Goa Bharti Scam – ‘नोकरी विक्री प्रकरणी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा’
Goa Bharti Scam latest information are available here – In The State of Goa, complaints are being filed against suspects every day in connection with job sales cases. Trinamool Congress leader Samel Valwaikar demanded setting up of an SIT by a retired Supreme Court judge to find out the centre of the case.
Since 2017, jobs have been created in the state by paying huge amounts of money and indulging in other corruption. As a result, those who came on highly educated merit did not get jobs. Politicians have taken money and given jobs to their workers. “All of these jobs need to be verified,” tmc national spokesman Trojan D’Mello said.
‘नोकरी विक्री प्रकरणी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा’ – राज्यात सध्या नोकऱ्या विक्री प्रकरणी दररोज संशयिताविरुद्ध तक्रारी दाखल होत आहेत. या प्रकरणाचा केंद्रबिंदू शोधून काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत एसआयटी बसवून सखोल चौकशी करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते समिल वळवईकर यांनी केली.
- पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. वळवईकर म्हणाले, माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी या भाजपच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची विक्री होत आहे, असा आरोप केला होता. यात जे दोषी आढळत आहे ते भाजपच्या जवळचे आहेत. मुख्यमंत्र्यांना जर पारदर्शकता दाखवायची असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, असे वळवईकर म्हणाले.
- २०१७ नंतरच्या सर्व सरकारी नोकऱ्यांची पडताळणी करा – राज्यात २०१७ नंतर मोठ्या प्रमाणात पैसे देऊन तसेच इतर भ्रष्टाचार करून नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे जे उच्चशिक्षित मेरिटवर आलेले आहेत त्यांना नोकरी मिळाली नाही. राजकारण्यांनी पैसे घेऊन तसेच आपल्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व नोकऱ्यांची पडताळणी होणे गरजेचे आहे, असे टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले. नोकरी घोटाळ्यामुळे गोव्यातील पात्र युवा वर्गावर भाजप सरकारने मोठा अन्याय केला, असेही ते म्हणाले.
Goa Bharti Scam