घरबसल्या नोकऱ्या शोधा; गुगलचं नवं अॅप भारतात लाँच
Google Launches Kormo App In India
Now there is an opportunity to find a job without rushing. Google search engine has taken the initiative for this. Google has launched its job search application in India. The name of this job search app from Google is Kormo. Google claims that this app will be very useful for millions of young people in India to find entry-level jobs.
घरबसल्या नोकऱ्या शोधा; गुगलचं नवं अॅप भारतात लाँच
Google Kormo App for Jobs Search in India: आता धावपळ केल्याशिवाय एका जागी बसून नोकरी शोधण्याची संधी चालून आली आहे. यासाठी पुढाकार घेतला आहे गुगल सर्च इंजिनने. गुगलने आपलं जॉब सर्च अॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. गुगलच्या या जॉब सर्च अॅपचं नाव आहे – कॉर्मो (Kormo). हे अॅप भारतातील लाखो तरुणांना एंट्री लेवलच्या नोकऱ्या शोधण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.
बेरोजगारांसाठी महत्त्वाची बातमी; मोबाईल उद्योग क्षेत्रात होणार सर्वात मोठी रोजगार निर्मिती!
टेक क्रंचनुसार गुगलने भारतात कॉर्मो जॉब्सला आपलं पेमेंट अॅप्लिकेशन गुगल पे (Google Pay) शी जोडलं आहे. भारतात हे जॉब स्पॉट कॉर्मो जॉब्स या रुपात उपलब्ध केले जाईल. गुगल ने हे अॅप २०१८ साली बांगलादेशमध्ये लाँच केले आहे. यानंतर इंडोनेशियात देखील या अॅपचा विस्तार केला गेला आणि आता ते भारतात आणण्यात आले आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की हे अॅप गुगल पे द्वारे लाँच केल्यापासून झोमॅटो, डुंजोसह अनेक कंपन्यांनी यावर २० लाखांहून अधिक नोकऱ्यांच्या ऑफर पोस्ट केल्या आहेत.
ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? मग तुमच्यासाठी ‘या’ काही खास टिप्स!
हा अॅप यूजर्सना केवळ एन्ट्री लेवलच्याच नोकऱ्या शोधण्यास मदत करणार नाही तर रेझ्युमे / सीव्ही बनवण्यास आणि नवी कौशल्ये शिकण्यासदेखील मदत करणार आहे.
Maharashtra,
Vilege, parbhani,
Taluka gangakhed
Post ranisawargoan,
Mukam ubarwadi tanda