Govinda Sarkari Jobs: गोविंदांना मिळणार सरकारी नोकरी’, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
Govinda Sarkari Jobs
Govinda Sarkari Jobs: Dahihandi declared as a ‘sport’, Govinda will get the benefit of a government job., In Maharashtra, Chief Minister Eknath Shinde announced a major decision of reservation in government jobs for Govindas who participate in Dahi Handi. The state government has decided to give government jobs to Govinda teams. Read More details are given below.
Govinda Sarkari Jobs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली. दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्या गोविंदा जखमी झाले तर त्यांना विमा मिळेल. तसेच या उत्साहाचं क्रीडा प्रकारात समावेश करुन गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोट्यातून नोकरीचा लाभ घेता येईल, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
गोविंदांना मिळणार सरकारी नोकरी’, मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा संदर्भात भाष्य केलं होतं. खरंतर अशा दुर्घटना घडू नयेत. पण दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
- तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दहीहंडीचा क्रीडा प्रकारात सामावेश करायचा आहे. याबाबत सर्वच गोविंदांची मागणी होती. त्यामुळे गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात.
- राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसं हे राज्य शासनाकडून मिळतील. त्याचप्रमाणे इतर खेळांप्रमाणे या खेळातील गोविंदांना देखील शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोट्यातून लाभ मिळेल. तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळेल”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
- यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
- दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.