.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
सीआयसीएसईने २०२४च्या परीक्षेपासून कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याच्या प्रचलित सुविधेसह पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांसाठी इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ICSE Board Exam 2024
ICSE Board Exam 12th Exam Time Table: Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) The previously announced schedule for the second semester exams of Class XII has been changed. The dates of National Testing Agency’s Engineering Entrance Examination JEE Main 2022 (JEE Main 2022) Session 1 are clashing with the dates of 12th Semester 2 examinations of ICSE Board. This has led to a change in the ICSE examination schedule.
ISC Semester 2 Date Sheet 2022: 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. १६ मार्च २०२२ रोजी काऊन्सिलने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) च्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२२( JEE Main 2022) सत्र १ च्या तारखा आयसीएसई बोर्डाच्या बारावी सेमिस्टर २ परीक्षांच्या तारखांशी क्लॅश होत आहेत. यामुळे आयसीएसईच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आयसीएसई बोर्डाने आयएससी सेमिस्टर २ च्या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.
आयसीएसईने बारावीच्या सुधारित वेळापत्रक २०२२ मध्ये देखील प्रत्येक पेपरसाठी १ तास ३० मिनिटांव्यतिरिक्त १० मिनिटे अधिक देण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. बारावीच्या सर्व परीक्षा दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार असून प्रश्नपत्रिका दुपारी १.५० वाजताच वितरित केल्या जाणार आहेत.
- २६ एप्रिल – इंग्रजी पेपर १
- २८ एप्रिल – कॉमर्स
- ३० एप्रिल – पर्यायी इंग्रजी, आतिथ्य व्यवस्थापन, भारतीय संगीत – हिंदुस्तानी – पेपर १ (थ्योअरी), भारतीय संगीत – कर्नाटक – पेपर १ (सिद्धांत), पाश्चात्य संगीत – पेपर १ (थ्योअरी)
- २ मे – इंग्रजी पेपर २
- ५ मे – अर्थशास्त्र
- ७ मे – मास मीडिया आणि कम्युनिकेशन, फॅशन डिझायनिंग पेपर १ (सिद्धांत)
- ९ मे – गणित
- ११ मे – इतिहास
- १३ मे – केमिस्ट्री पेपर १
- १४ मे – होमसायन्स पेपर १
- १७ मे – भौतिकशास्त्राचा पेपर १
- २० मे – अकाऊंट्स
- २३ मे – जीवशास्त्र पेपर १
- २५ मे – समाजशास्त्र
- २७ मे – राज्यशास्त्र
- ३० मे – मानसशास्त्र
- १ जून – कॉम्प्युटर सायन्स पेपर १ (सिद्धांत)
- ३ जून – शारीरिक शिक्षण पेपर १ (सिद्धांत)
- ४ जून – कायदेशीर अभ्यास
- ६ जून – भारतीय भाषा / आधुनिक परदेशी भाषा / शास्त्रीय भाषा
- ८ जून – व्यवसाय अभ्यास
- १० जून – बायोटेक्नोलॉजी (पेपर १) थ्योअरी, पर्यावरण विज्ञान (पेपर १) सिद्धांत
- १३ जून – जियोग्राफी, जियोमॅट्रीकल अॅण्ड मॅकेनिकल ड्रॉइंग, इलेक्ट्रीसिटी आणि इलेक्ट्रॉनिक्स
ICSE Board Exam 2022- The National Testing Agency (NTA) has announced the dates for the JEE Main 2022 Engineering Entrance Examination. Following this, the schedule of various Central and State Board examinations is now being announced. The Indian School Certificate Examinations (ICSE) Board has announced the schedule of Class X (ICSE) and Class XII (ISC) second session examinations on March 3, 2022.
ICSE Date Sheet: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (Nationa Testing Agency, NTA) इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२२ (JEE Main 2022) च्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आता विविध केंद्रीय आणि राज्य बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच आयसीएसई बोर्डाने ३ मार्च २०२२ रोजी इयत्ता दहावी अर्थात आयसीएसई आणि इयत्ता बारावी म्हणजेच आयएससीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
काऊन्सिलने जाहीर केलेल्या आयसीएसई सेमिस्टर २ च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांव्यतिरिक्त हा वेळ असेल.
ICSE आणि ISC च्या परीक्षा २५ एप्रिलपासून
- देशातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डातर्फे २०२१-२२ या वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा करण्यात आली.
यानुसार पहिल्या सत्राच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आल्या. - दहावी, बारावी परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजेच सेमिस्टर २ च्या परीक्षा आता २५ एप्रिलपासून होणार आहेत.
- २० मेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. आयएससी परीक्षा ६ जूनपर्यंत होणार आहेत.
- काऊन्सिलच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर
- दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून विद्यार्थी आयसीएसई सेमिस्टर २ चे वेळापत्रक डाउनलोड करून विषयनिहाय परीक्षेच्या तारखा माहिती करुन घेऊ शकतात.
ICSE and ISC SEM 2 2022: वेळापत्रक पाहण्यााठी ‘येथे’ क्लिक करा
The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) has given important updates regarding ICSE ie 10th and ISC ie 12th. Accordingly, this time the board examination will be conducted on a reduced syllabus. ICSE has announced new syllabus (ICSE Board Syllabus 2022) for Board Examination 2022. A sample question paper (ICSE Sample Paper 2022) for both the classes has also been published and uploaded on the official website of ICSE Board, cisce.org.
ICSE Board Exam 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE) ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार यावेळची बोर्ड परीक्षा ही कमी केलेल्या अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. ICSE ने बोर्ड परीक्षा २०२२ साठी नवीन अभ्यासक्रम (ICSE Board Syllabus 2022) जाहीर केला आहे. यासोबतच दोन्ही इयत्तांसाठी नमुना प्रश्नपत्रिका (ICSE Sample Paper 2022) देखील प्रसिद्ध करण्यात आली असून आयसीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cisce.org वर अपलोड करण्यात आली आहेत.
आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२ देणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आणि नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी ICSE वेबसाइटवर जावे लागेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांना ICSE परीक्षा अभ्यासक्रम (ISCE reduced syllabus 2022) आणि नमुना पेपर मिळवू शकते.
ICSE Board Exam pattern 2022: जाणून घ्या
- कमी केलेला अभ्यासक्रम आणि बोर्डाने जाहीर केलेल्या नमुना पेपरच्या आधारे, विद्यार्थ्यांना आयसीएसई बोर्ड परीक्षा पेपर पॅटर्न २०२२ (ICSE Board Exam 2022 paper pattern) मिळू शकतो.
- आयसीएसई बोर्डाच्या थ्येअरी परीक्षा ८०-८० गुणांसाठी होत आहेत. उर्वरित २० गुण प्रोजेक्ट / अंतर्गत मूल्यांकन / प्रात्यक्षिक परीक्षांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
- उदाहरणार्थ, ICSE इयत्ता दहाची बोर्ड गणित परीक्षा पॅटर्न २०२२ मध्ये एकूण दोन भाग असतील. पेपर १ मध्ये ८० गुणांचा थ्येअरी भाग आणि २० गुणांचा प्रोजेक्ट असेल. पेपर १ मध्ये तीन विभाग असतील.
- हा विभाग एकूण ६५ गुणांचा असून तो अनिवार्य असेल. तसेच विभाग बी आणि सी मधून पर्याय निवडण्याची संधी असेल. दोन्ही विभाग प्रत्येकी १५ गुणांचे असतील. विद्यार्थ्यांना यातील एकाचे उत्तर लिहावे लागेल.
दहावीचा (ICSE) कमी केलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी क्लिक करा
बारावीचा (ISC) कमी केलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी क्लिक करा
ICSE Term 1 12th and 10th Exam 2022
The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) has given important updates regarding ICSE ie 10th and ISC ie 12th. Students appearing for Class XII examinations are allowed to use Scientific Calculator during Semester 1 examinations.
This is stated in the notification issued by the board on November 24. Accordingly, the twelfth year 2021-22 is in the context of Semester 1 examination. Candidates are allowed to use Casio FX-82 MS (Scientific Calculator) calculator.
ICSEE ISC Exam Update: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बोर्डाने २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार बारावी वर्ष २०२१-२२ सेमिस्टर १ परीक्षेच्या संदर्भात आहे. उमेदवारांना Casio FX- 82 MS (सायंटिफिक कॅल्क्युलेटर) कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर १ ची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे दिली जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात येईल. सेमिस्टर परीक्षा MCQ स्वरूपात घेतली जाईल. प्रत्येक उमेदवाराला सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल. यंदा प्रथमच बोर्डाच्या परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये विभागल्या जात आहेत. उमेदवारांना या दोन्ही परीक्षांना बसावे लागेल.
दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. ISC ची पहिल्या सत्राची परीक्षा आता सुरू आहे तर दुसऱ्या सत्राची परीक्षा पुढील वर्षी मार्च/एप्रिलमध्ये होणार आहे. सेमिस्टर १ मध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQs) प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिका-सह-उत्तर पुस्तिका दिल्या जातील. विद्यार्थ्यांना या पुस्तिकांवरच उत्तरे लिहावी लागणार आहेत. सर्व प्रश्नांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ICSe पेपरच्या पुस्तिकेवरच दिली जातील. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षा सुरू झाल्यावर, उमेदवारांना पत्रकावर त्यांचा ओळख क्रमांक आणि अनुक्रमणिका क्रमांक लिहावा लागेल.
महत्वाच्या सूचना
- विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिकेच्या वरच्या विशिष्ट जागेवर त्यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर लिहावा लागेल.
- विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेवर उत्तरपत्रिकेच्या वरच्या शीट व्यतिरिक्त कुठेही काही लिहू नये.
- जे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी उशिरा पोहोचतील त्यांना पर्यवेक्षक परीक्षकांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल.
- विद्यार्थ्यांनी मास्क घालावे. हात स्वच्छ करावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे.
ICSE ISC 10th 12th Exam 2021
ICSE, ISC Board has decided to postpone the 10th and 12th examinations. The Semester 1 exams were scheduled to start on November 15, 2021 and end in December 2021. The 10th exam was scheduled to end on December 6 and the 12th exam was scheduled to end on December 16.
SSC HSC Supplementary Exam- पुरवणी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर
ICSE, ISC बोर्डकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेमीस्टर 1 परीक्षा या 15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु होणार होत्या तर डिसेंबर 2021 मध्ये त्या संपणार होत्या. दहावीच्या परीक्षा 6 डिसेंबरला तर बारावीच्या परीक्षा 16 डिसेंबरला समाप्त होणार होत्या.
नव्या तारखा लवकरच जाहीर होणार
- काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफेकेट एक्झामिनेशनने (CISCE) एक महत्वाची नोटिफिकेशन जारी केली आहे.बोर्डची अधिकृत वेबसाईट cisce.org वर नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
- CISCE जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की काही अपरिहार्य कारणांमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच देण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे
- या आधी जाहीर केलेल्या नियमानुसार, परीक्षेचा कालावधी हा एक तासांचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही पेपर्स हे दीड तासांच्या कालावधीचे असतील. पण आता याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- सर्व पेपर्सचा कालावधी दीड तासांचा करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सूचनेची दखल घ्यावी, लवकरच नव्या तारखा जाहीर करण्यात येतील असं बोर्डने सांगितलं असलं तरी नेमकं कधी या तारखा जाहीर करण्यात येतील याची मात्र स्पष्टता देण्यात आली नाही.
The Council for the Indian School Certificate Examination (CISCE) has announced the schedule for ICSE, ISC Board Examination 2021 Semester 1 Examination. The schedule of Semester 1 has been announced for the students of class X and XII. Candidates can check and download the schedule by visiting the official website of ISCE, cisce.org
ICSE, ISC Board Exams 2021: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ICSE, ISC बोर्ड परीक्षा २०२१ सेमिस्टर १ परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर १ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार ISCE ची अधिकृत वेबसाइट cisce.org वर जाऊन वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमिस्टर १ ची परीक्षा १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ६ डिसेंबरला दहावी आणि १६ डिसेंबरला बारावीची परीक्षा समाप्त होईल.
दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी ११ वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी १ तास असणार आहे. तर बारावीची परीक्षा दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी दीड तास आहे. पेपर सोडवण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आला आहे.
ICSE, ISC बोर्ड परीक्षा 2021 वेळापत्रक असे करा डाउनलोड
- स्टेप १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
- स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल.
- स्टेप ४: आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल.
- स्टेप ५: वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
ICSE परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा
ISE परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा
The Council for the Indian School Certificate Examination has changed the schedule of ICSE i.e. Tenth and ISC i.e. Twelfth compartment and Improvement examinations. The timetable along with the dates of the examination has been announced in the notice issued by the council. As per the notice of ISCE, as August 20, 2021 is a Moharram holiday, the pre-scheduled paper of this date will now be one day earlier i.e. August 19, 2021.
काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल केला केला आहे. काऊन्सिलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटीसमध्ये परीक्षेच्या तारखांसोबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयएससीईच्या नोटीसनुसार २० ऑगस्ट २०२१ रोजी मोहरम सुट्टी असल्याने या तारखेचा पूर्वनियोजित पेपर आता एक दिवस आधी म्हणजे १९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.
ICSE आणि ISC चे विद्यार्थी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक काऊन्सिलची अधिकृत वेबसाइट cisce.org वर दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करु शकतात.
आयएससीईच्या नोटीसनुसार, आयसीएसईसाठी २० ऑगस्ट रोजी होणारा इतिहास आणि नागरिकशास्त्र (एचसीजी पेपर 1) पेपर आता १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, ISC साठी २० ऑगस्ट रोजी नियोजित मानसशास्त्र, अकाऊंट्स आणि केमिस्ट्री पेपर आता फक्त १९ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.
सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
ICSE, ISC Exam 2021: The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) has released the schedule of ICSE i.e. Tenth and ISC i.e. XII compartment and improvement examinations.
ICSE, ISC Exam 2021: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे.
सीआयएससीईच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार दोन्ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. टाइमटेबलनुसार, इयत्ता दहावीसाठी कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होतील आणि ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहतील. इयत्ता बारावीसाठी कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होतील आणि ७ सप्टेंबर २०२१ रोजी समाप्त होईल. दोन्ही परीक्षांच निकाल २० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल.
अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा
ICSE Board Exam Results
The results of Indian School Certificate Examinations (CISCE) i.e. Class X and XII examinations will be announced on Saturday, July 24 at 3 pm
ICSE Results 2021: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९८ तर बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.७६ आहे. या दोन्ही परीक्षा यंदा करोनामुळे रद्द झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशिष्ट सूत्र आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले आहेत.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी –
आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.
– बारावीचा निकाल पाहण्यासाठी –
आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.
आयसीएसई दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
The results of Indian School Certificate Examinations (CISCE) i.e. Class X and XII examinations will be announced on Saturday, July 24 at 3 pm. The ICSE board’s Class X and XII examinations were canceled due to the Kovid-19 virus epidemic. Students will be awarded marks based on their internal assessment.
इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहेत.
कोविड-१९ विषाणू महामारीमुळे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यंदा यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे रिचेकिंगही होणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर www.cisce.org किंवा www.results.cisce.org येथे विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे.
स्टेप बाय स्टेप कसा पाहाल निकाल – ICSE Step Wise Results
- – काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा.
- – होमपेजवर ‘Results 2021’ या लिंकवर क्लिक करा.
- – आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा
- आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.
- – निकाल पाहण्याच्या आणि प्रिंट आऊट काढण्यासंदर्भातील सूचना वेब पेजवर दिलेल्या असतील.
एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल?
- – दहावीचा निकाल पाहण्यासाठी –
- आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.
- – बारावीचा निकाल पाहण्यासाठी –
- आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.
ICSE Board Exam
This is good news for the students of Council for the Indian School Certificate Examination (ISCE). Because ICSE has taken an important decision for the new academic session 2021-22. According to this decision, the syllabus of class X and XII has been reduced. ICSE X and XII Board Examination 2022 (ICSE Exams 2022) will now be conducted on the basis of the reduced syllabus.
ICSE Board Exam
ICSE 10th 12th syllabus 2022: काऊंसिल फॉ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (ISCE)च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण ICSE संस्थेने नवे शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. आता कपात केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे आयसीएसई दहावी (ICSE)आणि बारावी (ISC) बोर्ड परीक्षा २०२२ (ICSE Exams 2022) चे आयोजन केले जाणार आहे.
बोर्डाने आपली अधिकृत वेबसाइट cisce.org वर नवा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही नवा बदललेला अभ्यासक्रम डाऊनलोड करु शकता.
ISCE च्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथे क्लिक करा
ICSE Board Exam Canceled
ISCE 12th board exam 2021: ICSE board has canceled the 12th board exam. They have posted a notice on their official website cisce.org.
ISCE 12th board exam 2021: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आल्यानंतर अनेक महिने चर्चा सुरु असलेल्या प्रश्नावर तोडगा निघाला. आता आयसीएसई बोर्ड परीक्षा घेणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आयसीएसई बोर्डाने देखील आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांची द्वीधा मनस्थितीतून सुटका केली आहे.
आयसीएसई बोर्डाने (ICSE Board)देखील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काउंसिल फॉर द इंडीयन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (सीआयएससीई) चे अधिकृत संकेतस्थळ cisce.org वर आयएससी परीक्षा रद्द ((ISC Exam 2021)होण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
ICSE Board Exam 2021
CBSE, ICSE Board Exam 2021- The Supreme Court today heard a petition filed by the Central Board of Secondary Education (CBSE) and the Indian Certificate of Secondary Education (ICSE) regarding the Class XII examinations. The central government said it would take a decision on the test in two days and put it before a court. Therefore, the hearing has been adjourned till Thursday.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डांच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. केंद्र सरकारने या परीक्षांसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेऊन तो कोर्टापुढे ठेवण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ICSE board has also decided to cancel the 10th exam. Meanwhile, the Class XII examination has not been canceled and a new date will be announced soon.
सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.
आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.
ICSE Board Exam 2021: The ICSE Board has said that the 10th (ISCE Exam 2021) and 12th (ISC Exam 2021) exams have been postponed due to the COVID-19 infection. A decision will be taken in the first week of June 2021 after reviewing the Corona epidemic situation.
ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पोस्टपोन
ICSE Board Exam 2021: ICSE 10th 12th exam 2021 postponed: सीबीएसई (CBSE) आणि अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनंतर आता आयसीएसई बोर्डाने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाने या परिपत्रकात काय म्हटले आहे जाणून घ्या…
आयसीएसई बोर्डाने सांगितले आहे की कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी (ISCE Exam 2021) आणि बारावी (ISC Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात करोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल.