Goa HSSC Results 2021: बारावीची मूल्यांकन पद्धत जाहीर
Goa 12th Results 2021
Goa Board of Secondary and Higher Secondary Education (Goa Board of Secondary and Higher Secondary Education GBSHE) has announced the assessment method for Class XII examinations. Twelfth grade students will be assessed on the basis of tenth, eleventh, twelfth internal examinations. According to a recent report, the result of Goa Board XII will be 30-30 per cent weightage of 10th and 11th marks
Goa HSSC Results 2021:गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन(Goa Board of Secondary and Higher Secondary EducationGBSHE) ने बारावी परीक्षांची मूल्यांकन पद्धत जाहीर केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन दहावी, अकरावी, बारावी अंतर्गत परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार गोवा बोर्ड बारावीचा रिझल्ट हा दहावी, अकरावीच्या अंकाचे वेटेज ३०-३० टक्के असेल.
बारावीच्या गुणांचे वेटेज ४० टक्के असेल. यामध्ये दहावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या ३ विषयांची सरासरी असेल. अकरावीमध्ये थेअरी पेपरचे फायनल गुण दिले जाणार आहेत. याशिवाय बारावी यूनिट टेस्ट, एफटी, मिड टर्म आधारे गुण दिले जाणार आहेत.
गोवा एचएसएससी निकाल २०२१ मूल्यांकन संदर्भात एक अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी मूल्यांकन पद्धतीवर खूष नसतील त्यांना करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२१ ला रिझल्टची घोषणा केली जाणार आहे.
Goa Board Exams 2021
Goa Board Exams 2021- Goa Board has postponed Class X and XII examinations. New dates will be announced 15 days before the exam. The 10th and 12th examinations of Goa Board of Education were to start from April 24. The final examinations of Class X and XII have been postponed till further orders.
Goa Board Exams 2021-दहावी, बारावी परीक्षा लांबणीवर
गोवा बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. परीक्षेच्या १५ दिवस आधी नव्या तारखांची घोषणा होईल. गोवा शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा २४ एप्रिल पासून सुरू होणार होत्या. पुढील आदेशांपर्यंत इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा स्थगित केल्या आहेत.
बोर्ड परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा पुरेसा अवधी ठेवून करण्यात येईल. परीक्षांच्या १५ दिवस आधी विद्यार्थ्यांना सूचित केले जाईल. गोवा शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा २४ एप्रिल पासून सुरू होणार होत्या. पण त्या आता लांबणीवर पडल्या आहेत.