Half of the staff in Government Offices
Half of the staff in Government Offices
सरकारी कार्यालयांत निम्मेच कर्मचारी
Government Offices Staff : Due to to Corona Virus government take various step as a precaution. Chief Minister Uddhav Thackeray announced in Mumbai on Wednesday that at least 50 percent of the staff will come to the government offices on a day-to-day basis to deal with the spread of corona virus. Corona infections need to be minimized, which will only be possible if the crowd is controlled. For this, the Chief Minister has taken some important decisions in a meeting held today. Read the more details given below :
करोना विषाणू संसर्गाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये एक दिवसांआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील, या हिशेबाने सुरू ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत जाहीर केले. करोनाचा संसर्ग कमी करणे आवश्यक असून, ते गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच शक्य होईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
यात राज्यातील सरकारी कार्यालये एक दिवसांआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील, या हिशेबाने सुरू ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील बेस्ट बसेसमध्ये उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील. तसेच, प्रवाशांनी अंतराने बसावे यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुकानांच्या वेळा निश्चित करणार
शहरातील दुकानांच्या वेळा यापुढे निश्चित करण्यात येणार आहेत. सर्व दुकाने ठराविक काळाच्या अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील; तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसांआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची आरोग्य सेवा व उपचारांसाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तितक्या विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क; तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषधसामग्री देखील उपलब्ध आहेत.
‘स्वत:हून घरी राहा’
‘ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर सरकारचे लक्ष असून होम क्वारंटाइनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली, तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल. जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
‘साठेबाजांवर कारवाई’
सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किमती जास्त लावत असेल, तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
फोटो ओळी…
‘करोना’ विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नागरिकांना घरी बसण्याचे आणि अनावश्यक न फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि बांद्रा येथील नेहमी गजबजणारा परिसर बुधवारी निर्मनुष्य होता.