गोवा राज्यात ६२ नोटरी नियुक्तीसाठी १९ नोव्हेंबर पासून मुलाखती – Goa Government Jobs

Goa Government Jobs 2024 for 20,000 Posts filled in 2 Years.

Goa Government Jobs – The Panaji government will conduct interviews from November 19 to 27 to appoint 62 notaries. Those practicing law had applied for notary positions. Their names for the interview are posted on the website mentioning the respective taluka-wise date and time. Applicants are requested to carry their original certificates and other necessary documents and attend the Secretariat’s conference hall at Parvari for 15 minutes before the time on the day of the interview.  Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यात ६२ नोटरी नियुक्तीसाठी १९ पासून मुलाखती – पणजी सरकारने ६२ नोटरी नियुक्त करण्यासाठी येत्या १९ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत मुलाखती होणार आहेत. वकिलीची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी नोटरी पदासाठी अर्ज केले होते. मुलाखतीसाठी त्यांची नावे संबंधित तालुकावार तारीख व वेळ याचा उल्लेख करून संकेतस्थळावर टाकलेली आहेत. अर्जदारांनी आपली मूळ प्रमाणपत्रे व इतर आवश्यक दस्तऐवज घेऊन मुलाखतीच्या दिवशी वेळेआधी १५ मिनिटे पर्वरी येथील सचिवालयाच्या परिषदगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

List of Noteries


As per the News the Mega recruitment to begin in The State of Goa next month, Goa Chief Minister said that recruitment by the Staff Selection Commission is now on track. The advertisement will be released next month to fill more than 500 junior clerk and more than 400 posts of constables, sweepers etc. A new account, such as the Disability Department, will also have staff. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The government is making big efforts for the all-round development of the state. For this, various schemes are being planned to bring new industries to the state. Now every Goan wants to get his rightful home. Chief Minister Pramod Sawant said that the state government will soon come out with a new scheme for this.

‘प्रत्येकाला घर’ योजना आणणार! मुख्यमंत्री

राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नवनवे उद्योग राज्यात यावेत यासाठी विविध योजना आखल्या जात आहे. आता प्रत्येक गोमंतकीयाला त्याचे हक्काचे घर मिळावे अशी इच्छा आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच नवी योजना आणणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

  • मुख्यमंत्र्यांनी काल, गुरुवारी सरकारच्या कामगिरीसह विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेखाली लोक लाभ घेतात. परंतु अनेकांना हे ठाऊक नाही की वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास फ्लॅट खरेदी करण्यासाठीही २.५ लाख रुपये मिळतात. प्रत्येकाच्या डोक्यावर निवारा हवा. त्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन योजना आणणार आहे.
  • गोव्यात नोकऱ्या नाहीत हा समज चुकीचा आहे. औषध कंपन्यांना १ हजार कर्मचारी हवे होते. भरतीसाठी जाहिरात दिली तेव्हा केवळ २०० जण मिळाले. प्रशिक्षित, कुशल मनुष्यबळाची गरज आहे. संधी भरपूर आहेत. गोव्यात कोणीही बेकार राहू शकत नाही. केवळ काम करण्याची इच्छा हवी, असेही ते म्हणाले.
  • पुढील महिन्यात मेगा भरती – एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती आता मार्गी लागली आहे. पुढील महिन्यात ५०० हून अधिक कनिष्ठ लिपीक व तसेच सुमारे ४०० हून अधिक शिपाई, सफाई कामगार आदी मल्टिंटास्कींग पदे भरण्यासाठी जाहिरात येईल. दिव्यांग खात्यासारखे नवे खाते निर्माण केलेले आहे तेथेही कर्मचारी लागतील.

१५ हजार जणांना संधी – युवकांनो अप्रेंटिसशिप करा, रोजगार मिळवा – Goa Rojgar Melava 2024


Goa Government Jobs updates – 4% sports reservation in government jobs declared by CM of Goa State. The Chief Minister has announced that 4 per cent reservation will be kept in all government departments and jobs at all levels for sportspersons who have excelled at the national and international level. Pramod Sawant was speaking at the closing ceremony of the 37th National Games. Earlier, only jobs in police and fire brigade were reserved for sports persons. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सरकारी नोकर भरतीत मिळणार सरसकट 4 टक्के क्रीडा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवणाऱ्या क्रीडापटूंसाठी सरकारच्या सर्व खात्यांत, सर्व स्तरावरील नोकऱ्यांत ४ टक्के आरक्षण ठेवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली, ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलत होते. यापूर्वी केवळ पोलिस आणि अग्निशमन दलातील नोकऱ्यांतच क्रीडापटूंना आरक्षण होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. भारतीय ऑलिपिंक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजक असलेल्या उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांच्याकडे क्रीडाध्वज सुपूर्द केला. यावेळी सर्वाधिक सुवर्णपदके पटकावलेल्या महाराष्ट्राच्या संघाला राजा भलिंद्र सिंग फिरत्या चषकाने गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तो चषक स्वीकारला. सर्वाधिक पदके पटकावणारे खेळाडू श्रीहरी नटराज (कर्नाटक), संयुक्ता काळे (महाराष्ट्र) यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

या सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्हणाले की, गोवा हे छोटे राज्य असले तरी गोमंतकीयांचे हृदय विशाल आहे. त्याचमुळे या स्पर्धांतील सर्व सहभागी चांगल्या स्‍मृती घेऊन येथून जातील, यात शंकाच नाही.

‘गोवा आहे तयार’ ही केवळ घोषणा नव्हती, तर त्यामागे मोठी मेहनत होती. तो जोश क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या भाषणातून दिसून आला.


Goa Government Jobs new updates is given here. Chief Minister of Goa State Mr. Sawant said that they issue first advertisements for 700 posts and in the second phase, advertisements will be issued for the remaining Group C posts. The advertisement will be drawn for 200 LDC posts and about 500 MTS posts. Various 22 government departments have sent the list of vacancies to the Goa Staff Selection Commission (SSC). This is the first time that the state government is recruiting through SSC. The functioning of SSC has started from the sixth floor of Spaces building at EDC Pato Plaza here. The recruitment process will start immediately after the advertisement is published in newspapers and on the website of the Commission. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

राज्यात लवकरच LDC आणि MTS कर्मचाऱ्यांची भरती; 700 पदांसाठी निघणार जाहिरात

राज्यातील विविध विभागांतील सुमारे 700 पदांवरील भरतीसाठी जाहिरात नोव्हेंबर महिन्यात काढली जाईल. यात 200 लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदे आणि सुमारे 500 बहु कार्यकारी कर्मचारी (MTS) लोव्हर डिव्हिजन क्लर्क यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे की, आम्ही प्रथम 700 पदांसाठी जाहिराती जारी करू आणि दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित गट क मधील पदांसाठी जाहिराती दिल्या जातील. 200 LDC पदे आणि सुमारे 500 MTS पदांसाठी जाहिरात काढली जाईल.

  • गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे (एसएससी) रिक्त पदांची यादी बावीस सरकारी विभागांनी पाठवली आहे. राज्य सरकार एसएससीच्या माध्यमातून पहिल्यांदाच नोकरभरती करत आहे. येथील ईडीसी पाटो प्लाझा येथील स्पेसेस इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एसएससीचे कामकाज सुरू झाले आहे.
  • वृत्तपत्रांमध्ये आणि आयोगाच्या वेबसाइटवर जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच भरतीची प्रक्रिया सुरू होईल.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती कोंकणी आणि मराठी भाषेत उपलब्ध असून दिव्यांग व्यक्तींना ती उपलब्ध करून दिली जाईल. पोर्टलमध्ये प्रत्येक विभागाच्या पदांसाठी परीक्षा तसेच मॉक टेस्टचा अभ्यासक्रम असेल. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध करून दिल्या जातील.
  • विभागांमध्ये नियमित नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना यापुढे विविध विभाग कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही.
  • उमेदवार लवकरच ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि एक समर्पित हेल्प डेस्क स्थापन केला जाईल.

Goa Chief Minister Pramod Sawant explained in the Legislative Assembly that the recruitment through the Staff Selection Commission will start from October 2023. Henceforth, the government says that recruitment in government departments will be done in a transparent manner through this commission. As far as 130 Home Guards who have completed 50 years of age and have worked as Home Guards for 10 years will be directly recruited in the police service and will be given letters before the end of the session, Sawant said. Also their were 60 children of freedom fighters will be given job appointment letters in government departments on 15th August. Also, letters will be given to those who are remaining till October, said the Chief Minister. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

ऑक्टोबरपासून नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत- मुख्यमंत्री प्रमोद सावंत :

  1. येत्या ऑक्टोबरपासून कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती सुरू होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यापुढे सरकारी खात्यांमध्ये नोकर भरती या आयोगामार्फत पारदर्शक पद्धतीने होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
  2. ३० गृहरक्षकांना पोलिसात नोकऱ्या : – १३० गृहरक्षकांना वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या व १० वर्षे गृहरक्षक म्हणून काम केलेल्या १३० जणांना थेट पोलिस सेवेत भरती केले जाणार असून अधिवेशन संपण्याआधी त्यांना पत्रे दिली जातील, असे सावंत म्हणाले. गुन्हे उकल ८५ टक्के होत आहेत. देशात हे प्रमाण सर्वात जास्त आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. एक गस्ती नौका ताफ्यात घेतली आहे.
  3. स्वा. सैनिकांच्या ६० मुलांना नोकऱ्या : – स्वातंत्र्य सैनिकांच्या ६० मुलांना येत्या १५ ऑगस्ट रोजी सरकारी खात्यांमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे दिली जातील. तसेच उर्वरीत जे कोणी आहेत त्यांना ऑक्टोबरपर्यंत पत्रे देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. १० कोटींच्या कथित कॅसिनो घोटाळ्याची चौकशी होईल. गृह खाते व जीएसटी खाते चौकशी करील, असे सावंत म्हणाले.

Latest updates of Goa Government Jobs 2023 – The information of vacancies in all government departments will be handed over by the government to the Staff Recruitment Commission by 1st August 2023. Henceforth Chief Minister Pramod Sawant announced that apart from the Public Service Commission, all posts will also be filled through the Staff Recruitment Commission. Currently, the recruitment process undertaken by various departments of the government is due to be completed by those departments till 31st August 2023. All concerned departments should complete this process in time. Chief Minister also said that if the process is not completed by 31st August 2023, then the process will be done through the Staff Recruitment Commission. He was speaking while unveiling the Commission’s website. Many posts are vacant in various government departments and the information about all those posts will be handed over to the Commission. Chief Minister Sawant also clarified that information about the posts which will fall vacant after some time will be provided to the Commission by 1st August 2023.

सप्टेंबरपासून नोकरभरती – कर्मचारी आयोगाला १ ऑगस्टपर्यंत देणार रिक्त जागांची यादी

  1. सर्व सरकारी खात्यातील रिक्त पदांची माहिती सरकारकडून १ ऑगस्टपर्यंत कर्मचारी भरती आयोगाकडे सोपविली जाईल. यापुढे लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त सर्व पदेही कर्मचारी भरती आयोगामार्फतच भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
  2. गुरुवारी कर्मचारी भरती आयोगाच्या वेबसाईटचे अनावरण करताना ते बोलत होते. विविध सरकारी खात्यांत खूप पदे रिक्त असून त्या सर्व पदांची माहिती आयोगाकडे सोपवलीजाणार आहे. काही काळाने जी आणखी पदे रिक्त होतील, अशा पदांची माहितीही आयोगाला १ ऑगस्टपर्यंत पुरविली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
  3. कर्मचारी भरती आयोगाला भरती प्रक्रिया १ ऑगस्टनंतर सुरू करणे शक्य होईल आणि सप्टेंबर महिन्यात परीक्षा घ्यायला मिळेल, अशा पद्धतीने आयोगाला डेटा पुरविण्याचे काम जलदगतीने केले जाईल’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
  4. मुख्यमंत्र्यांचे आज दूरदर्शनवर ‘हॅलो गोंयकार’ – राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सावंत ‘हॅलो गोंयकार या विशेष थेट फोन-इन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पणजी दूरदर्शन केंद्राने गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा अनोखा उपक्रम नागरिकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रदान करणार आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग आज, शुक्रवारी होणार आहे. त्याचे सायंकाळी ७ वाजता पुनः प्रसारण होणार आहे. मुख्यमंत्री प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘हॅलो गोंयकारा मध्ये सहभागी होतील. या विशेष फोन इन कार्यक्रमादरम्यान दर्शक मुख्यमंत्री सावंत यांच्याशी २२२२४२४ आणि २२२५२०४ या दूरध्वनी क्रमांकांवरून संपर्क साधू शकतील आणि आपल्या समस्या मांडू शकतील.
  5. ३१ ऑगस्टची डेडलाईन  – सद्यस्थितीत सरकारच्या विविध खात्यांकडून हाती घेण्यात आलेल्या नोकर भरतीची प्रक्रिया त्या त्या खात्यांकडून पूर्ण करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. सर्व संबंधीत खात्यांनी ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी. जर ३१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर त्यानंतर ती प्रक्रिया कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  6. वेबसाईटचे लोकार्पण
    • कर्मचारी भरती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
    • ही वेबसाईट इंग्रजी, कोकणी आणि मराठी अशा तीन भाषांत आहे. शिवाय ती दिव्यांगांसाठीही सोयीस्कर आहे.
    • विविध ठिकाणी असलेल्या नागरी सहाय्यता केंद्रातही ती लोकांसाठी वापरण्याची सोय करून दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa Government Recruitment now only through commission (ayog) ..! Chief Minister Pramod Sawant clarified this while talking to reporters on Monday (i.e. 29th May 2023). The current recruitment by Public Works Department is taking place as per a court order. Construction Department recruitment will be the last independent recruitment. The Chief Minister said that henceforth all the recruitment of government employees will be done through the Staff Selection Commission. The website of Staff Selection Commission and Staff Selection Commission has been prepared. All the tasks of setting up the commission have been completed. We will launch the website in the next few days. The Chief Minister said that recruitment through the commission will provide quality, meritorious and good manpower. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

गोवा सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती

राज्यात सरकारी नोकर भरती यापुढे पूर्णपणे भरती आयोगामार्फतच केली जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सध्या सुरू असलेली नोकरभरती ही न्यायालयाच्या एका आदेशानुसार होत आहे. बांधकाम खात्याची भरती ही शेवटची स्वतंत्र भरती असेल. यापुढे सर्व सरकारी नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फतच होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्मचारी निवड आयोग तथा स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाइट तयार झाली आहे. आयोग स्थापनेचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आपण पुढील काही दिवसांत वेबसाइटचे उदघाटन करू. आयोगामार्फत भरतीने दर्जेदार, गुणवान व चांगले मनुष्यबळ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


Goa Government Jobs updates received from CM. Chief Minister Pramod Sawant informed that the state government will recruit more than 2,500 permanent government posts in the next one year. Chief Minister Sawant said that the total number of employees appointed permanently in the state government is 20,546, while 1,995 employees are working on temporary basis. More than 600 and 500 government employees will retire in 2023 and 2024 respectively. The Sawant government has decided to create 20,000 vacancies in the next two years due to rising unemployment in the state. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

गुडन्यूज! राज्यात वर्षभरात 2,500 कायमस्वरूपी सरकारी पदांची भरती

राज्य सरकार पुढील एका वर्षात 2,500 हून अधिक कायमस्वरूपी सरकारी पदांची भरती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी नियुक्त केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 20,546 आहे, तर 1,995 कर्मचारी तात्पुरत्या आधारावर कार्यरत आहेत. 2023 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 600 आणि 500 ​​हून अधिक सरकारी कर्मचारी निवृत्त होतील. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने येत्या दोन वर्षांत 20,000 रिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अनुकंपा नियुक्तीसाठी सुमारे 600 अर्ज सरकारकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या दोन वर्षांत 189 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. उद्योग आणि उपलब्ध टॅलेंट पूल यांच्यातील वाढत्या कौशल्याच्या अंतरामुळे युवकांना रोजगार शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने, विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार होण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजनांची रूपरेषा आखली आहे.
  2. दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की सर्व सरकारी भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत स्पर्धात्मक मार्गाने केली जातील. प्रत्येक नोकरी कमिशन अंतर्गत येईल आणि अर्जदारांसाठी खाजगी क्षेत्रातील अनुभव अनिवार्य असेल असेही त्यांनी म्हटले होते.
  3. 2023-24 च्या अर्थसंकल्पात, सावंत यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी एकूण तरतूद 30 टक्क्यांनी वाढवली आणि गोव्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मदत करण्यासाठी 148.2 कोटी रुपये दिले.
  4. गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GEDC) मार्फत गोव्यातील तरुणांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हे मुख्यमंत्री शिकाऊ धोरणाचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

The government is making efforts at various levels to provide employment to the youth of the Goa State. Against this backdrop, the Chief Minister promised to provide 20 thousand jobs in the government and private sectors in the next two years. Pramod Sawant gave in the Legislative Assembly. Henceforth the recruitment of government employees will be done through the Staff Selection Commission. Complete transparency will be introduced in the recruitment process. The wage hike for skilled and unskilled, semi-skilled workers will be notified before 15th April 2023. Government has joined hands with Tata Technology. Manpower required by industries will be provided by upgradation of five ITI centers in the Goa state.

पुढील दोन वर्षांत सरकारी व खासगी क्षेत्रात मिळून २० हजार नोकऱ्या

राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील दोन वर्षांत सरकारी व खासगी क्षेत्रात मिळून २० हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. यापुढे सरकारी नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फतच होईल. भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणली जाईल. येत्या १५ एप्रिलपूर्वी कुशल व अकुशल, निमकुशल कामगारांसाठी वेतनवाढ अधिसूचित केली जाईल. टाटा टेक्नॉलॉजीकडे सरकारने हातमिळवणी केली आहे. राज्यातील पाच आयटीआय केंद्रांचा दर्जा वाढवून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल.

Goa Sarkar 20000 Jobs

  1. पर्यटन क्षेत्रात रोजगारासाठी मोठा वाव आहे. पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनांशी बोलणी केलेली आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना द्याव्यात यासाठी सरकार पाठपुरावा करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
  2. वाढत्या बेरोजगारीवरून विरोधकांचा हल्लाबोल सरदेसाईंची टीका – विजय सरदेसाई म्हणाले की, या सरकारकडे ३० हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची क्षमता नाही. दरवर्षी आठ हजार पदवीधर बाहेर पडत आहेत. त्यांना नोकया देण्याची कुवत नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी १६ कोटींची तरतूद केली होती. या वर्षी केवळ ३ कोटीच ठेवले आहेत. राज्यातील बेकारी प्रचंड वाढत चालली आहे. रघुनाथ माशेलकर व्हिजन डॉक्युमेंटमध्ये रोजगार निर्मिती व उद्योजकतेवर ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकार रोजगार निर्मितीच्या केवळ बाता करत आहे. रोज नव्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, त्यांची पूर्तत केली जात नसल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली.
  3. युरींचे गंभीर प्रश्न – विरोधी पक्षनेते युरी आलेमांच म्हणाले की, निती आयोगाच्या अहवालात लाखभर युवक गोव्यात बेकार आहेत हे स्पष्ट झाले आहे. तरीही हे सरकारी गंभीर नाही. ८ व ९ नोव्हेंबर रोजी या सरकारने मेगा भरती मेळावा घेतला. २२,७८० उमेदवार सहभागी झाले होते. परंतु केवळ ५३० जणांनाच नोकऱ्या मिळाल्या. भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग लागू होऊ शकलेला नाही. मोपा विमानतळावर जीएमआर कंपनीने काही गोमंतकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून काढले.
  4. साडेपाच वर्षांच्या मुलांना मिळणार पहिलीत प्रवेश पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी गोव्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षीपासून लागू केली जाईल. त्यानुसार साडेपाच वर्ष असणाऱ्या मुलांनाही इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शून्य तासावेळी सांगितले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक पातळीवर लागू केले जाईल. याशिवाय इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीच्या वयोमर्यादित सहा महिन्यांची शिथिलता देण्याचा निर्णय.

Goa government Job opportunity 2023. A total of 2,572 vacancies will be filled in various government departments till March 2024, Chief Minister Sawant has informed in his written reply in the Legislative Assembly. Pramod SantAndre MLA Viresh Borkar asked a question in this regard. According to the information given by the Chief Minister, the process of filling up the posts which fall vacant due to retirement of employees has started. 20 thousand 546 people have been employed. While 1995 people are in government service on seasonal basis. Meanwhile, the government has decided that at least one year of experience in the private sector is required while applying for government jobs. The Chief Minister explained that there have been cases in the past where applications for the post of Accountant in the Accounts Department were made even in the case of posts before graduation. The same happened with the posts of Sub-Inspector of Police. This will not happen anymore. The Chief Minister explained that if you want to get a government job, you must first have one year of experience in the private sector.

Goa Government Jobs 2023 for 2572

वर्षभरात २५७२ नोकऱ्या मुख्यमंत्री सावंत : मनुष्यबळ निर्मितीसाठी खासगी क्षेत्राची मदत घेणार

  1. मार्च २०२४ पर्यंत पुढील वर्षभराच्या कालावधीत विविध सरकारी खात्यांमध्ये मिळून एकूण २५७२ रिक्त पदे भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. प्रमोद सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता.
  2. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी निवृत्त होऊन जी पदे रिकामी होतात ती भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. २० हजार ५४६ जणांना नोकरीत कायम केलेले आहे. तर १९९५ जण हंगामी तत्त्वावर सरकारी सेवेत आहेत.
  3. दरम्यान, सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना खासगी क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट केले, की यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत की पदवी घेण्याआधीच लेखा खात्यात अकाऊंटंट पदासाठी अर्ज पदांच्या बाबतीतही असे केले. पोलिस उपनिरीक्षक पदांच्या बाबतीतही असेच प्रकार घडले. यापुढे असे होऊ देणार नाही. सरकारी नोकरी मिळवायची असेल तर आधी खासगी क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकार एका बाजूने पायाभूत सुविधा निर्माण करीत असताना दुसरीकडे पुरेसे मनुष्यबळही निर्माण करीत आहे. मनुष्यबळ निर्मितीसाठी खासगी क्षेत्र आणि सरकार या दोघांनी मिळून काय करता येईल ? याबाबत आम्ही विचार करीत आहोत. -प्रमोद सावंत, मुख्यमंत्री


Goa Government Jobs 2023

Goa Govt Bharti 2022- Latest updates about Goa Government Bharti is that  Government job recruitment in Goa will now be done through Goa Staff Selection Commission. State Chief Minister Dr. Pramod Sawant informed that this process will be done as per the recruitment process laid down by the Central Government. Many posts are vacant in various departments in the state. The process of filling these posts will be started soon

गोव्यात या पुढे नोकरी भरती आयोगामार्फतच होणार

Goa Government Job : भरती आयोगासाठीच्या कर्मचारी वर्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारी नोकरभरतीला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच गोव्यातील नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. तसंच यासाठी लागणारा कर्मचारी वर्गही लवकरच भरला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

  • राज्यात यापुढे होणारी नोकरभरती ही सरळ अथवा शिफारशीने न करता गोवा राज्य लोकसेवा आयोगामार्फतच केली जाईल. यासाठी आयोगाबरोबरच मनुष्यबळ विकास महामंडळाची मदत घेतली जाणार असून ही प्रक्रिया केंद्र सरकारने घालून दिलेल्या भरती प्रक्रियेनुसार करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागच्याच महिन्यात दिली होती.
  • मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. मात्र, यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने घालून दिलेल्या शिफारशींची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.
  • याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया या स्वतंत्र आयोगामार्फत केली जाईल. खात्यांतर्गत भरतीसाठी आवश्यकता पत्रे आणि रिक्त पदांचा तपशील आयोगाला सादर करण्यात येईल. आयोग त्याप्रमाणे रिक्त पदांची उद्घोषणा करून परीक्षा, मुलाखत आणि निकाल या पद्धतीने भरून ती राज्य सरकारला सादर करेल.’, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
  • दरम्यान, यापूर्वी नोकरभरतीमध्ये काही चुकीच्या घटना घडल्याच्या राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याची प्रकरणे समोर आली होती, त्यामुळे सरकारने भरतीसाठी यावेळेस कडक उपाययोजना राबविण्याचे धोरण अवलंबले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Goa Government Jobs 2023 for 2572

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!