FTII Admit Card
FTII Admit Hall Ticket
FTTI Admit Card 2021- Film and Television Institute of India (FTII), Pune has announced the Hall Ticket for the Joint Entrance Examination (JET) 2021. Candidates appearing for the examination can download it from the official website ftii.ac.in. This entrance test will be held on 18th and 19th December 2021. Group A entrance test will be held on December 18 from 2 to 5 pm. Group B entrance test will be held on December 19 from 9 am to 12 noon. The Group C exam will be held from 2 pm to 5 pm.
FTII 2021Admit Card 2021: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा (JET) 2021 साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ftii.ac.in वरून जाऊन ते डाउनलोड करू शकतात. ही प्रवेश परीक्षा १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. ग्रुप ए ची प्रवेश परीक्षा १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. ग्रुप बीची प्रवेश परीक्षा १९ डिसेंबरला सकाळी ९ ते १२ वेळेत होणार आहे. तर ग्रुप सीची परीक्षा दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल.
FTII Admit Card 2021: असे करा डाऊनलोड
- अधिकृत वेबसाइट ftii.ac.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवरील ‘Admissions: Joint Entrance Test 2021 – Registrations Closed’ या लिंकवर क्लिक करा.
- समोर चार पर्याय दिसतील. प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
- स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल. ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.
ऑल इंडिया लेव्हलची परीक्षा म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षा २०२१ (JET 2021) हा या निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे.यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकार (objective type) आणि सब्जेक्टिव्ह प्रश्न (subjective questions)असतील. परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ दिला जाईल. भारतातील २६ शहरांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाईल.
महत्वाच्या गोष्टी
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये काही चूक असल्यास विभागाशी संपर्क साधून ते दुरुस्त करता येईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्र खूप महत्त्वाचे आहे. प्रवेशपत्र नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू देता येणार नाही.