शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Government Technical College Admission Schedule Announced
Government Technical College Admission Schedule Announced: The following schedule has been announced for the students who have registered online for the current year’s admission in the Government Technical College. For the first year engineering, direct second year engineering, pharmacology, students from the district should be given priority for admission, appealed Principal A. Performed by M. Jadhav.
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
रत्नागिरी – शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमाने प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य ए. एम जाधव यांनी केले.
रत्नागिरीसाठी 1033 अर्ज आले असून जागा 525 आहेत. तात्पुरती गुणवत्ता यादी 7 डिसेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. 12 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी लागेल. उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनमधून विकल्प अर्ज भरावा. कॅपनुसार जागा वाटप झालेली असल्यास पडताळणी करून जागा घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून उमेदवारांनी स्वतः संस्थेत उपस्थित राहून प्रवेश घ्यावा.
पहिल्या कॅप फेरीसाठी उमेदवारांनी 12 ते 14 डिसेंबरदरम्यान विकल्प अर्ज भरावेत. निवडलेल्या विकल्पांनुसार पहिल्या फेरीमध्ये कोणते कॉलेज व शाखा मिळाली आहे किंवा नाही हे त्यांच्या स्वत:च्या लॉगिनमध्ये 16 डिसेंबरला समजेल. 17 ते 18 डिसेंबरला शुल्क भरावे. जागा वाटप स्वीकारल्यास तंत्रनिकेतनमध्ये 17 ते 19 डिसेंबरदरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वतः मूळ कागदपत्रांसह येऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
कॅपनुसार दुसऱ्या फेरीसाठी उमेदवारांनी लॉगिनमधून विकल्प अर्ज, 21 ते 22 डिसेंबर या कालावधीत भरावेत. 24 डिसेंबरला निवडलेले कॉलेज, शाखा मिळाली आहे किंवा नाही हे समजणार आहे. जागा वाटप स्वीकारणे व जागा स्वीकृती शुल्क भरणे 25 ते 28 डिसेंबर या कालावधीत करता येणार आहे. द्वितीय फेरीमध्ये वाटप झालेल्या जागांसाठी 25 ते 29 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करायचा आहे.
सहा अभ्यासक्रम
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य यंत्र, विद्युत, अणुविद्युत, दूरसंचार व संगणक अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका या शाखा उपलब्ध आहेत. यासाठी 1750 ते 7750 रुपये इतके कमी शुल्क आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य जाधव यांनी केले आहे.
सोर्स: सकाळ